डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

सर्वेक्षणवर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा आक्षेप |zpschool-students-flntest|

 छत्रपती संभाजीनगर  विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाकडून पहिली ते तिसरीच्या विद्याथ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान पाहणी करण्यात आली.

मात्र विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पाहणी अहवालावर प्रश्नचिन्ह ?

 त्यात अनेक विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, हे सर्वेक्षण कधी व कशाच्या निकषावर करण्यात आले? अशी विचारणा खुद्द शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीच आक्षेप घेतला आहे. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सर्वेक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.



विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सर्वेक्षणानुसार, मराठवाड्यातील पहिली ते तिसरीच्या ३ लाख ७२ हजार ९७७ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १ लाख १४ हजार ७०१ विद्यार्थ्यांना मराठीसह इतर भाषेची छोटी, मध्यम व मोठी वाक्ये वाचता आलेली नाहीत. मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून असे सर्वेक्षण करण्यात आलेच नसल्याचे खुद्द अधिकारी व मुख्याध्यापक यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की केले तर कशाच्या निकषावर केले? दूसरे म्हणजे शिक्षण उपसंचालक कार्यालय व मराठवाड्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयाला याची माहिती कशी नाही? विभागातील मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनादेखील सर्वेक्षण कधी केले हे माहीत नसल्यामुळे सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 


conclusion :

डिसेंबर २०२३ मध्ये शासनातर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (स्लॅस) करण्यात आले होते. शासनाच्या स्लॅस सर्वेक्षण व विभागीय आयुक्त कार्यालयाने सादर

केलेल्या सर्वेक्षण अहवालात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामुळे कोणाचा अहवाल खरा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, विभागीय कार्यालयाने कशाच्या उद्देशाने सर्वेक्षण केले ? फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वेक्षण केले, एप्रिलमध्ये उन्हाळ्याच्या सुख्या लागल्या त्यानंतर १५ जून २०२४ मध्ये नवीन शैक्षणिक सत्राला सुरवात झाली. त्यानंतर ही मुले पुढील वर्गात गेली, त्यामुळे या सर्वेक्षणाचा काय फायदा झाला? विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादणूक जाणून घेण्यासाठी विभागीय कार्यालयाने पुन्हा सर्वेक्षण का केले नाही? फेब्रुवारी महिन्यात केलेले सर्वेक्षण नऊ महिन्यांनंतर म्हणजे डिसेंबरमध्ये प्रसार माध्यमांना देण्यामागचा उद्देश काय ? सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव या जिल्ह्याची आकडेवारी दिली; पण नऊ महिने झाले तरी बीड आणि लातूरची आकडेवारी का उपलब्ध नाही? असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालावर सर्वेक्षण कधी व कोणामार्फत केले? याचा कुठेही उल्लेख नाही. तसेच, त्याला विभागीय आयुक्तांचे कव्हरींग लेटरसुद्धा नाही, त्यामुळे या सर्वेक्षणाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

स्काऊट गाईड अनुरूप गणवेशाच्या शिलाईचा निधी उपलब्ध | zpschool-uniform-educational|

स्काऊट गाईड विषयास अनुरूप गणवेशाच्या शिलाईचा निधी उपलब्ध..

 सन २०२४-२५ मध्ये मे. पदमचंद मिलापचंद जैन यांचेकडून स्काऊट व गाईड या विषयास अनुरूप गणवेशाच्या कापडाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. या कार्यालयाचे संदर्भ क्र. १ नुसार स्काऊट गाईड विषयास अनुरूप गणवेशाच्या शिलाईबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी चर्चा करून स्थानिक परिस्थितीच्या अनुरूप कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच या कार्यालयाचे दिनांक १३/१२/२०२४ रोजीच्या संदर्भीय क्र. ४ अन्वये स्काऊट गाईड विषयास अनुरूप गणवेशाच्या शिलाईचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


उपरोक्त बाब विचारात घेता, मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण यांचे निर्देशानुसार दिनांक २६ जानेवारी, २०२५ पर्यंत सर्व गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड गणवेशाची शिलाई पूर्ण करून गणवेशाचे वितरण करण्यात यावे. याकरिता आपल्या स्तरावरून सुयोग्य नियोजन करून येत्या ३ आठवड्यामध्ये सदरची कार्यवाही पूर्ण करावी. असे आदेशात म्हटलेले आहे.


आदेश पहा...




फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत आजचा महत्वपूर्ण शासन निर्णय | dcps-nps-pension|

 फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत आजचा महत्वपूर्ण शासन निर्णय, फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत स्पष्टीकरण - 27 डिसेंबर 2024..


आजच्या शासन निर्णयातील ठळक मुद्दे:-

1) *NPS/DCPS खाते नसणाऱ्या मयत कर्मचाऱ्यांनाही फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी लागू..*

याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने द्वारे सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा करण्यात आलेला होता, त्याला यश प्राप्त झाले आहे.. त्यामुळे खाते नसलेल्या मयत कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी चा मार्ग मोकळा झाला आहे..


2) 31 मार्च 2024 शासन निर्णयानुसार ज्यांनी विकल्प दिले नव्हते आणि त्यांचा मृत्यू झाला अश्या कर्मचाऱ्यांना BY DEFAULT जुनी पेन्शन योजने अंतर्गत फॅमिली पेन्शन मिळणार.. 


3) ज्या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात फॅमिली पेन्शन साठी पात्र व्यक्ती नसतील ( पत्नी, लहान मुले) कुटुंब नसलेले कर्मचारी अश्या कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशन केलेल्या अन्य फॅमिली मेम्बर/व्यक्तीस उपदान (ग्रॅच्युटी) मिळेल..


4) राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळणार नाही.. 

खरं तर जुन्या पेन्शन धारकांना ही राजीनामा दिल्यावर ग्रॅच्युटी मिळत नाही, त्यासाठी 20 वर्ष सेवेनंतर VRS घेणे / सक्तीची सेवानिवृत्ती होणे आवश्यक आहे, 


NPS मध्ये स्वेच्छा निवृत्ती हा विषय सध्या तरी नाही, त्यामुळे त्यांना (राजीनामा दिलेल्या NPS धारकांना) ग्रॅच्युटी मिळू शकत नाही.. भविष्यात GPS/UPS अंतर्गत स्वेच्छा निवृत्ती लागू असल्यास अश्या प्रसंगी कदाचित ग्रॅच्युटि मिळू शकते, पण त्याबाबत GPS/UPS चे डिटेल शासन निर्णय आल्यावरच भाष्य करता येईल.. 


5) मयत कर्मचाऱ्यांचे फॅमिली पेन्शन प्रस्ताव सादर करतांना 31 मार्च 2023 GR मधील नमुना 2 व 3 प्रमाणित करून सादर करावा..


6) ज्यांचे मृत्यू 31 मार्च 2023 पूर्वी झाले आहेत, त्यांच्या बाबतीत फॅमिली पेन्शन प्रस्तावासोबत सानुग्रह अनुदान लाभ घेतला असल्या / नसल्या बाबतचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, तर ज्यांचे मृत्यु 31 मार्च 2023 नंतर झाले आहेत, त्यांच्या बाबत सदर प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही, कारण 31 मार्च 2023 नंतर सदर 10 लाख सानुग्रह अनुदान योजना/ gr बंद / रद्द करण्यात आलेली आहे.. 


7) वरिष्ठ कार्यालयाने महालेखागार कार्यालयाकडे संबंधित मयत कर्मचाऱ्याचा फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी प्रस्ताव पाठवतांना त्यापूर्वी कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्याची कर्मचारी हिस्सा रक्कम व त्यावरील व्याज कुटुंबास अदा करणे व शासन हिस्सा व त्यावरील व्याज शासन खात्यात वर्ग करणे आवश्यक आहे, व त्या रक्कमा अदा केल्याचे प्रमाणपत्र (लेखा शीर्ष सह सविस्तर ) पेन्शन प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.









महायुती सरकारचंखातेवाटप अखेर जाहीर | mahayuti-khatevatap-newminister|

 महायुती सरकारचं बहुप्रतिक्षित खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं हे कायम आहे. तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं देण्यात आलं आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यामुळे त्यांना दुय्यम दर्जाचं खातं देण्यात आलं आहे.

क्रमांकनावमंत्रिपदखाते कुठले?
1देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्रीगृह, ऊर्जा
2एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्रीनगरविकास
3अजित पवारउपमुख्यमंत्रीअर्थ
4चंद्रशेखर बावनकुळेकॅबिनेट मंत्रीमहसूल
5राधाकृष्ण विखे पाटीलकॅबिनेट मंत्रीजलसंधारण
6हसन मुश्रीफकॅबिनेट मंत्रीवैद्यकीय शिक्षण
7चंद्रकांतदादा पाटीलकॅबिनेट मंत्रीउच्च आणि तंत्रशिक्षण
8गिरीश महाजनकॅबिनेट मंत्रीआपत्ती व्यवस्थापन
9गुलाबराव पाटीलकॅबिनेट मंत्रीजलसंधारण
10गणेश नाईककॅबिनेट मंत्रीवने
11दादा भुसेकॅबिनेट मंत्रीशालेय शिक्षण
12संजय राठोडकॅबिनेट मंत्रीपाणीपुरवठा
13धनंजय मुंडेकॅबिनेट मंत्रीअन्न आणि नागरीपुरवठा
14मंगलप्रभात लोढाकॅबिनेट मंत्रीकौशल्यविकास
15उदय सामंतकॅबिनेट मंत्रीउद्योगमंत्री
16जयकुमार रावलकॅबिनेट मंत्रीएपीएमसी
17पंकजा मुंडेकॅबिनेट मंत्रीपर्यावरण
18अतुल सावेकॅबिनेट मंत्रीओबीसी
19अशोक उईकेकॅबिनेट मंत्रीआदिवासी विकास
20शंभुराज देसाईकॅबिनेट मंत्रीपर्यटन
21आशिष शेलारकॅबिनेट मंत्रीमाहितीआणि तंत्रज्ञान
22दत्तात्रय भरणेकॅबिनेट मंत्रीक्रीडा
23आदिती तटकरेकॅबिनेट मंत्रीमहिला आणि बालकल्याण
24शिवेंद्रसिंह राजे भोसलेकॅबिनेट मंत्रीसार्वजनिक विकास
25माणिकराव कोकाटेकॅबिनेट मंत्रीकृषिमंत्री
26जयकुमार गोरेकॅबिनेट मंत्रीग्रामीण विकास
27नरहरी झिरवळकॅबिनेट मंत्रीएफडीए
28संजय सावकारेकॅबिनेट मंत्रीवस्त्रोद्योग
29संजय शिरसाटकॅबिनेट मंत्रीसामाजिक न्याय
30प्रताप सरनाईककॅबिनेट मंत्रीवाहतूक
31भरत गोगावलेकॅबिनेट मंत्रीरोजगार
32मकरंद पाटीलकॅबिनेट मंत्री
33नितेश राणेकॅबिनेट मंत्रीमस्त्योद्योग
34आकाश फुंडकरकॅबिनेट मंत्रीकामगार मंत्री
35बाबासाहेब पाटीलकॅबिनेट मंत्रीसहकार
36प्रकाश आबिटकरकॅबिनेट मंत्रीकुटुंब कल्याण आणि आरोग्य
37माधुरी मिसाळराज्यमंत्री
38आशिष जयस्वालराज्यमंत्रीअर्थ, कृषि
39पंकज भोयरराज्यमंत्रीम्हाडा
40मेघना बोर्डीकरराज्यमंत्री
41इंद्रनील नाईकराज्यमंत्री
42योगेश कदमराज्यमंत्री

एक राज्य एक गणवेश योजना पुन्हा शालेय समितीकडे

एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत|uniform-school-zp|

 केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. सन २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येत आहे.



समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र शाळांतील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश' या संकल्पनेनुसार एक समान आणि एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय दि.०८ जून, २०२३, दि.१८ ऑक्टोंबर, २०२३ व दि.१० जून, २०२४ अन्वये देण्यात आल्या आहेत. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये केंद्रीकृत पध्दतीने मोफत गणवेश योजनेचा लाभ देताना आलेल्या अडचणी, उद्भवलेल्या तक्रारी त्यानुषंगाने मा. लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना इत्यादींनी मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पध्दतीने देण्यात यावा, अशी मागणी केली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अमंलबजावणी करण्याकरीता खालीलप्रमाणे करण्यात यावी.


१. मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणोच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी. त्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्यामार्फत विहित कालावधीत वर्ग करण्यात यावी. मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात.


२. 'एक राज्य एक गणवेश' या संकल्पनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना एक सारखे दोन गणवेश देण्यात येतील. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळया रंगाची हाफ पैंट/पँट अशी असावी. तसेच, विद्यार्थीनींच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा बाह्या असलेला गडद निळया रंगाचा पिनो-फ्राँक, आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाचा स्कर्ट तसेच, ज्या शाळांमध्ये विद्यार्थीनीना सलवार-कमीज असा गणवेश असेल तर गडद निळया रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज अशी असावी.

३. विद्यार्थीनीना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या गणवेशाच्या रक्कमेमध्ये राज्य शासनाने निर्धारित केलेल्या रंगानुसार इयत्तेनिहाय पिनो फ्रॉक, शर्ट स्कर्ट, सलवार-कमीज देण्याचा निर्णय घेण्याची व योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची राहील.


प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२२०१७४६१३७८२१ असा आहे.