एवढ्या मोठ्या पुरुषशांसमोर दोन महिला शिक्षकांना आमदार साहेब बघा कसे बोलत आहेत.
आमदार साहेबांना बोलण्याचा नक्कीच अधिकार आहे, मात्र त्याची एक पद्धत असते.
एवढ्या मोठ्या पक्षाच्या कार्यक्रमात शिक्षकांना बोलवून त्यांचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करण्याचा अधिकार आमदार साहेबांना कोणी दिला?
तरी याबाबत नक्कीच चर्चा झाली पाहिजे. शाळेतील जर गुणवत्ता खरेच सुधारवायची असेल तर तुम्ही शिक्षकांना असे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून कशी शाळेतील गुणवत्ता सुधारू शकाल? अगोदर शाळांना दर्जेदार डिजिटल क्लासरूम, तसेच चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, उत्तम शालेय पोषण आहार, आणि दबाव विरहित ज्ञानदानाचं पवित्र कार्य करू द्या. तसेच शिक्षकांची अतिरिक्त कामे जसे निवडणुकीची कामे, सर्वेक्षण, खिचडी शिजवणे ही कामे बंद करा आणि शिक्षकांवर विश्वास ठेवा शिक्षक हे पाकिस्तान मधून आलेले नाहीत जेणेकरून तुम्ही त्यांना अशी वागणूक द्याल.
लोकमान्य मल्टीपर्पज को- ॲापरेटिव्ह सोसायटी आयोजीत....
💐देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत मोठ्या गटात नेमळे विद्यालय प्रथम🌹
करोनाने प्रथम लाॕकडाऊन मार्च 2020 मध्ये आला तेव्हा शाळा काय सर्वच बंद झाले . डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रने आयोजित व सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ प्रायोजित विद्यार्थी व शिक्षक यांच्या हिताची राज्यातील नव्हे तर देशातील पहिली राज्यस्तरीय शैक्षणिक कविता गायन स्पर्धा मे - जून २०२० लाआयोजित केली होती . यातील प्राप्त कविता विद्यार्थ्यांना आॕनलाईन माध्यमातून उपलब्ध करत लाखो विद्यार्थ्यांना लाभ झाला जवळजवळ १ ते १० वी १२० कविता या स्पर्धेत प्राप्त झालेल्या होत्या.
याच स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला होता तो शिक्षक श्री नितीन धामापुरकर यांनी . त्यांच्या गायन शैलीचा फायदा त्यांच्या विद्यार्थ्यांना ही झाला.
🌹लहान गटात द्वितीय क्रमांक💐
लोकमान्य मल्टीपर्पज को – ॲापरेटिव्ह सोसायटी यांच्यावतीने आयोजित वंदे मातरम् समूहगीत गायन आणि नृत्य स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत पाचवी ते सातवी या वयोगटात एकूण ७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर आठवी ते दहावी या वयोगटात एकूण ८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील शाळांनी आपला सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज को- ॲापरेटिव्ह सोलायटीकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील समूहगीत गायन स्पर्धेत लहान गटात श्री जनता विद्यालय तळवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून *नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे यांनी व्दितीय क्रमांक पटकावला आहे तर मोठ्या गटात नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला* असून व्दितीय क्रमांकाचे मानकरी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली ठरले आहे.
*नेमळे हायस्कुल च्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री आ भि राऊळ सर ,मुख्याध्यापिका सौ कल्पना बोवलेकर मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांचे, तबला साथीदार कुमार नीरज भोसले व मार्गदर्शक शिक्षक श्री नितिन धामापूरकर यांचे अभिनंदन केले*
राज्य शिक्षक पुरस्कारात वर्धा जिल्ह्याला स्थगिती....
क्रांतियोती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2022-23 साठी निवड प्रक्रिया राबविली जात आहे. दरवर्षी राज्यातील शिक्षकांना राज्य गुणगौरव पुरस्कार दिला जातो. निवड समितीने निवड केलेल्या नावाला विरोध करीत न्यायालयात दाद मागण्यात आली असता न्यायालयाने या प्रक्रीयेलाच स्थगिती दिल्याने शिक्षकांचा 5 सप्टेंबर रोजी होणारा गुणगौरव कार्यक्रम होणार नाही.
शिक्षक गुण गौरव पुरस्कारासाठी प्राथमिक व माध्यमिक गटातून प्रत्येक जिल्ह्यातून एका शिक्षकाची निवड केली जाते. शिक्षकाची निवड करण्यासाठी जिल्हा निवड
समितीकडून निवड प्रक्रिया राबवून प्रत्येक गटातून राज्य निवड समितीकडे तीन शिक्षकांच्या नावांची शिफारस केली जाते. यावर्षी वर्धा जिल्ह्यातून जिल्हा निवड समितीने निवड प्रक्रिया राबविताना शरद ढगे प्राथमिक शिक्षक यांना निवड प्रक्रियेत अपात्र ठरविले.
जिल्हा निवड समितीचा निर्णय अन्यायकारक असल्यामुळे ढगे यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. उच्च न्यायालयाने जिल्हा निवड समितीने ढगे अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. वर्धा जिल्हा प्राथमिक गटातून पुरस्कारासाठी केली जाणारी निवड पुढील आदेशापर्यंत करता येणार नाही.
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली
अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती.