डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जिद्द अशी की नशीबी आलेल्या परिस्थितीवर मात|motivational|

 जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरापेटीत सापडलेल्या अनाथ मुलीची MPSC परीक्षेत बाजी...


जन्मतः अंध असल्याने आई- वडिलांनी जळगाव रेल्वे स्थानकावर कचरा पेटीत टाकून दिले होते. मात्र आता त्याच मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. विषम परिस्थितीला तोंड देत जिद्दीने अभ्यास करीत माला ही एमपीएससीच्या 'लिपिक 'गट क' मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

साधारण २० वर्षांपूर्वी दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नसलेली माला ही जळगाव येथील रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत आढळून आली होती. पोलिसांनी आई-वडिलांचा, नातेवाईकांचा शोध घेतला. परंतु शोध न लागल्याने तिला जळगाव येथील रिमांडहोम मध्ये दाखल करण्यात आले. तेथे दिव्यांगाच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने बालकल्याण समितीच्या आदेशान्वये पोलीसांनी तिला वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात दिले. शंकरबाबांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारुन माला हिला वडील म्हणून स्वतःचे नाव दिले. त्या आधारे तिचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला, इत्यादी कागदपत्राची पुर्तता करुन तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. अनाथ, बेवारस, दिव्यांग १२५ मुला-मुलींसोबत बालगृहात मालाचा जीवनप्रवास सुरू झाला. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मालाने शिक्षणही सुरू ठेवले.




येथील विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतून (व्हीएमव्ही) तिने कला शाखेची पदवी परीक्षा २०१८ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षणासाठी दर्यापूर येथील प्रा. प्रकाश टोपले यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आणि शिक्षणाची व्यवस्था केली. २०१९ पासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मालाची धडपड सुरू झाली. येथील युनिक अकेडमीचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनात मालाने एमपीएससी परीक्षेची तयार केली.

तिला या प्रवासात देखील विशेष मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक (टंकलेखक) परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिला एवढ्यावरच थांबायचे नाहीतर युपीएससी परीक्षा देखील यशस्वीपणे उत्तीर्ण करण्याचे तिचे स्वप्न आहे.



निवृत्त शिक्षकांना का? करावे लागले आंदोलन....

राज्यात rte घोटाळा |rte scam|

 राज्यामध्ये RTE घोटाळा....

गरजू वंचित आणि दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु केली. मात्र याच आरटीई योजनेचा गैरवापर करून आपल्या मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा म्हणून खोटी कागदपत्रं जमा करून वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Rte घोटाळा
Rte घोटाळा 


नागपुरात जातीचे खोटे दाखले आणि इतर खोटे डॉक्युमेंट्स बनवून नामांकित शाळांमध्ये आपल्या मुलांचे आरटीई अन्वये प्रवेश करून घेणाऱ्या 19 पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सिताबर्डी आणि सदर या दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत हे गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला.

प्रत्येक शाळेत निवडक जागा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. मात्र, याच जागांवरील प्रवेशात मोठा घोळ केला जात असल्याचे नागपुरात समोर आले आहे.या योजनेअंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सोय केली आहे.

मात्र नागपुरात 'आरटीई रॅकेट'सक्रिय असल्याचे समोर आले. आरटीई अंतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेश घेताना पालक बोगस कागदपत्रांच्या आधारे आपल्या पाल्यांचे प्रवेश करून घेत असल्याची तक्रार शिक्षण विभागाला मिळाली होती.पोलिसांनी केलेल्या चौकशीत नामांकित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्रासह इतर डॉक्युमेंट्स बोगस पद्धतीने तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात 17 पालकांविरोधात तर सदर पोलीस ठाण्यात 2 पालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....

जि.प. अमरावती मधील सेवानिवृत्त शिक्षक यांच्या मागण्या सी.ई. ओ. ना सादर |teachers protest|

जि.प. सेवानिवृत्त शिक्षक थेट धडकले मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प.अमरावती यांच्या दालनात....


          जि.प. अमरावती मधील सेवानिवृत्त शिक्षक आपल्या प्रलंबित मागणी साठी दिनांक 6 मे 2024 वार सोमवारला  आपल्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्ते रक्कम सह इतर मागणी साठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती यांची भेट घेतली असता. मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासना कडून मिळाल्यावरही प्रशासनाकडून सातव्या वेतन आयोगाच्या हप्ते रक्कम न मिळाल्यामुळे इतर मागणी सह आज दिनांक 20 मे 2024 वार सोमवारला सेवानिवृत्त शिक्षक मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. अमरावती यांच्या दालनात मोठ्या प्रमाणात धडकले होते.



मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी मा. शिक्षणाधिकारी साहेब , जि.प. अमरावती यांना त्वरित सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित मागण्या सोडविण्याचे आदेश दिले असून 24 मे 2024 वार गुरुवारला  सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागण्या खालील प्रमाणे होत्या.

प्रमुख मागण्या या होत्या....

1) सेवा निवृत्त शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते रक्कम त्वरीत वितरीत करण्यात यावी. 

2) सेवानिवृत्त शिक्षकांच्या  सातव्या वेतन आयोगाच प्रलंबित हप्ते रक्कम परत गेल्याने काही सेवानिवृत्त शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते रक्कम मिळणार नाही . अशा सेवानिवृत्त शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या हप्ते रक्कम मागणी त्वरीत करून लवकरात लवकर वंचित राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रक्कम मिळण्यात यावे .

3) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना गटविमा योजना रक्कमेच्या लाभापासून वंचित आहेत . त्यांना त्वरीत गटविमा योजनेचा लाभ त्वरीत मिळण्यात यावा. 

4) सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्यात एक तारखेस मिळण्यात यावे.

5) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांची उपदान रक्कम मिळाली नाही. करीता उपदान रक्कम त्वरीत उपलब्ध करून द्यावी.

6)अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी मिळाली नाही.त्यांना सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती नंतरची भविष्य निर्वाह निधी रक्कम त्वरीत उपलब्ध करून द्यावी.

7) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना 1  जुलै ची काल्पनिक वेतन न लागून त्यांना वेतन वाढ फरकाची रक्कम मिळाली नाही. त्यांना त्वरीत वेतनवाढ फरकाची थकबाकी रक्कम मिळण्यात यावी.

8) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना महागाई भत्याची एरीअर्स रक्कम मिळाला नाही. त्यांना महागाई भत्याची एरीअर्स त्वरीत मिळण्यात यावा.

9) प्रत्येक पंचायत समिती स्तरावर प्रत्येक महिन्यात निश्चित कोणत्याही एक तारखेस सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी पेन्शन अदालत चे आयोजन करण्यात याव.   याबाबत लेखी पत्र काढण्यात यावे.



10) प्रत्येक महिन्यात जिल्हा स्तरावर निश्चित कोणत्याही एक तारखेस सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात यावे. त्याबाबत लेखी पत्र काढण्यात यावे.

11) मा . शिक्षपाधिकारी (प्राथमिक विभाग ) जि .प . अमरावती यांच्या कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचे काम हे एकाच टेबलावर आहे. पण जिल्हातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावर कार्यरत शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक या दोघांचे काम सांभाळण्यासाठी वेगवेगळे क्लार्क आहेत . त्याच प्रमाणे मा.शिक्षणाधिकारी कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचे काम सांभाळण्यासाठी एक वेगळ्या क्लार्क ची व्यवस्था करावी . कार्यरत शिक्षकांचे काम सांभाळण्यासाठी दुसऱ्या क्लार्क ची व्यवस्था करावी सेवानिवृत्त शिक्षक व कार्यरत शिक्षकांचे काम एकाच क्लार्क कडे देण्यात येवू नये . त्यामुळे कामाचा गोंधळ निर्माण होत आहे .

12) जि . प . शिक्षक यांना सेवानिवृत्ती च्या दिनांकास सेवानिवृत्ती चे सर्व लाभ मिळणे बाबत .


     जिल्हा प्रशासनाने सेवा निवृत्त शिक्षकांच्या वरील समस्या न सोडविल्यास जिल्हातील जि .प . सेवानिवृत्त शिक्षक दि 30 मे 2024 वार गुरुवारला जिल्हा परिषद अमरावती समोर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन सत्याग्रह करतील . मा . मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब , जिल्हा परिषद , अमरावती यांनी दि 24 मे 2024 ला सभेचे आयोजन करून सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे . आजच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर समश्या मांडण्या करीता सत्येंदु अभ्यंकर सर, प्रभाकर देशमुख सर, विनोद कुऱ्हेकर सर, श्याम पाटील सर, ॲड .सौ .निता प्रफुल्ल कचवे मॅडम , सौ अश्विनी देशमुख मॅडम, श्रीमती शोभा मेहरे मॅडम ,अजमत उल्ला खान सर, मिलींद लबडे सर, अरविंद महल्ले सर, वासुदेव रेचे सर ,प्रकाश डोंगरे सर, मुनेश्वर उमप सर, कु सुनंदा चांगोले मॅडम , मनोहर चर्जन सर, जावेद अहमद खान सर, प्रशांत गुल्हाणे सर, हरी कपले सर, अरुण धांडगे सर, साहेबराव काळेमघ सर, प्रमोद डहाणे सर, चंद्रकांत शंके सर , राजेंद्र खरकाळे सर, सौ अनिता कापडे मॅडम , सुरेश रायपुरे सर, दिनेश कनेटकर , भास्कर गजभिये सर, संदीप मेहरे सर , राहुल शेंडे सर, उद्धव दहाट सर , . डि. व्ही. राऊत सर , रणजीत नितनवरे सर , रामचंद्र गजभीये सर, सौ कुल्हे मॅडम , सौ . नलिनी लंगटे मॅडम , सुनंदा गोहत्रे मॅडम, शालीनी नागपुरे मॅडम , दिपक मुळे सर , राजु खरकर सर , पुंडलीक वितोंडे सर, देविदास उमप सर, मो . शकील मो रहेमान सर, आर . बी . नितनवरे सर, सौ . इंद्रकला गजभीये मॅडम , मसुद अहमद सर , आर एन . पापळीकर सर , सुरेंद्रनाथ वाडेकर सर , धनराज साखरे सर, विलास गावनेर सर, निरंजन राऊत सर, संजय कुकटकर सर , सुरेंद्रनाथ वाडेकर सर , अनिल ढोके सर , दिलीप चौधरी सर , सुरेश राहाटे सर , राजु भाकरे सर व शेकडो सेवानिवृत्त शिक्षक हजर उपस्थित होते .

शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....


वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी बाबत महत्त्वाचे

 वरिष्ठ वेतन श्रेणीतील त्रुटी बाबतच्या न्यायालयीन निर्णयाच्या...

 कोर्टाच्या अवमान बाबतची कार्यवाही  करण्यात येऊ नये सचिवस्तरावरून औरंगाबाद खंडपीठ येथे त्याबाबतचे पत्र सादर करण्यात आले आहे.

वेतनत्रुटीबाबतचा प्रस्ताव दि.०६.०५.२०२४ रोजी अध्यक्ष, वेतनत्रुटी निवारण समिती, वित्त विभाग यांचेकडे सादर करण्यात आला आहे.

तरी सदर प्रकरणी मा. न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येवू नये, अशी आपणांस विनंती करण्यात येत आहे.






जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....



१२ वी परीक्षेचा निकाल संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी |hsc result|

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या निकालाबाबत


मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृ‌तु 27 संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


१. mahresult.nic.in


२. http://hscresult.mkcl.org


३. www.mahahsscboard.in


४. https://results.digilocker.gov.in


५. www.tv9marathi.com


६. http://results.targetpublications.org


परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्यर्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....


जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....