डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’|one-nation-one-subscriiption|

 पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक नवीन योजना सुरु केली आहे. ‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेवर सहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

one nation one subscription


ही योजना लागू झाल्यावर त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. देशातील १.८ कोटी विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ आणि संशोधकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजना काय?

‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजनेत देशभरातील सर्व विद्यापीठांना जोडण्यात येणार आहे. सर्व विद्यापीठे आपले संशोधन, जर्नल शेअर करणार आहेत. ते देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेत प्रमुख ३० आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशकांचा समावेश केला गेला आहे. केंद्र सरकार  , राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी लिहिलेले संशोधन लेख मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना होणार फायदा

‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजनेमुळे विद्यार्थ्यांना सहजपणे आंतरराष्ट्रीय जर्नलच्या प्रकाशकांचे संशोधन उपलब्ध होणार आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि संशोधकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील लेख आणि जर्नल उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या सर्व जर्नल डिजिटल प्रक्रियाच्या माध्यमातून विद्यापीठ अनुदान आयोग देशभरातील विद्यापीठे आणि स्वायत्त संस्थांना देणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशक १३ हजारापेक्षा अधिक ई जर्नल्स ६ हजार ३०० पेक्षा अधिक शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहचवली जाते.



एक जानेवारीपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया |teachers-online-transfer-intra-district|

 एक जानेवारीपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया


छ. संभाजीनगर यंदा शिक्षकांची बदली प्रक्रिया न झाल्याने पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक बदली प्रक्रियेची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाने जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

शिक्षक बदलीचे वेळापत्रक   


  • ■ १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी :

  • ■ बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्धी व आक्षेपांवर निर्णय 

  • ■ १ ते ३१ मार्च : समानीकरणाअंतर्गत व बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती निश्चित करणे.
  • ■ १ ते २० एप्रिल : बदलीसाठी आवश्यक डाटा तयार करीत उपलब्ध करणे
  • ■ २१ ते २७ एप्रिल : समानीकरणाअंतर्गत रिक्त पदे निश्चित करणे.


■ २८ एप्रिल ते ३ मे : विशेष संवर्ग शिक्षक भाग एक रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे व बदल्या करणे.

■ ४ ते १५ मे : विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे व बदल्या करणे.

■ १० ते १५ मे : बदली अधिकारप्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे.

■ १६ ते २१ मे : बदलीपात्र शिक्षकांच्या रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे.

■ २२ ते २७ मे : विस्थापित शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे.

■ २८ ते ३१ मे : अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. एक जानेवारी ते ३१ मेपर्यंत विविध टप्प्यांत ही प्रक्रिया

शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांसाठी धोरण निश्चित केले असून, त्यानुसार ही प्रक्रिया होत आहे.

सुरू राहील. ऑनलाइन पोर्टलद्वारे ही बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.

दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रियेसाठी संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करीत शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यावर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच, जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध सूचना जारी करावी असे आदेश शासनाने दिले आहेत.

बदली प्रक्रियेत समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाइल तयार करणे, अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यात दुरुस्ती करणे ही कार्यवाही २८ फेब्रुवारीपर्यंत अंतिम करावी.

बदली प्रक्रिया सुरू झाल्यावर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाइलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाइन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे, असे निर्देशही दिले आहेत.

मतदान केंद्राध्यक्ष (Presiding Officer) यांची मुख्य जबाबदारी |pro-presidingofficer-election-maharashtra|

 

मतदान केंद्राध्यक्ष (Presiding Officer) यांची मुख्य जबाबदारी म्हणजे मतदान प्रक्रियेचे नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी करणे.

 निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी याची काळजी घेणे त्यांचे काम असते. खालीलप्रमाणे त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत.


१. मतदान केंद्राची व्यवस्था     



मतदान केंद्रावर वेळेवर पोहोचून सर्व आवश्यक सामानाची तपासणी करणे.
ईव्हीएम/व्हीव्हीपॅट यंत्रे, मतदार यादी आणि इतर साहित्य योग्य पद्धतीने तयार करणे.
मतदारांसाठी प्रवेश, बसण्याची व्यवस्था, आणि गोपनीयता सुनिश्चित करणे.

२. मतदान प्रक्रियेचे संचालन


ठरलेल्या वेळेत मतदान सुरू करणे आणि नियोजित वेळेत संपवणे.
मतदानाच्या गोपनीयतेची हमी देणे.
फक्त पात्र मतदारांनीच मतदान करावे, याची खात्री करणे.

३. मतदारांची ओळख निश्चित करणे


मतदार यादीतील नाव आणि ओळखपत्र तपासणे.
मतदारांच्या नावावर योग्य चिन्ह (टिक) करणे आणि त्यांना मतदानासाठी परवानगी देणे.
डुप्लिकेट किंवा फसव्या मतदानास प्रतिबंध करणे.


केंद्राध्यक्ष संकलन प्रपत्र डाऊनलोड  करा...


४. मदत आणि समस्या सोडवणे


मतदारांना प्रक्रिया समजावून सांगणे, तसेच ज्यांना अडचण आहे त्यांना सहाय्य करणे.
मतदान केंद्रावर शांतता आणि सुव्यवस्था राखणे.

५. उमेदवारांचे प्रतिनिधी (एजंट्स) यांच्याशी समन्वय


मतदान एजंट्सना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित करणे.
सर्व उमेदवारांना समान वागणूक देणे आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावास टाळणे.

६. दस्तऐवज आणि अहवाल तयार करणे


मतदान प्रक्रियेचा सविस्तर नोंद ठेवणे.
मतदान पूर्ण झाल्यावर यंत्रे, अहवाल, आणि इतर साहित्य सुरक्षितपणे सील करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्द करणे.

७. तांत्रिक आणि इतर समस्या हाताळणे


मतदान यंत्रातील बिघाड असल्यास, ती तत्काळ दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना करणे.
कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास वरिष्ठांना कळवणे.


मतदान केंद्राध्यक्ष काम सोप्या पद्धतीने करण्यासाठी डाऊनलोड करा...




conclusion :

मतदान केंद्राध्यक्ष हा संपूर्ण मतदान प्रक्रियेचा प्रमुख असतो. त्याच्या कार्यक्षमता, पारदर्शकता, आणि जबाबदारीमुळे निवडणुकीतील निष्पक्षता आणि विश्वासार्हता सुनिश्चित होते.



विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुट्टीबाबत महत्त्वाचे आदेश

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुट्टीबाबत महत्त्वाचे आदेश

क्षेत्रिय स्तरावर दिनांक १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते.

२/- शासनाच्या संदर्भ क्रमांक १ मधील पत्रान्वये दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत. याबाबतीत असे कळविण्यात येते की, दिनांक १८/११/२०२४ व दिनांक १९/११/२०२४ रोजी शाळा सुरु राहतील. तसेच उक्त दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.

३/- केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापतक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील,


४/- केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी, तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


मुळ आदेश पहा...





संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत | pat-stars-chatbot-sankalitchachni|

संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत....


 STARS प्रकल्पामधील SIG-२ Improved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येणार आहे. 



उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे आयोजन दि. २२ ते २५ जुलै २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत. विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन

चाचणी-१ (PAT -२) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित


मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी -१ (PAT -२) ये गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकावी लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.


१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चाटबॉट मार्गदर्शिका लिंक - https://bit.ly/PATUserManual


तसेच राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. ११ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

२. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) गुणांची नोंद करणेसाठी लिंक - https://bit.ly/PAΤ-ΜΗ

उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ/माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT - २) घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.

तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे. असे आदेशात म्हटलेले आहे.


मुळ आदेश पहा...