डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्याची सुवर्णसंधी

 

आता पहा केंद्र प्रमुख पदासाठी अधिक माहिती...     

जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्याची पुन्हा एकदा संधी आली...
          

केंद्रप्रमुख परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होणार; जाणून घ्या परीक्षेसाठीची आवश्यक शैक्षणिक अर्हता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप...

केंद्रप्रमुख भरती



           महाराष्ट्र  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदेत  2384 केंद्रप्रमुख पदे भरली जाणार आहेत, त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा" या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन डिसेंबर 2023 मध्ये  करण्यात आले आहे.


अर्ज भरण्याचा कालावधी


        केंद्रप्रमुख परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दि. 01/12/2023 ते 08/12/2023 या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार आहेत. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती  www.mscepune.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


     IBPS कंपनीकडून नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्यासाठी आपली गुणवत्ता सिध्द करावी लागणार आहे.

 
     शासन निर्णय 27 सप्टेंबर 2023 नुसार विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेसाठी सुधारित नवीन अर्हता


         कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.


        आता सुधारित अर्हतेनुसार 50 वर्षे पेक्षा अधिक वय असलेले तसेच ज्यांना पदवीला 50 टक्के पेक्षा कमी गुण असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकही अर्ज करू शकणार आहेत. तसेच या पूर्वी अर्ज केलेले असल्यास पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही*

केंद्रप्रमुख वेतनश्रेणी : 9300 - 34800 ग्रेड पे वेतन - 4400


           केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी


     केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
         केंद्रप्रमुख पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.

         पेपर क्रमांक एकमध्ये  बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.   

 
     पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता


        बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.


पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह


1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4.अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5. माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6. विषयज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7.संप्रेषण कौशल्य  - 15 गुण


     एकूण - 100 गुण                         

पेपर 1+ पेपर 2=200 गुण


महागाई भत्ता वाढ .... ४% जुलैपासून ....

भविष्य निर्वाह निधीस मर्यादा | gpf limit |

 महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची भविष्य निर्वाह निधीची वार्षिक मर्यादा एका वित्तीय वर्षांत आयकर नियमावली,  दिलेल्या मर्यादेत (सद्यस्थितीत रु. पाच लाख) सिमित ठेवण्याबाबत....


भारत सरकार कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय (पेन्शन आणि पेन्शन भोगी कल्याण विभाग) यांच्या संदर्भाकित क्रमांक १ येथील दिनांक १५/६/२०२२ च्या अधिसूचनेनाये, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी (केंद्रीय सेवा) १९६० मधील नियम क्रमांक ७, ८ व १० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने, केंद्र शासनाच्या धर्तीवर, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील नियम क्रमांक ८ मध्ये. "वित्तीय वर्षातील नियमित वर्गणी व थकबाकी मिळून येणारी रक्कम आयकर नियमावली, १९६२ च्या नियम ९(प). उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड () मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक नसेल, अशी सुधारणा तसेच अनुषंगिक नियम क्रमांक ७ व नियम क्रमांक ११ मध्ये सुधारणा संदर्भाकित क्रमांक ३ येथील दिनांक १८/०४/२०२३ च्या अधिसूचनेन्वये करण्यात आली आहे.

२. केंद्र शासनाने संदर्भाकित क्रमांक २ येथील दिनांक ११/१०/२०२२ च्या कार्यालयीन आदेशान्वये भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराची वित्तीय वर्षातील मासिक वर्गणी व त्या वित्तीय वर्षातील थकबाकीसह येणारी रक्कम आयकर नियमावली, १९६२ च्या नियम (घ) उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड ) मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा (सद्यस्थितीत रु. पाच लाखा अधिक नसावी याबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व मंत्रालय/विभागांना त्यांच्या अधिनस्त कार्यालयांच्या तसेच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याबाबत देण्यात आल्या आहेत.


3. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मध्ये अधिसूचना दिनांक १८/०४/२०२३ नुसार


सुधारणा केल्यावर केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या धर्तीवर पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. (अ) भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराची वित्तीय वर्षातील मासिक वर्गणी व त्या वित्तीय वर्षांतील थकबाकीसह येणारी रक्कम आयकर नियमावली, १९६२ च्या नियम (घ) उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड () मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा (सयस्थितीत रु. पाच लाख) अधिक नसावी.


वर्गणीदाराची महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीची वर्गणी जर रु.पाच लाखापेक्षा (नियमित वर्गणी थकबाकी रक्कम मिळून) कमी जमा झालेली असेल तर त्या वित्तिय वर्षांसाठी अशा वर्गणीदाराच्या बाबतीत उर्वरित महिन्यांसाठी वर्गणी जमा करताना एकूण वर्गणी रु.पाच लाखाच्या मर्यादेतच जमा करावी.


(क) तसेच उर्वरित महिन्यांसाठी कमीत कमी ६% प्रमाणे वर्गणी जमा केल्यानंतर सदर वर्गणीची रक्कम रु. पाच लाखापेक्षा जास्त होत असेल तर उर्वरित महिन्यांची वर्गणी जमा करणे थांबवावे. अशा वर्गणीदारासाठी उर्वरित महिन्यांसाठी कमीत कमी ६ % वर्गणी वजा करावयाची अट शिथिल करण्यात यावी.


सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख


व कार्यालय प्रमुख यांनी उपरोक्त सूचना त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या तसेच भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या निदर्शनास आणावी.


४. हे परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २५८/२३/कोप्र. ५. दिनांक २०/११/२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.


 conclusion - सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२३५२०११५३८११४५०७ असा आहे.


 आदेश पहा...👇


gpf






जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत | inter district | transfer | ottmaha|

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत...inter district transfer


जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन दि. २१/०६/ २०२३ च्या शासन निर्णयान्वय तसेच दि. ०३/११/२०२३ रोजीच्या पत्रानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश देण्यात,
येत आहेत. (31) शासन निर्णय दि. ०७/०४/२०२१ मधील परिच्छेद क्र.२.१ नुसार जे शिक्षक कर्मचारी दि. ३० जून २०२३ रोजी बदलीस पात्र असतील, अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी..


तसेच सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असूनही रिक्त जागेअभावी त्यांना बदली मिळाली नव्हती. अशा शिक्षकांना सन २०२२ मध्ये भरलेल्यांना अर्जामध्ये जिल्हा बदलण्यास एडीट करण्यास संधी देण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे.
(क) मा. न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडील अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांना संधी देण्यात यावी. तथापि, असे करतांना संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन / विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जासोबत पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे.

उपरोक्त (अ) मधील नमूद बदलीपात्र शिक्षकांसाठी रोष्टर (बिंदुनामावली) प्रसिध्द करण्याची व अवलोकनाची कार्यवाही करावी. तसेच बदलीपात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्याची मुदत दि.०६/१२/२०२३ पर्यंत देण्यांत येत असून तद्नंतर बदलीची कार्यवाही सुरु करण्यात येईल. वरीलप्रमाणे सूचना सर्व संबंधितांना निदर्शनास आणून देण्याची व त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी. असे आदेशीत करण्यात आलेले आहे.

पहा ७/०४/२०२१ चे आंतरजिल्हा बदली धोरण....*👇

https://youtu.be/C2Nqoo0wihY




inter district transfer आदेश पहा...👇


आंतरजिल्हा बदली


केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा २०२३ | clusterhead | केंद्रप्रमुख परीक्षा |

 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ निवेदनाबाबत.....


महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१२/ टीएनटी १, दि. १५/०९/२०२२ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०१३ चे आयोजन डिसेंबर महिन्यात नियोजित असून ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२३ ते ०८/१२/२०२३ या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जातील त्यानुसार परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.


सदर प्रसिध्दीपत्रकास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी. असे पत्रात नमूद केलेले आहे.


संपूर्ण आदेश पहा...


केंद्रप्रमुख भरती परीक्षा




शासन निर्णय प्रयत्न" हा मराठी लघुचित्रपट दाखविण्याबाबत. | Praytn shortfilm | educational film |

 "प्रयत्न" shortfilm हा मराठी लघुचित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्याबाबत.

शासन निर्णय:-

श्री. अमर विक्रम घाटे, आर्ट फॅक्टरी एंटरटेनमेंट, पुणे यांनी "प्रयत्न" हा मराठी लघुचित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याची संदर्भाधीन दिनांक २८/०६/२०२३ च्या पत्रान्वये विनंती केली आहे. त्यानुसार संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये नमूद कार्यवाहीकरिता गठीत परिक्षण समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे.

अभ्यासात रस नसलेल्या आणि खोडकरपणा करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षक त्याच्या घरची

परिस्थिती समजावून घेवून, अभ्यासाचे वेगवेगळी अवघड कामे (टास्क) देऊन अभ्यासाच्या प्रवाह आणतात आणि अभ्यासाची गोडी वाढवतात तसेच प्रयत्न करणाऱ्यांपुढे नशिब सुध्दा हरते तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासात शिक्षकांबरोबर पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे हे या लघुचित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लघुचित्रपटात जोडलेल्या मुलाखतीवरुन विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर अधिकारी, वकिल, डॉक्टर होता येते ही प्रेरणा मिळणार आहे. आत्मविश्वास आणि अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी "प्रयत्न" हा लघुचित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थी / विद्यार्थिनींना दाखविण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४, २०२४-२५ करिता परवानगी देण्यात येत आहे.

अटी:-

१) "प्रयत्न" हा लघुचित्रपट राज्यातील शाळांमधील फक्त १० वर्ष वयोगटापुढील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्यात येत आहे...

२) सदर लघुचित्रपट पाहण्याची कोणत्याही विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येणार नाही.

३) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणताही अडथळा येणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

४) या शासन परवानगीच्या आधारे सदर लघुचित्रपट दाखविण्याबाबत इतर दुसऱ्या कोणत्याही संस्थेबरोबर श्री अमर विक्रम घाटे, आर्ट फॅक्टरी एंटरटेनमेंट, पुणे यांना करार करता येणार नाही किंवा प्रतिनिधी नेमता येणार नाही व तशी परवानगी त्यांना राहणार नाही.

(५) सदरहू लघुचित्रपट पहाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून रुपये २०/- (रुपये वीस फक्त) पेक्षा जास्त

शुल्क आकारता येणार नाही. ६) हा लघुचित्रपट शाळांमधून दाखविताना कोणत्याही प्रकारचा वाद उद्धभवल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास सदर संस्थेस दिलेली परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल.

(७) सदर लघुचित्रपट दाखविण्याची परवानगी शैक्षणिक वर्ष २०२३ २४ २०२४-२५ पुरतीच मर्यादित राहील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेताक २०२३११२४१४३८४०२३२१ • असा आहे.

प्रयत्न