डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.|teacher transfer|

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.


०२. शासन निर्णय दि. २१.०६.२०२३ अनुसार जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वी पासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी, अशी तरतूद आहे. नवीन शिक्षक भरती सुरु झाली असून जे शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित करावे, अशी मागणी उक्त निवेदनान्वये करण्यात आलेली आहे. याअनुषंगाने नमूद करण्यात येते की, शासन निर्णय दिनांक २१.०६.२०२३ मधील अ.क्र.२ अनुसार कार्यवाही होत नसल्याबाबत या विभागास अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अटी ग्राम विकास विभागाच्या सहमतीने दिनांक २१.०६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयामधील नमूद अ.क्र. २ अनुसार आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्यात यावेत, ही विनंती.पत्रात करण्यात आली.


आदेश पहा...





शालेय परिपाठ दिवस 189

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस189 वा*



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -७ मार्च २०२४

वार- गुरूवार

तिथी- माघ कृ ११ शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि १६ फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुरुवार, 07 मार्च 2024

सूर्योदय 06:53, 

खगोलीय दुपार: 12:49, 

सूर्यास्त: 18:46, 

दिवस कालावधी: 11:53, 

रात्र कालावधी: 12:07.


सुविचार

वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतो.

Good Thought

Wasted time spoils our future


दिनविशेष

१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.

special day

 1876: Alexander Graham Bell received a patent for the telephone.


म्हण/proverb

A fireband in the hand of madman -माकडाच्या हाती कोलीत


कोडे

चुरूचुरू बोलते

      आंबट, गोड सांगते

      तोंडाच्या खोलीत

      वळवळत बसते .


जीभ


सामान्य ज्ञान

०१) हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

- महात्मा गांधी


०२) भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली ?

- गोपाळ कृष्ण गोखले


०३) गीताई हा ग्रंथ कोणी लिहला ?

- विनोबा भावे


०४) सेवासदन ची स्थापना कोणी केली ?

- रमाबाई रानडे 


०५) एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला ?

- न्या.रानडे


बोधकथा


🌻हिऱ्यापेक्षा जनता श्रेष्ठ 🌻


एक राजा होता. त्‍याचे सुखी व संपन्न राज्‍य होते. दुर्दैवाने एकदा त्‍याच्‍या राज्‍यात पाऊसच पडला नाही. त्‍यामुळे दुष्‍काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्‍न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्‍याने त्‍याच्‍या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्‍या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परि‍स्थिती सांगा. तो राजा आपली अवस्‍था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्‍या बदल्‍यात त्‍याच्‍याकडून धान्‍य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्‍ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्‍हणाला,''माझे राज्‍य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्‍हा प्राप्‍त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्‍हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''

🌹तात्पर्य 🌹

आपल्या हाती सत्ता असेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल हे पाहणे इष्ट ठरते

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा|result|

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर  मूल्यांकन करण्यात आलेले आहे.


या संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राज्य पातळीवरील, विभाग पातळीवरील व राज्याच्या राजधानी मुंबई मधील विजेत्या शाळांसाठीचा पारितोषिक वितरण समारंभ मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (वित्त), मा. उपमुख्यमंत्री (गृह) व मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ५ मार्च २०२४ रोजी करण्यात येणार आहे. 

तरी "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानात राज्यस्तरावर, विभाग स्तरावर राज्याच्या राजधानी मुंबईमधील व राज्यातील अ व ब महानगरपालिका क्षेत्रांमधील विजेत्या नमूद ६६ शाळांच्या पारितोषिक वितरण समारंभास या विजेत्या शाळांमधील प्रत्येकी कमाल १० व्यक्ती उपस्थित राहू शकतील.



मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा निकाल





कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होणार|Ops|nps|

 १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या सरकारी-निमसरकारी कर्मचारी-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होणार


निधन झालेल्या कर्मचा-यांना


६० टक्के कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार


सुधारित योजनांची जबाबदारी पूर्ण करण्याकरिता कायमस्वरुपी विशेष राखीव निधी (Sinking Fund)


१८ वर्षांच्या प्रदिर्घ संघर्षानंतर कर्मचारी-शिक्षकांना मिळाला दिलासा ! त्याबद्दल शिंदे सरकारचे आभार


गतवर्षी मार्च २०२३ मध्ये बेमुदत संप करुन, १७ लाख कर्मचारी शिक्षकांनी सेवानिवृत्ती नंतरच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षितेकडे शासनाचा लक्षवेध करुन घेतला होता. शासनाने देखील भविष्यातील गंभीर समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याचे धोरण स्विकारुन संघटनेशी वाटाघाटी केल्या. त्यामुळे सौहार्दाचे वातावरणात शासनाने या १७ वर्षे प्रलंबित प्रश्नाचा गांभिर्याने विचार करुन, कर्मचा-यांना दिलासा मिळेल अशा शिफारशी प्राप्त होतील या उद्देशाने "सुबोधकुमार अभ्यास समितीची स्थापना केली. सदर अभ्यास समितीने काही महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत. याबाबत संघटना प्रतिनिधींशी, अपर मुख्य सचिव स्तरावर, दोन वेळा सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेत सुधारित पेन्शन योजनेचा विचार करताना कर्मचारी शिक्षकांवर १० टक्क्यांच्या अंशदानाची सक्ती असू नये अशी भूमिका सादर करण्यात आली. कमी सेवा असणाऱ्या मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास कमीत कमी रु. १०,०००/- पेन्शन मिळालीच पाहिजे असा आग्रह धरण्यात आला. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांस पुरेशी पेन्शन, उपदान, गट विमा, रजा रोखीकरण या सुविधा सर्वांना मिळाल्या पाहिजेत, असा रास्त आग्रह धरण्यात आला. या सुचीत मुद्यांवर विचार केला जाईल असे यावेळी शासनाच्यावतीने आश्वस्त करण्यात आले.


आज विधीमंडळात शासनाने जुन्या पेन्शन प्रमाणे, जुन्या पेन्शन इतक्या रक्कमेची, म्हणजेच कर्मचारी- शिक्षकांच्या निवृत्ती दिनांकी असलेल्या मूळ वेतनाच्या ५० टक्के अधिक तत्कालीन महागाई भत्ता, देण्याविषयक धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे. निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस सुध्दा ६० टक्के पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महत्वाचा निर्णय घेताना अंशदानाचा (Contribution) शासनाचा वाटा १४ टक्के व कर्मचाऱ्याचा वाटा १० टक्के ही बाब कायम ठेवण्यात आली आहे.


सिकींग फंड, शासनाचे अंशदान १४ टक्के व कर्मचाऱ्याचा वाटा १० टक्के यामुळे जो निधी संचित होईल त्यातून कर्मचारी-शिक्षकांना जुन्या पेन्शन प्रमाणे दरमहा रक्कम अदा करणे सुलभ होणार आहे. अंशदान संचयाच्या या योजनेतूनच सरकारी कर्मचा-यांना पेन्शन दिली जाणे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या वाढीव खर्चामुळे शासन डबघाईस येईल या अंदाजाला सपशेल मुठमाती देणे होय. शासनाच्या १४ टक्के कर्तव्य वाटयात व आमच्यासाठी आम्ही दिलेल्या १० टक्के वाटयातून जी रक्कम उभी राहणार आहे त्यातूनच "जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन" हा जटील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होणे हे शासन व संघटना या दोनही बाजूंसाठी हितकारक आहे. आर्थिक संकटाचा बाऊ करणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे.

आज जनमानसात लोकप्रिय स्थान प्राप्त केलेल्या "मा. एकनाथराव शिंदे" सरकारने विधीमंडळात जो निर्णय घोषित केला आहे त्यामुळे कर्मचारी-शिक्षकांना १८ वर्षानंतर सुधारित निवृत्ती वेतन प्रणालीत खालील लाभ प्राप्त होणार आहेत.


१.


सद्या कार्यरत असणाऱ्या कर्मचा-यांपैकी ज्यांना NPS प्रणाली मध्ये निवृत्तीवेतन घ्यायचे आहे किंवा राज्य


शासनामार्फत सुरु होणाऱ्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हावयाचे आहे याबाबत विकल्प द्यावा लागेल. २. राज्याच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेनुसार कर्मचाऱ्याची २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह अनुज्ञेय राहील.


३. २० वर्षापेक्षा कमी सेवा होऊन सेवानिवृत्ती होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह दिले जाईल.


४. सेवेत असताना निधन पावल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांस कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर केले जाईल. (महागाई भत्त्यासह)


५. सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्युनंतर त्याला निश्चित होणा-या निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून अदा करण्यास मान्यता.


६. या योजनेसाठी संचालक, लेखा व कोषागारे यांच्या अंतर्गत स्वतंत्र निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येईल.


७. राजीनामा दिलेल्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील.


८. असेल. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा नवा पर्याय खुला


९. ज्यांना पेन्शन नको असेल, अशा कर्मचा-यांना एकरकमी देण्याचाही पर्याय सरकारने खुला ठेवला आहे.


१०. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर,


११. अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय.


१२. गट विमा योजनेची रक्कम अनुज्ञेय.


सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक श्री. विश्वास काटकर यांनी शासनाने सुधारित पेन्शन योजनेबाबत घोषित केलेल्या निर्णयाचे सावधतेने स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, शासनाने कर्मचाऱ्याच्या संचित १० टक्के अंशदानाचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. निवृत्त होणा-या संबंधित कर्मचा-यास या १० टक्के संचित रक्कमेतून जीवन वेतन म्हणून किमान ६० टक्के परतावा मंजूर करणे न्यायाचे ठरेल. सदर परताव्याची रक्कम मिळविणे ही मागणी पुढील संघर्षास कारणीभूत ठरु शकते.


जय संघटना.


विधासभाटक (विश्वास काटकर)


निमंत्रक, समन्वय समिती, महाराष्ट्र-सञ्ज्य तथा सरचिटणीस, मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र मोबा. ९८२१००४२३३


शालेय परिपाठ दिवस १८४ वा/school assembly/good thoughts/moral story/

चला सोपा करूया परिपाठ

दिवस184वा



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -१मार्च २०२४

वार- शुक्रवार

तिथी- माघ कृ ६ शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि १० फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

शुक्रवार, 01 मार्च 2024

सूर्योदय 06:58, 

खगोलीय दुपार: 12:51, 

सूर्यास्त: 18:44, 

दिवस कालावधी: 11:46, 

रात्र कालावधी: 12:14.

सुविचार

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं

आणि दुसरी भेटलेली माणसं.


Good Thought

If you believe in yourself, everything is possible.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिनविशेष

१९५८: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात


१९८३: भारतीय बॉक्सर मेरी कॉम यांचा जन्म.


1958: Commencement of construction of Koyna Hydroelectric Project


 1983: Birth of Indian boxer Mary Kom.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

म्हणी

आठ हात काकडी नऊ हात बी

अर्थ एखाद्या गोष्टीची भरपूर स्तुती करणे


Proverb

Don’t bite the hand that feeds you.


Don’t treat badly the person or people on whom you depend on, or who take care of you in some way.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोडे

लाल गाय लाकुड खाय,

पाणी प्याय मरुन जाई.


⇒ उत्तर: आग


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


सामान्य ज्ञान

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग


त्र्यंबकेश्वर नाशिक

घृष्णेश्वर औरंगाबाद

भीमाशंकर पुणे

परळी वैजनाथ बीड

औंढा नागनाथ हिंगोली

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बोधकथा


दिल्ली शहरात हिराचंद या नावाचा एक व्यापारी होता. सकाळी त्याच तोंड पाहिलं की दिवस वाईट जातो, असा त्याच्याविषयी लोकांचा दृढ समज झाला होता. अकबर बादशहाच्या कानी ही गोष्ट जाताच त्यानं या गोष्टीची प्रचीती घेण्यासाठी, एकदा त्याला सकाळी सकाळीच आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. योगायोग असा की, हिराचंद राजवाड्यातून निघून जाताच बादशहाच्य बेगमला सणसणून ताप भरला. स्वत: बादशहालाही अधूनमधून चक्कर येऊ लागल्यासारखं वाटून, त्याचा तोल जाऊ लागला, आणि त्यामुळं हकिमानं त्याला लंघन करण्याचा सल्ला दिला. दुपारपर्यंतचा काळ असा निघून गेला, आणि उन्हं ओसरताच राजस्तानातल्या एका राजाची बादशहानं जिंकून घेतलेला प्रदेश, पुन्हा त्या राजानं जिंकून घेतल्याची वाईट बातमी एका जासुदानं येऊन बादशहाला दिली.‘हा सर्व सकाळी सकाळीच झालेल्या हिराचंद व्यापाऱ्याच्या अपशकुनी दर्शनाचाच प्रताप आहे,’ असा समज होऊन, बादशहान त्याल फ़ाशीची शिक्षा फ़र्माविली. हिराचंदने बिरबलाची घेतली व आपले रक्षण करण्याची त्याच्याकडे याचना केली. बिरबलाने त्याला निश्चींत रहायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वेषांतर करुन, रस्त्याच्या कडेला जाऊन बसला, नित्याप्रमाणे बादशहा त्या रस्त्याने फ़िरायला जाऊ लागला. बादशहाला दुरुन येताना पाहताच बिरबल पळून जाऊ लागला. सेवकांनी त्याला पकडून बादशहाकडे हजर केले. बादशहानं पळण्याचं कारण विचारताच बिरबल म्हणाला, ‘खाविंद, काल सकाळी त्या हिराचंद व्यापाऱ्याचं दर्शन झाल्यामुळं आपला व आपल्या बेगमसाहेबांचा नुसता दिवसच वाईट गेला, पण आपलं दर्शन सकाळी झाल्यामुळे, त्या बिचाऱ्या हिराचंदावर मात्र फ़ाशी जाण्याचा प्रसंग आला आहे. तेव्हा त्या हिराचंदच्या दर्शनापेक्षा, आपलं सकाळी होणारं दर्शन हे कितीतरी पटीनं अधिक वाईट असल्यामुळे, ते टाळण्यासाठी मी पळून जात होतो.’ बादशहाने बिरबलाचे हे शब्द ऎकून जसे त्याला ओळखले, तशीच त्याने आपली चूकही ओळखली व हिराचंदला फ़र्मावलेली फ़ाशीची शिक्षा रद्द केली.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐