डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी

वरिष्ठ वेतन श्रेणी करिता प्रशिक्षणाच्या नोंदणीची सुरुवात झालेली आहे याबाबतीत शासन आदेश  निर्गमित करण्यात आलेला आहे.




नोंदणीसाठी पात्रता 

नोंदणीसाठी www.maa.ac.in या संकेत स्थळावर भेट दयावी.

👉. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.


👉. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले


प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

 👉 प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. प्रशिक्षण लिंकनोंदणी दिनांक २९ मे, २०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल. 

 👉 सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील.


 👉 प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत गट क्र. १- प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)


गट क्र. २- माध्यमिक गट (इ. ९ वी ते १० वी च्या वर्गांना अध्यापन करणारे). गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)


गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)


 👉 प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ ID. शाळेचा UDISE क्रमांक,

अचूक ई-मेल आय. डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी. 

 👉. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन पोर्टलवर "शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी" हा पर्यायाचा वापर करून आपलीना नोंदणी करावी.


 👉 नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

  👉. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल


आय.डी. वर पाठविण्यात येतील.


 👉. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP येईल. व सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल.

 👉. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय. डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल

आय.डी./ यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल आय.डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल. १३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी..

आदेश पहा...


टी.सी. वरील शिक्षणाधिकारी प्रतिस्वाक्षरी अट रद्द

 शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत.


शालेय विद्यार्थ्यास एका जिल्ह्यातून अथवा राज्यातून, दुसऱ्या जिल्ह्यात अथवा राज्यातील शाळेत प्रवेश घ्यावयाचा झाल्यास तसेच CBSE / ICSE / IGCSE / IB या मंडळातील शाळांतील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाशी संलग्न शाळांमध्ये प्रवेश घ्यावयाचा झाल्यास अथवा राज्य मंडळाशी संलग्नित शाळेतून अन्य मंडळाशी संलग्नित शाळेत प्रवेश घ्यावयाचा झाल्यास, सध्या प्रचलित असलेल्या कार्यपध्दतीनुसार, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर (प्रमाणपत्रावर ) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक आहे. ही पध्दत केवळ ज्या शाळांनी विद्यार्थ्यांना दाखले दिले आहेत, ती शाळा अधिकृत व मान्यताप्राप्त आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी होती.

शासन निर्णय दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ अन्वये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नमुना सुधारित करण्यात आला असून यामध्ये शाळा मान्यता क्रमांक तसेच युडायस क्रमांक यांचा उल्लेख असल्यामुळे शाळांच्या अनधिकृततेचा प्रश्न निकालात निघाला आहे. तसेच शाळा सोडल्याचा दाखला हा संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केला असल्यामुळे त्यावर पुन्हा प्रतिस्वाक्षरीची गरज नाही. हे लक्षात घेवून शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची उपरोक्त नमूद पध्दत बंद करण्यात येत आहे. हा शासन निर्णय सर्व माध्यम व सर्व • व्यवस्थापनांच्या शाळांना लागू राहील.








भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा महाराष्ट्राचा भुमीपुत्र

 

प्रथमेश जवकर याने सुवर्ण पदक घेत भारताचे नाव नेमबाजी मध्ये जगभर केले आहे.

 

शांघाय 2023 ह्युंदाई तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील 1 माईक स्लोएसरचा एका गुणाने पराभव करून सुवर्णपदक जिंकले.



प्रथमेश समाधान जवकर  यांचा जन्म सोमवार, ८ सप्टेंबर २००३ बुलढाणा , महाराष्ट्र, भारत येथे झाला.   बुलढाणा येथील प्रबोधन विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.  

त्याने वयाच्या बाराव्या वर्षी तिरंदाजीचे प्रशिक्षण सुरू केले आणि पुढे तो एक प्रतिष्ठित तिरंदाज बनला.

प्रशिक्षण -

त्याने प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आणि अनेक स्थानिक आणि राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धांमध्ये भाग घेतला.



कंपाउंड इव्हेंटमध्ये अनेक पदके जिंकून त्याने आपले कौशल्य दाखवले.  राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके जिंकल्यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली.

2019 मध्ये बांग्लादेशमध्ये झालेल्या तिसऱ्या ISSF आंतरराष्ट्रीय एकता तिरंदाजी स्पर्धेत तो सहावा, 2022 मध्ये थायलंडमध्ये झालेल्या फुकेत 2022 एशिया कप लेग 1 मध्ये चौथा आणि 2023 मध्ये तुर्कीमध्ये झालेल्या अंतल्या 2023 ह्युंदाई तिरंदाजी विश्वचषक स्टेज 1 मध्ये सातव्या स्थानावर आला.  शांघाय 2023 ह्युंदाई तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 स्पर्धेत 149-148 ने नेदरलँड्सचा नंबर 1 माईक श्लोएसर वर्ल्ड चॅम्पियन बनला.


त्याची गोल्ड मेडलची कामगिरी आपण खालील व्हिडीओत पाहू शकता.... डिजिटल महाराष्ट्र  चॕनलला सबस्क्राईब करा...





संचमान्यतेचे निकष

संचमान्यतेचे निकष पहा....

 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे बाबत......



महाराष्ट्र राज्याच्या सन २०१५ च्या वित्तीय स्थितीविषयक श्वेतपत्रिकेनुसार राज्यात १ ते १० आणि ० ते २० मुले असलेल्या सर्व शाळांची संख्या आणि त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांची दुसरीकडे सोय करण्याची शक्यता यासाठी शाळांची इष्टतम आवश्यकता तपासणे आवश्यक आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक इत्यादी शाळांची संरचना विहित करणे तसेच प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी चे वर्ग सुरु करणे इत्यादी बाबींचा निर्णय संदर्भाधीन क्रमांक (१) येथील आदेशान्वये घेण्यात आला होता. तसेच राज्यातील माध्यमिक शाळांना नवीन तुकडया मंजूर करणे, सुरु ठेवणे व टिकविणे बाबतचे निकष संदर्भाधीन क्र. (२) येथील आदेशान्वये विहित करण्यात आले होते.


संपूर्ण आदेश पहा(संचमान्यतेचे निकष)👇....


संचमान्यतेचा शासन निर्णय डाऊनलोड करा....



केंद्रप्रमुख भरती संदर्भात

 केंद्रप्रमुख (पदभरती) करतांना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दि. ०१.१२.२०२२ च्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुखांच्या पदभरतीचे प्रमाण ५०% पदोन्नतीने व ५०% मर्यादीत स्पर्धा परिक्षेप्रमाणे करण्यात यावी असे आदेशात सुचना देण्यात आलेल्या आहेत . 

 ग्रामविकास विभागातील दि. १०.०६.२०१४ ची अधिसुचना अद्याप रदद वा अधिक्रमित केली नसल्यामुळे केंद्र प्रमुख पदभरती करतांना विषय निहाय विभागणी ही सदर अधिसुचनेमध्ये विहित केल्याप्रमाणे करण्यात यावी असे आदेशात म्हटलेले आहे . 


 दि. १० जून २०१४ मध्ये ज्यांनी, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवाजेष्ठतेच्या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येतील असे नमुद आहे त्यामुळे विशिष्ट विषयात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणुन सेवेचा उल्लेख अधिसूचनेत नाही त्यामुळे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणुन कोणत्याही विषयात तीन वर्षे अखंड सेवा केल्यानंतर सध्या जो पदवीचा विषय आहे त्या विषयात संबंधित प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांस केंद्र प्रमुख म्हणुन पदोन्नती दयावी असे सुचित केलेले आहे.


आदेश पहा 👇