डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

एक जानेवारीपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया |teachers-online-transfer-intra-district|

 एक जानेवारीपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया


छ. संभाजीनगर यंदा शिक्षकांची बदली प्रक्रिया न झाल्याने पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक बदली प्रक्रियेची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाने जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

शिक्षक बदलीचे वेळापत्रक   


  • ■ १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी :

  • ■ बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्धी व आक्षेपांवर निर्णय 

  • ■ १ ते ३१ मार्च : समानीकरणाअंतर्गत व बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती निश्चित करणे.
  • ■ १ ते २० एप्रिल : बदलीसाठी आवश्यक डाटा तयार करीत उपलब्ध करणे
  • ■ २१ ते २७ एप्रिल : समानीकरणाअंतर्गत रिक्त पदे निश्चित करणे.


■ २८ एप्रिल ते ३ मे : विशेष संवर्ग शिक्षक भाग एक रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे व बदल्या करणे.

■ ४ ते १५ मे : विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे व बदल्या करणे.

■ १० ते १५ मे : बदली अधिकारप्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे.

■ १६ ते २१ मे : बदलीपात्र शिक्षकांच्या रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे.

■ २२ ते २७ मे : विस्थापित शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे.

■ २८ ते ३१ मे : अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. एक जानेवारी ते ३१ मेपर्यंत विविध टप्प्यांत ही प्रक्रिया

शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांसाठी धोरण निश्चित केले असून, त्यानुसार ही प्रक्रिया होत आहे.

सुरू राहील. ऑनलाइन पोर्टलद्वारे ही बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.

दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रियेसाठी संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करीत शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यावर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच, जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध सूचना जारी करावी असे आदेश शासनाने दिले आहेत.

बदली प्रक्रियेत समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाइल तयार करणे, अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यात दुरुस्ती करणे ही कार्यवाही २८ फेब्रुवारीपर्यंत अंतिम करावी.

बदली प्रक्रिया सुरू झाल्यावर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाइलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाइन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे, असे निर्देशही दिले आहेत.

0 Comments:

टिप्पणी पोस्ट करा

याबाबत आपली काॕमेंट करा.