डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जैसा गुरु तैसा शिष्य


लोकमान्य मल्टीपर्पज को- ॲापरेटिव्ह सोसायटी आयोजीत....

💐देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत मोठ्या गटात नेमळे  विद्यालय प्रथम🌹

करोनाने प्रथम लाॕकडाऊन मार्च 2020 मध्ये आला तेव्हा शाळा काय सर्वच बंद झाले . डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रने आयोजित  व सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ प्रायोजित   विद्यार्थी  व शिक्षक  यांच्या हिताची राज्यातील नव्हे तर देशातील पहिली  राज्यस्तरीय शैक्षणिक कविता गायन स्पर्धा मे - जून २०२० लाआयोजित  केली होती .  यातील प्राप्त कविता विद्यार्थ्यांना आॕनलाईन माध्यमातून उपलब्ध करत लाखो विद्यार्थ्यांना लाभ झाला जवळजवळ १ ते १० वी १२० कविता या स्पर्धेत प्राप्त झालेल्या होत्या. 
    याच स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला होता तो शिक्षक श्री नितीन धामापुरकर यांनी . त्यांच्या गायन शैलीचा फायदा त्यांच्या विद्यार्थ्यांना ही झाला.


🌹लहान गटात द्वितीय क्रमांक💐
लोकमान्य मल्टीपर्पज को – ॲापरेटिव्ह सोसायटी यांच्यावतीने आयोजित वंदे मातरम् समूहगीत गायन आणि नृत्य स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत पाचवी ते सातवी या वयोगटात एकूण ७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर आठवी ते दहावी या वयोगटात एकूण ८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील शाळांनी आपला सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज को- ॲापरेटिव्ह सोलायटीकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील समूहगीत गायन स्पर्धेत लहान गटात श्री जनता विद्यालय तळवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून *नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे यांनी व्दितीय क्रमांक पटकावला आहे तर मोठ्या गटात नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला* असून व्दितीय क्रमांकाचे मानकरी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली ठरले आहे.


*नेमळे हायस्कुल च्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री आ भि राऊळ सर ,मुख्याध्यापिका सौ कल्पना बोवलेकर मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांचे, तबला साथीदार कुमार नीरज भोसले व मार्गदर्शक शिक्षक श्री नितिन धामापूरकर यांचे अभिनंदन केले*