डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्याची सुवर्णसंधी

 

आता पहा केंद्र प्रमुख पदासाठी अधिक माहिती...     

जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्याची पुन्हा एकदा संधी आली...
          

केंद्रप्रमुख परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होणार; जाणून घ्या परीक्षेसाठीची आवश्यक शैक्षणिक अर्हता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप...

केंद्रप्रमुख भरती



           महाराष्ट्र  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदेत  2384 केंद्रप्रमुख पदे भरली जाणार आहेत, त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा" या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन डिसेंबर 2023 मध्ये  करण्यात आले आहे.


अर्ज भरण्याचा कालावधी


        केंद्रप्रमुख परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दि. 01/12/2023 ते 08/12/2023 या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार आहेत. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती  www.mscepune.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


     IBPS कंपनीकडून नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्यासाठी आपली गुणवत्ता सिध्द करावी लागणार आहे.

 
     शासन निर्णय 27 सप्टेंबर 2023 नुसार विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेसाठी सुधारित नवीन अर्हता


         कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.


        आता सुधारित अर्हतेनुसार 50 वर्षे पेक्षा अधिक वय असलेले तसेच ज्यांना पदवीला 50 टक्के पेक्षा कमी गुण असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकही अर्ज करू शकणार आहेत. तसेच या पूर्वी अर्ज केलेले असल्यास पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही*

केंद्रप्रमुख वेतनश्रेणी : 9300 - 34800 ग्रेड पे वेतन - 4400


           केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी


     केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
         केंद्रप्रमुख पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.

         पेपर क्रमांक एकमध्ये  बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.   

 
     पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता


        बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.


पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह


1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4.अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5. माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6. विषयज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7.संप्रेषण कौशल्य  - 15 गुण


     एकूण - 100 गुण                         

पेपर 1+ पेपर 2=200 गुण


महागाई भत्ता वाढ .... ४% जुलैपासून ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: