डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अवघड क्षेत्रातील संवर्ग १ बदलीबाबत

 जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही संदर्भ क्र. १ येथे नमूद पत्रातील वेळापत्रकानुसार सुरु असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्र. १,२,३, ४, ५ व ६ मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

२शासन निर्णय दिनांक ०७.०४.२०२१ मधील विशेष संवर्ग-१ शिक्षकांची बदली ही विनंती बदली आहे. परंतु बदली प्रक्रिया राबविताना विशेष संवर्ग -१ मधील काही शिक्षकांनी अनावधानाने बदलीतून सूट मिळणेबाबतचा पर्याय न स्वीकारल्यामुळे असे शिक्षक अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या टप्यात समाविष्ट झालेले आहेत. तसेच विशेष संवर्ग-१ मधील ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत ३ वर्षापेक्षा कमी झालेली आहे,


अवघड क्षेत्रातील शाळेवर बदलीस कोण कोण ठरले पात्र ?वाचा....

 अशा शिक्षकांना बदलीतून सूट मिळणेबाबतची संधी यापूर्वी देण्यात आलेली नाही. अशा विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना सरसकट अवघड क्षेत्रात बदली करणे उचित ठरणार नाही, याबाबतचे ग्रामविकास विभागाचे सर्व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र....👇








आंतरजिल्हा बदलीबाबत...

 सन २०१७ ते २०२२ या कालावधीमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत...

दि.०१.०४.२०२३ ते दि. १५.०४.२०२३ पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दि. १६.०४.२०२३ ते दि.३०.०४.२०२३ या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी असे आदेशात म्हटलेले आहे.  





मराठी राजभाषा दिननिमित्त

राजभाषा दिनानिमित्त माझी काव्यरचना....

अल्बम ऐकण्यासाठी चित्रावर क्लिक करा व नंतर गाण्याच्या नावावर...  

 


*विषय - मायमराठी*


*शिर्षक- माय ही या श्वासाची...*


माय ही या श्वासाची,

शब्द हीचे आहे मधुर ,

स्वर बनुनी उमटतात,

श्रोते होतात अधीर,



बोलीभाषेची हीच जडण,

अहिरणी,वऱ्हाडी वा मालवणी,

नटवून हीस चढवितात साज,

घडतात हीचीच कास धरुनी,



शब्दाचा अखंड हीचा भंडार,

ग्रंथ बनुनी होते साठवण ,

या महाराष्ट्राचा आहे,

भाषा म्हणून तुच प्राण,



बांधणी हिची स्वर व्यंजनाची,

 शब्द नी शब्द हीचा खास,

सह्याद्रीच्या सावलीत,

घडवते स्वराज्याचा इतिहास ,



बनून ओळख या मातीची,

बनली जननी या महाराष्ट्राची,

विणला आहे हिच्यात आपलेपणा,

ही भाषा आहे स्पष्टपणाची,



गंध हीचा मज फुलवितो,

करतो वंदन मनातून ,

माय मराठीची आम्ही लेकरं,

उमटले भाव कंठातून ....


*प्रकाशसिंग राजपूत*

  *🚩 छ.संभाजीनगर🚩*

📲 9960878457

बिहार राज्य करणार 3 लाखांहून अधिक शिक्षक भरती!

 बिहार राज्य करणार 3 लाखांहून अधिक शिक्षक भरती!

बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी शिक्षण (education department)  विभागात ३ लाख शिक्षकांच्या नियुक्तीला मंजुरी दिली  आहे. सातव्या टप्प्यासाठी शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.



शिक्षणमंत्र्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मी सातव्या टप्प्यातील शिक्षक नियोजन नियमावलीवर स्वाक्षरी केली आहे, आता ती कॅबिनेटकडे जाईल. 2023 मध्ये शिक्षण विभागात 3 लाखांहून अधिक नोकऱ्या (teacher jobs) उपलब्ध होतील. महाआघाडी सरकारने दिलेल्या 10 लाख नोकऱ्यांच्या आश्वासनावर आम्ही ठाम आहोत आणि ते पूर्ण करू.

बिहारमधील शिक्षकांच्या (teachers) पुनर्स्थापनेसाठी उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या पुनर्स्थापनेची मागणी ते सातत्याने करत आहेत. या सगळ्यात शुक्रवारी शिक्षणमंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिली. आघाडी सरकारने दिलेल्या नोकऱ्यांच्या आश्वासनावर आम्ही उभे आहोत आणि ते पूर्ण करू, असेही ते म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी राज्यात 20 लाख भरतीबद्दल बोलले होते. या 20 लाखांपैकी साडेतीन लाख भरती शिक्षण विभागात होणार असल्याचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले होते. दुसरीकडे, आंदोलक उमेदवारांनी सांगितले की, गेल्या ३ वर्षांपासून ७ व्या टप्प्यातील शिक्षक पुनर्स्थापना रखडली आहे. त्यांना तोंडी घोषणा करण्याऐवजी अधिकृत अधिसूचना आवश्यक आहे.


नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासूनच.

 MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. एमपीएससीने आपला नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात येत आहे असे ट्विट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे. यंदाच्या वर्षापासूनच नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. परंतु विद्यार्थ्यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला होता. हा आक्षेप विद्यार्थ्यांनी व्यक्तही करून दाखवला पण त्याला यश आले नाही.

अखेर या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून पुण्यात बालगंधर्व चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यासंदर्भांत विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. गुरुवारी अखेर या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला .

अखेर MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोग, विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक होणार होती. परंतु ती रद्द झाली. त्यानंतर बैठक न घेता आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला. या निर्णयाची माहिती ट्विट करून दिली. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जी काही परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत आयोगासोबत चर्चा केली होती.

अवघड शाळेवर कोणते शिक्षक ठरले पात्र

MPSC च्या अभ्यासक्रमात कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत?

  • आता MPSCची परीक्षा ही वर्णनात्मक असेल आणि यात एकूण 9 पेपर असतील.

  • त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे पेपर प्रत्येकी 300 गुणांचे असतील तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील.

    • याशिवाय मुलाखतीसाठी 275गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2 हजार 25 असतील.

    • सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.

    • सोबतच एकूण 24 विषयांतून उमेदवारांना 1 वैकल्पिक विषय निवडता येईल.