डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

TAIT अंतर्गत शिक्षक भरती नविन अटी

 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी

परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदली बाबत सुधारीत अटी लागू करणेबाबतचा शासन निर्णय ...

राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदांतर्गत रिक्त पदांची संख्या सुनिश्चित करताना तसेच भरतीनंतर शिक्षकांना द्यावयाच्या नियुक्त्यांसाठी खालीलप्रमाणे सुधारीत अटी लागू करण्यात येत आहेत:-


१) ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची सन २०२२ मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तथापि, सदर बदल्यांमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधिन ठेऊन जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी. त्यानंतर आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी. तसेच, अवघड क्षेत्राच्या निकषांचे पुनर्विलोकन करुन सुधारीत निकषांचा समावेश बदली धोरणामध्ये करावा.


२) जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी. ३) उपरोक्त प्रमाणे बदलीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आधार प्रमाणित संचमान्यतेनुसार


रिक्त असणाऱ्या पदांची मागणी पवित्र प्रणालीवर करण्यात यावी. मागणी करण्यात


आलेल्या रिक्त पदांच्या ८० टक्के पदे बिंदूनामावलीप्रमाणे भरण्याकरीता पवित्र


प्रणालीव्दारे शिक्षक उपलब्ध करण्यात येतील.


४) नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकांस जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. ५) तथापि, नव्याने नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यांत जाऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांने रितसर राजीनामा देऊन पुन्हा विहीत प्रक्रीयेच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा देऊन त्यातील गुणवत्तेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविणे आवश्यक राहील.


६) जिल्हाअंतर्गत आपसी बदली, वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती पत्नी एकत्रिकरणांतर्गत इ. अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे.


७) पवित्र प्रणालीव्दारे शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समुपदेशनाव्दारे पुढील कार्यपध्दतीप्रमाणे शिक्षकांची नियुक्ती करावी.


(अ) जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणाऱ्या रिक्त पदांची यादी तयार करण्यात यावी.


सदर यादीमध्ये अवघड क्षेत्रातील सर्व रिक्त पदांचा समावेश राहील याची


खात्री करावी.

(आ) प्रथम दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता


चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राथम्य क्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे


वरीलप्रमाणे तयार करण्यात आलेल्या यादीमधील शाळांमध्ये नियुक्ती देण्यात यावी. (इ) त्यांनतर महिला उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राथम्य क्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे वरीलप्रमाणे तयार करण्यात आलेल्या यादीमधील शाळांमध्ये नियुक्ती


देण्यात यावी.


(ई) त्यानंतर उर्वरित उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राथम्य क्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे वरीलप्रमाणे तयार करण्यात आलेल्या यादीमधील शाळांमध्ये नियुक्ती देण्यात यावी.


८) वरील ४ ते ७ मधील नमुद मुद्दयांच्या आधारावर अटी व शर्ती जाहीरातीमध्ये व नियुक्ती


पत्रामध्ये संबंधित प्राधिकारी यांनी नमूद करावे. ९) शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षण सेवकाच्या परिविक्षाधीन कालावधीतील त्याच्या सेवेचे मूल्यमापन करण्यासाठी “मूल्यमापन चाचणी" घेण्यासाठी तसेच त्याचे वर्तन याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावर संयुक्त समिती गठीत करण्यात यावी.


१०) सदर मूल्यमापन चाचणीचे स्वरुप तसेच इतर आवश्यक नियमावली राज्य शैक्षणिक


संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व आयुक्त (शिक्षण) यांनी संयुक्त रित्या


निश्चित करावी.


११) सदर समितीने सादर केलेल्या अहवालास अनुसरुन जर काही शिक्षकासंदर्भात कर्तव्यात कसूर केल्याचे वा शिक्षकांसाठी विहीत आचारसंहितेचा भंग केल्याचे निष्पन्न होत असल्यास अशा शिक्षकास बदली करणे ही शिक्षा ठरत नसल्याने त्यास प्रथमतः वर्तणुकीमध्ये स्वत:हून सुधारणा करण्याबाबत नोटीस बजावण्यात यावी. त्यानंतर • वर्तणुकीमध्ये सुधारणा न आढळल्यास त्यास ६ महिन्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. त्यानंतरही वर्तणूक न सुधारल्याचे निदर्शनास आल्यास त्यास ६ महिन्यासाठी ५० टक्के वेतनावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आणखी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. यानंतरही संबंधित शिक्षकाचे वर्तणूक न सुधारल्यास सदर शिक्षकावर महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये विहीत केल्याप्रमाणे सक्षम प्राधिकारी यांनी कारवाई करावी,


१२) शाळेमध्ये व शाळेच्या आवारामध्ये मद्य, तंबाखू तसेच तंबाखुजन्य पदार्थ बाळगणे व सेवन यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. असे करताना कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मार्फत कठोर कारवाई करण्यात येईल.


शासन निर्णय डाऊनलोड करा...






नवोदयचा निकाल जाहीर

 इयत्ता पाचवीला ज्या मुलांनी  नवोदयची परीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

 आत्ताच नवोदयचा निकाल जाहीर झालेला असून आपणास ते पाहण्यासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र हे ते उपलब्ध करून देण्यात आलेला आहे .

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व ज्यांनी या परीक्षेत जरी नंबर लागला नसेल त्या विद्यार्थ्यांनी न हार मानता पुढील आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या शाळेमध्ये यश संपादन करून आपला अभ्यास पूर्ण करत यशस्वी जीवनात कडे वाटचाल करावी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा ...


https://cbseit.in/cbse/2023/nvsresult/Result.aspx

योगदिन करिता आसन प्रकार

 २१जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन आजच्या या दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.... 

 आज या योग दिनानिमित्त डिजिटल स्कूल महाराष्ट्र आपणासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक उपयुक्त पीडीएफ घेऊन आलो आहोत.


कृपया या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करा...






अक्षरचक्र आधारित मुळाक्षरे ओळख #mulakhare,

  डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र १ ली विद्यार्थ्यांना उपयुक्त असे ज्ञानरचनावादी मुळाक्षरे व्हिडीओ स्वरूपात घेऊन आला आहे. अक्षरावर क्लिक करा तो व्हिडीओ प्ले होईल.






मराठी स्वर



















अं

अः



अॕ

आॕ       

मराठी व्यंजन 
















त्र














































क्ष

ज्ञ



डिजिटल खिडकीतून चौदाखडी....




चौदाखडी व्हिडीओ स्वरूपात पहा...


केंद्रप्रमुख परीक्षा करिता के सागर ची उपयुक्त पुस्तके

 समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 3री आवृत्ती के सागर केंद्रप्रमुख भरती परीक्षा पेपर पहिला


अभियोग्यता (अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व)
भाषिक क्षमता चाचणी (मराठी)
भाषिक क्षमता चाचणी (इंग्रजी)
गणितीय चाचणी
बुद्धिमापन व तार्किक क्षमता

प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरती करिता अभ्यासक्रमांनुसार रचना केलेला एकमेव संदर्भ

https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/

=====================================

केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर -2 डॉ. शशिकांत अन्नदाते शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह चर्चात्मक व विश्लेषणात्मक स्वरूपात

ऑनलाईन खरेदीसाठी

https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध...

नमुना पी.डी.एफ पहा...