डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षक प्रेरणा परीक्षा विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून

 शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्याबाबतचे आदेश मा. विभागीय आयुक्त मराठवाडा  मा. सुनिल केंद्रेकर यांनी निर्गमित केले असून यामागे शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी, विषयज्ञानात वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी. विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी.



 या हेतूने शिक्षक प्रेरणा परीक्षेसंदर्भात विभागातील सर्व शिक्षक संघटनांची संदर्भान्वये प्रस्तुत कार्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली होती. प्रस्तुत सभेत विविध शिक्षक संघटनांनी आपली भुमिका विषद करत शिक्षक प्रेरणा परीक्षेस अनुमोदन दिले होते.


त्याअनुषंगाने औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये इ. 1 ली ते 10 वी पर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळांतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करावे असे आदेश काढण्यात आलेले आहेत.


विभागीय परीक्षा संनियंत्रण समिती :-


अध्यक्ष - विभागीय आयुक्त

सदस्य सचिव संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबाद -

सदस्य - उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद

सदस्य - विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग

सदस्य - विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग


जिल्हास्तरीय परीक्षा संनियंत्रण समिती :-


अध्यक्ष जिल्हाधिकारी

सहअध्यक्ष - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक)

सदस्य - अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा -

सदस्य - उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद

सदस्य - प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था


आर्थिक नियोजन समिती (जिल्हा स्तर) :-


अध्यक्ष - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य- मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद

सदस्य - लेखाधिकारी वर्ग-1 वित्त विभाग, जिल्हा परिषद

सदस्य - शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

सदस्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक)


परीक्षा स्वरूप कसे असणार...


प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 50 प्रश्न असलेली वस्तुनिष्ठ स्वरुपाची व 50 गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नास 01 गुण दिला जाईल.

चुकीच्या एका उत्तरासाठी 0.5 गुण वजा केले जातील.

परीक्षेची वेळ ही प्रत्येक विषयासाठी 01 तासांची असेल. परीक्षेकामी पर्यवेक्षक, केंद्रसंचालक यांची नियुक्ती जिल्हा संनियंत्रण समिती करेल.

उत्तरपत्रिका या ओएमआर मशीनवर तपासल्या जातील अशा स्वरुपाच्या असतील. सदर उत्तरपत्रिकांची छपाई ही जिल्हास्तरावर केली जाईल.

उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थीचे आसन क्रं. नोंदवून घेतला जाईल.

उत्तराच्या योग्य पर्यायावर गोल करण्यासाठी काळ्या शाईच्या पेनचा वापर करावा.

उत्तर पत्रिकेवर उत्तर नोंदवितांनाच्या व इतर नोंदीच्या सूचना उत्तर पत्रिकेच्या मलपृष्ठावर देण्यात याव्यात.

परीक्षा संपन्न झाल्यानंतर परीक्षार्थीची उपस्थिती यादी, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका या पर्यवेक्षक केंद्रसंचालकांकडे जमा करतील. केंद्रसंचालक या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व उपस्थिती अहवाल स्वतंत्ररित्या सीलबंद करुन जिल्हाकक्षाकडे सुपूर्द करतील.

परीक्षा संपन्न झाल्यानंतर जिल्हा कक्ष प्रत्येक उत्तरपत्रिकेस बारकोडींग करेल. तसेच ओएमआर मशीनच्या सहाय्याने उत्तरपत्रिकांची तपासणी करुन परीक्षार्थीनी संपादन केलेल्या गुणांची विषयनिहाय यादी तयार करेल. ( गुणांची यादी करत असतांना ऋण गुण मिळालेल्या गुणांमधून

वजा केले जातील व अंतिम निकाल तयार केला जाईल. )

परीक्षेमध्ये अंतिम गुणांच्या आधारे एकुण गुणांपैकी 50% व त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या परीक्षार्थ्यांस उत्तीर्ण ठरविले जाणार आहे.

अंतिम निकाल तयार झाल्यानंतर जिल्हास्तरावर गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या 50 परीक्षार्थ्याच नावे, उत्तीर्ण परीक्षार्थ्यांची नावे व एकूण निकाल जिल्हास्तरावर घोषीत करण्यात येणार .

गुणानुक्रमे जिल्ह्यातुन प्रथम येणाऱ्या 50 परीक्षार्थीना सत्कारपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करुन CSR / सेस फंडातून भेटवस्तु देऊन जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार करावा असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.


परीक्षेसाठी अभ्यासक्रम :-


इ. 5 वी ते 12 वी पर्यंतच्या SCERT / NCERT पाठ्य पुस्तकांमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र इ. विषयासंबंधीचा अभ्यासक्रम राहील.

उपरोक्त प्रमाणे सर्व संबंधितांनी परीक्षेचे नियोजन करावे. तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणावा. परीक्षेची दिनांक व वेळ ही स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे.

परीक्षेची गोपनीयता व दर्जा राखण्याची जबाबदारी ही सर्व संबंधित जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी, जि.प यांची राहील. केलेल्या नियोजनास बाधा न पोहचता सर्व संबंधित मुख्य जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प हे आपल्या कल्पकेची भर घालुन परीक्षा या अधिक सुरळीत व आनंददायी वातावरणात पार पाडणेस सक्षम राहतील..


   विश्लेषण 

प्रकाशसिंग राजपूत 



आदेश पहा....👇


परीक्षा आदेश डाऊनलोड करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: