डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

निवड श्रेणी प्रशिक्षण



 निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात नव्याने नाव नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करणेस शासनाकडून परवानगी मिळाली आहे.

प्रशिक्षण  निशुल्क आयोजित करणेचे अधिकार या कार्यालयाच्या अखत्यारीत नसल्याचे आदेशात सांगण्यात आलेले आहे.

 सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रशिक्षणाबाबतच्या सविस्तर लेखी सूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु असून अंदाजे पुढील आठवडा ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरु होईल. 


आदेश पहा👇


राज्यस्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 

राज्यस्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धा

 आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. 

शैक्षणिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान (ICT) तंत्रज्ञानाचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे. यामुळे डिजिटल शिक्षणाचे वेगळेच महत्त्व निर्माण झालेले आहे. 



कोदिड-१९ काळात प्रत्यक्ष शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षणाच्या विविध माध्यमाद्वारे व साधनांद्वारे वर्गावर्गातून अध्ययन-अध्यापन प्रणाली घडतांना दिसून येत होती.

व्हिडीओ नोंदणी व डाईव्ह लिंक अपलोड करा...क्लिक करा


शिक्षक, विद्यार्थी कधी शाळेच्या ओट्यावर, कधी शेतात, कधी मंदिराच्या ओट्यावर, कधी निवासी पार्किंग मध्ये तर कधी गल्लीतील चौकात एकत्र येवून ऑनलाईन प्रणालीने अभ्यास, चाचण्या पूर्ण करतांना दिसत होते. शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले अध्यापन अधिक रंजक आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच विद्यार्थी याच डिजिटल साधनांचा वापर करून आपले अध्यापन सुकर करताना आढळून येत आहे. 

राज्यामधील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ अधिक सक्रीय होऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचेमार्फत राज्यातील २,८९,५६० शिक्षक है तंत्रस्नेही झाल्याचे आढळून आले आहे. 

मराठवाडयातील शिक्षकांची प्रेरणा परीक्षा अशी असणार...

या शिक्षकांनी फक्त आपापले वर्गच ऑनलाईन घेतलेले नाहीत तर स्वतःच्या विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही केलेले आहे, ज्यामुळे आज राज्यातील विद्यार्थी स्वतः डिजिटल साहित्य तयार करून आपले शिक्षण मनोरंजक करत आहेत, इतर देशातील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधून विविध साहित्य वापरत आहेत. उदा. शैक्षणिक व्हिडीओ, मनोरंजक खेळ, AI/AR/VR वापर करून बनविलेले ई-साहित्य, कृतियुक्त PDF, आनंददायी PPT पोस्टर्स, प्रमाणपत्रे आदी. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन करत असताना शिक्षकांमार्फत बनवले गेलेले ई-साहित्य हे जास्त परिणामकारक असल्याचे दिसून आलेले आहे.

उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष-


व्हिडीओ निर्मिती साठी आवश्यक आशय मजकूर आदर्श असावा.

लिंग समभाव, शासकीय ध्येय धोरणाशी सुसंगत आशय असावा. व्हिडीओ हा विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन निर्मित केलेला असावा.

व्हिडीओ ची साईज ही विद्यार्थी किंवा इयत्तेनुसार असावी.

निर्मित व्हिडीओ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम.

व्हिडिओमधील मजकूर, चित्रे, रंगसंगती अचूक व योग्य असावीत. शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडीओ चित्रीकरण. सादरीकरण. एडिटिंग इत्यादी बाबींना महत्व असेल.

आवाजात सुस्पष्टता असावी. आवाजाची / बोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी. आवाज आरोह- अवरोह युक्त असावा. बँकग्राउंड नॉईज नसावा. जर बँकग्राउंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे. बँकग्राउंड म्युझिक व आवाज हे स्लाईडच्या आशयाशी संबंधित असावे.


व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी-


शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडीओ बनविणे आवश्यक आहे.

वरील व्हिडीओ अध्ययन अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्यक व्हिडिओ बनविणाऱ्याने स्वतः चा थोडक्यात परिचय समावेश करावा.

व्हिडीओ कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव शाळा. पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू नयेत. व्हिडिओच्या शेवटी या बाबी फक्त स्क्रिनवर दिसाव्यात.

घटक, व्हिडिओमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे, हे सुरुवातीला स्क्रिनवर दाखवावे.

व्हिडीओ ची लांबी कमीत कमी ५ मि. व जास्तीत जास्त ९ मिनिटांची असावी.

व्हिडीओ फॉरमॅट MP4 असावा.

व्हिडीओ मध्ये कुठेही स्वतःच्या समाज माध्यमांची व्यावसायिक जाहिरात समाविष्ट नसावी, उल्लेख नसावा.

व्हिडीओ मधील मजकूर व आशयाबाबत पूर्णतः संबंधित शिक्षक जबाबदार असणार आहे. याची नोंद घ्यावी.


संपूर्ण आदेश पहा...



शिक्षक भरती संबंधी सुमोटो याचिकेवर सुनावणी सुरू

 उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठासमोर शिक्षक भरती संबंधी सुमोटो याचिकेवर सुनावणी सुरू आहे.



 या याचिकेत शासनाला दि. 28 एप्रिल 2023 पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. सदर याचिकेसंबंधी राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दि.27 एप्रिल 2023 रोजी एक परिपत्रक काढलेले आहे.

यात राज्यातील शिक्षक भरती ही ऑगस्ट 2023 पासून सुरू करण्याचे संकेत दिलेले आहेत. सदर पत्रानुसार 15 मे 2023 पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्याचे आधार कार्ड सरल प्रणालीमध्ये नोंदवून घेण्याचे व आधार संलग्नित विद्यार्थी संख्याच गृहीत धरून संच मान्यता करण्याचे निर्देश दिलेले आहेत. दिनांक 8 मे पर्यंत एकूण 2,09,96,629 विद्यार्थ्यांपैकी 1,69,55,686 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध ठरविण्यात आलेल आहेत. एकूण 24,60,473 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध आहेत. 15 मेरोजी हे विद्यार्थी संच मान्यतेमधून वगळण्यात येतील व त्‍यामुळे साधारणतः 24 लाख विद्यार्थी शाळाबाहय् होतील. यामुळे राज्यातील साधारणतः 60 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.

त्यामुळे राज्यातील शिक्षक भरती ऑगस्टपर्यंत होऊच शकत नाही. यापुर्वी 2015 मध्ये शिक्षणाच्या हक्क कायद्यातील तरतुदींचा चुकीचा निर्णय घेवून 17 हजार शिक्षक अतिरिक्त करण्यात आलेले होते. त्यांचे समायोजन अजूनही पूर्णपणे झालेले नाही. वरील निर्णयाविरूदध सर्वांच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. वरील प्रलंबित याचिकांचा निर्णय लागेपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश नागपूर उच्च न्यायालयाने दिले आहे.


शिक्षक प्रेरणा परीक्षा विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून

 शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्याबाबतचे आदेश मा. विभागीय आयुक्त मराठवाडा  मा. सुनिल केंद्रेकर यांनी निर्गमित केले असून यामागे शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, विषयज्ञानात वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी. विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी.



 या हेतूने शिक्षक प्रेरणा परीक्षेसंदर्भात विभागातील सर्व शिक्षक संघटनांची संदर्भान्वये प्रस्तुत कार्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली होती. प्रस्तुत सभेत विविध शिक्षक संघटनांनी आपली भुमिका विषद करत शिक्षक प्रेरणा परीक्षेस अनुमोदन दिले होते.


त्याअनुषंगाने औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये इ. 1 ली ते 10 वी पर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळांतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करावे असे आदेश काढण्यात आलेले आहेत.


विभागीय परीक्षा संनियंत्रण समिती :-


अध्यक्ष - विभागीय आयुक्त

सदस्य सचिव संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबाद -

सदस्य - उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद

सदस्य - विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग

सदस्य - विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग


जिल्हास्तरीय परीक्षा संनियंत्रण समिती :-


अध्यक्ष जिल्हाधिकारी

सहअध्यक्ष - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक)

सदस्य - अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा -

सदस्य - उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद

सदस्य - प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था


आर्थिक नियोजन समिती (जिल्हा स्तर) :-


अध्यक्ष - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य- मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य - लेखाधिकारी वर्ग-1 वित्त विभाग, जिल्हा परिषद

सदस्य - शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

सदस्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक)


परीक्षा स्वरूप कसे असणार...


प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 50 प्रश्न असलेली वस्तुनिष्ठ स्वरुपाची व 50 गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नास 01 गुण दिला जाईल.

चुकीच्या एका उत्तरासाठी 0.5 गुण वजा केले जातील.

परीक्षेची वेळ ही प्रत्येक विषयासाठी 01 तासांची असेल. परीक्षेकामी पर्यवेक्षक, केंद्रसंचालक यांची नियुक्ती जिल्हा संनियंत्रण समिती करेल.

उत्तरपत्रिका या ओएमआर मशीनवर तपासल्या जातील अशा स्वरुपाच्या असतील. सदर उत्तरपत्रिकांची छपाई ही जिल्हास्तरावर केली जाईल.

उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थीचे आसन क्रं. नोंदवून घेतला जाईल.

उत्तराच्या योग्य पर्यायावर गोल करण्यासाठी काळ्या शाईच्या पेनचा वापर करावा.

उत्तर पत्रिकेवर उत्तर नोंदवितांनाच्या व इतर नोंदीच्या सूचना उत्तर पत्रिकेच्या मलपृष्ठावर देण्यात याव्यात.

परीक्षा संपन्न झाल्यानंतर परीक्षार्थीची उपस्थिती यादी, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका या पर्यवेक्षक केंद्रसंचालकांकडे जमा करतील. केंद्रसंचालक या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व उपस्थिती अहवाल स्वतंत्ररित्या सीलबंद करुन जिल्हाकक्षाकडे सुपूर्द करतील.

परीक्षा संपन्न झाल्यानंतर जिल्हा कक्ष प्रत्येक उत्तरपत्रिकेस बारकोडींग करेल. तसेच ओएमआर मशीनच्या सहाय्याने उत्तरपत्रिकांची तपासणी करुन परीक्षार्थीनी संपादन केलेल्या गुणांची विषयनिहाय यादी तयार करेल. ( गुणांची यादी करत असतांना ऋण गुण मिळालेल्या गुणांमधून

वजा केले जातील व अंतिम निकाल तयार केला जाईल. )

परीक्षेमध्ये अंतिम गुणांच्या आधारे एकुण गुणांपैकी 50% व त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या परीक्षार्थ्यांस उत्तीर्ण ठरविले जाणार आहे.

अंतिम निकाल तयार झाल्यानंतर जिल्हास्तरावर गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या 50 परीक्षार्थ्याच नावे, उत्तीर्ण परीक्षार्थ्यांची नावे व एकूण निकाल जिल्हास्तरावर घोषीत करण्यात येणार .

गुणानुक्रमे जिल्ह्यातुन प्रथम येणाऱ्या 50 परीक्षार्थीना सत्कारपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करुन CSR / सेस फंडातून भेटवस्तु देऊन जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार करावा असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.


परीक्षेसाठी अभ्यासक्रम :-


इ. 5 वी ते 12 वी पर्यंतच्या SCERT / NCERT पाठ्य पुस्तकांमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र इ. विषयासंबंधीचा अभ्यासक्रम राहील.

उपरोक्त प्रमाणे सर्व संबंधितांनी परीक्षेचे नियोजन करावे. तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणावा. परीक्षेची दिनांक व वेळ ही स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे.

परीक्षेची गोपनीयता व दर्जा राखण्याची जबाबदारी ही सर्व संबंधित जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी, जि.प यांची राहील. केलेल्या नियोजनास बाधा न पोहचता सर्व संबंधित मुख्य जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प हे आपल्या कल्पकेची भर घालुन परीक्षा या अधिक सुरळीत व आनंददायी वातावरणात पार पाडणेस सक्षम राहतील..


   विश्लेषण 

प्रकाशसिंग राजपूत 



आदेश पहा....👇


परीक्षा आदेश डाऊनलोड करा


शिक्षक भरती (Teachers recruitment)

 शिक्षक भरती (Teachers recruitment) 15 मे नंतर संच मान्यता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया  जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाणार  आहे. त्यासाठी लवकरच शिक्षक भरतीसाठी असलेले पवित्र पोर्टल हे अॕक्टिव्ह होणार आहे.



🔘 विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर संच मान्यता 15 मे रोजी अंतिम केली जाणार आहे.

🔘 शिक्षण विभागाकडून संच मान्यतेचे शाळा निहायवितरण 20 मे पर्यंत होणार आहे.


🔘   या संच मान्यतेतील मंजूर पदांनुसार पद भरतीची(Teachers recruitment)  कार्यवाही सुरु होईल.

 

🔘  संबंधित शाळा व्यवस्थापनांना शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर 15 जुलै पर्यंत रिक्त पदे नोंदवून पोर्टलवर जाहिरात दिली जाईल.

 

🔘   शिक्षण संचालनालयाकडून 17 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार टेट परीक्षेच्या निकालानंतरची पदभरतीची (Teachers recruitment) कार्यवाही सुरु करणे आवश्यक असल्याचं प्रधान सचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे.

नॉन क्रिमिलिअर ची अट महिला उमेदवारांसाठी रद्द वाचा सविस्तर...

🔘  20 ऑगस्टपर्यंत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे आधी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.


या ब्लाॕगला  खालील Follow  बटणने follow करा व अपडेट रहा....