वरिष्ठ वेतन श्रेणी करिता प्रशिक्षणाच्या नोंदणीची सुरुवात झालेली आहे याबाबतीत शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
नोंदणीसाठी पात्रता
👉. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
👉. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले
प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
👉 प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. प्रशिक्षण लिंकनोंदणी दिनांक २९ मे, २०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल.
👉 सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील.
👉 प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत गट क्र. १- प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
गट क्र. २- माध्यमिक गट (इ. ९ वी ते १० वी च्या वर्गांना अध्यापन करणारे). गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)
👉 प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ ID. शाळेचा UDISE क्रमांक,
अचूक ई-मेल आय. डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
👉. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन पोर्टलवर "शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी" हा पर्यायाचा वापर करून आपलीना नोंदणी करावी.
👉 नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
👉. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल
आय.डी. वर पाठविण्यात येतील.
👉. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP येईल. व सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल.
👉. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय. डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल
आय.डी./ यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल आय.डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल. १३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी..
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा