डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

संवर्ग 1 व 2 बदली साठी नोंदणी प्रक्रिया|online-transfer-howtofillform|

 संवर्ग 1 व 2 बदली साठी नोंदणी  प्रक्रिया




*संवर्ग भाग 1 आणि संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी फॉर्म भरण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा*


👇🏼


https://ott.mahardd.com/


*Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा*


*आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा*


*मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात. त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 8 ऑप्शन दिसतील.*

*त्यापैकी आपण Intra District (जिल्हाअतंर्गत) या टॅब वर क्लिक केल्यानंतर त्याखालील Application (अर्ज) हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा*


*Open होणाऱ्या पेजवर आपणास* 

*1) संवर्ग भाग 1 अर्ज करा* 

(Apply Cadre 1)


*2) संवर्ग भाग 2 अर्ज करा* 

(Apply Cadre 2)

*असे दोन टॅब दिसतील*

*ज्या शिक्षकांना संवर्ग 1 मध्ये आपली नोंदणी करायची आहे त्यांनी 👉🏼संवर्ग भाग 1 अर्ज करा त्यावर क्लिक करा*


*अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी , अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल . असे disclaimer दिसेल त्या disclaimer च्या बाजूच्या बॉक्समध्ये टिक करा*


*त्याखाली आपणास आपले नाव ;आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल* 


*त्याखाली आपणास "बदलीतून सूट हवी आहे काय" हा टॅब दिसेल त्या टॅब वर क्लिक करा*

*क्लिक केल्यानंतर त्याखाली Yes व No हे दोन ऑप्शन दिसतील*


*जर आपणास बदलीतून सूट घ्यायची आहे म्हणजेच बदली करायची नाही अशा शिक्षकांनी Yes वर क्लिक करावे आणि ज्या शिक्षकांना बदली करायची असेल त्यांनी No वर क्लिक करावे*

*(या ठिकाणी लक्षपूर्वक Yes आणि No ऑप्शन निवडा येथे चुका होऊ शकतात)*

*त्यानंतर विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा या टॅब वर  क्लिक करा त्यानंतर आपणास, "self" व  "Spouse" असे दोन ऑप्शन दिसतील जर आपण स्वतः व्याधीग्रस्त असाल तर "self "आणि जर आपला जोडीदार आजाराने व्याधीग्रस्त असेल तर "Spouse" निवडा आपण drop down मध्ये जाऊन आपला संवर्ग 1 मधील जो उपप्रकार असेल त्यावर क्लिक करा (self मध्ये एकूण1 ते 14 उपप्रकार असतील Spouse मध्ये 15 ते 20 उपप्रकार असतील)* 


*(Yes ऑप्शन आपण निवडले तर आपले नाव पुढील कोणत्याही यादीमध्ये येणार नाही आणि No ऑप्शन निवडल्यास जर आपल्याला आपल्या प्राधान्यक्रमातून शाळा न मिळाल्यास आपली बदली पुढील संवर्गातून होऊ शकते)*


*आपण भरलेले दोन्ही ऑप्शन पुन्हा चेक करा व त्यानंतर खालील Submit  या बटन वर क्लिक करून आपली माहिती Submit करा* 


*Submit वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला ओटीपी मागितल्या जाईल तो ओटीपी टाका व त्यानंतर आपला फॉर्म सबमिट केल्या जाईल*


*अशाप्रकारे संवर्ग 1 चे शिक्षक आपला फॉर्म नोंदणी मोबाईल वरून करू शकतात*


ग्राम विकास विभागाचे विन्सीसला आदेश | teachers-transfer-ottmahardd-online|

कोर्ट निकालानुसार सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदलीमध्ये संवर्ग-३ मधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देणेबाबत.... ग्राम विकास विभागाचे विन्सीस ला आदेश


मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.

               

विषय :- रिट याचिका (स्टॅम्प) क्र. १६२१२/२०२५ व १६२२४ मध्ये मा. न्यायालयाने दि.३०.५.२०२५ रोजी व रिट याचिका (स्टॅम्प) क्र. १६२३६/२०२५ व १६२३५/२०२५ मध्ये दि.२.६.२०२५ दिलेल्या निकालानुसार सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदलीमध्ये संवर्ग-३ मधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देणेबाबत.

           

संदर्भ :- शिक्षणाधिकारी (प्राथ), जि. प.छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र. जिपछसं/शिक्षण/प्रावि-२/२०२५/११३६, दि.२.६.२०२५.


महोदय,


उपरोक्त विषयाबाबत शिक्षणाधिकारी (प्राथ), जि. प.छत्रपती संभाजीनगर यांनी संदर्भाधिन पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका (स्टॅम्प) क्र.१६२१२/२०२५ व १६२२४ मध्ये मा. न्यायालयाने दि.३०.५.२०२५ व रिट याचिका (स्टॅम्प) क्र. १६२३६/२०२५ व १६२३५/२०२५ मध्ये दि.२.६.२०२५ रोजी दिलेल्या न्याय-निर्णयानुसार याचिकाकर्त्या शिक्षकांना सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यामध्ये संवर्ग-३ मधुन बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी आपणांस विनंती आहे. तसेच मा. न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आदेश पहा.....




         

वेतनश्रेणी व इतर अनुषंगिक शिफारसी स्वीकृत करण्याबाबत शासन आदेश दिनांक २/६/२०२५|shashnnirnay-gr-vetantruti|

 वेतन त्रुटी निवारण समिती-२०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत.     


प्राथमिक पदवीधर शिक्षकावरील अन्याय दूर                                     वेतन त्रुटी निवारण समिती -  2024 च्या अहवालातील वेतनश्रेणी व इतर अनुषंगिक शिफारसी स्वीकृत करण्याबाबत शासन आदेश दिनांक - २/६/२०२५

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना उपरोक्त दि. ३० जानेवारी, २०१९ च्या शासन अधिसूचनेन्वये दि. १ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतनश्रेणी विहित करण्यात आली आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू केल्यानंतर वेतननिश्चिती व सुधारीत वेतनश्रेणीच्या अनुषंगाने काही त्रुटी निदर्शनास आल्या. तसेच सातव्या वेतन आयोगात प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत निर्माण झालेल्या त्रुटीच्या अनुषंगाने राज्यातील अनेक शिक्षकांनी मा. उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यापैकी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका क्र. १३०३१/२०२२. १३०३२/२०२२, ११५१८/२०२२. ११५१९/२०२२, १७३५/२०२३, १३०३३/२०२२, १०४९५/२०२२, १०४९६/२०२२, १०४९७/ २०२२, ५०४९८/२०२२ यांची एकत्रित सुनावणी झाली. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने तपासणी करुन शिफारशी करण्याकरीता वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक वेपुर -११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दि. १६ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयानुसार श्री. मुकेश खुल्लर,  सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ स्थापन करण्यात आली होती. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व अपर मुख्य सचिव (व्यय), वित्त विभाग हे या समितीचे सदस्य होते. समितीने आपला अहवाल शासनास दि.३१ डिसेंबर, २०२४ रोजी सादर केला आहे. सदर अहवालातील शिफारशींवर निर्णय घेण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुषंगाने सदर अहवाल मा. मंत्रीमंडळापुढे सादर करण्यात आला होता. मा. मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय :-             

शासनाने वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ ने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीं संदर्भात निर्णय घेतले आहेत. समितीच्या शिफारशी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबतचा तपशिल सोबतच्या जोडपत्र १ ते ३ मध्ये नमूद करण्यात आला आहे.

तसेच जोडपत्र १ मध्ये नमूद केलेले सुधारित वेतन स्तर दि. १ जानेवारी, २०१६ पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावेत आणि प्रत्यक्ष आर्थिक लाभ दि.१ जून, २०२५ पासून देण्यात यावेत, मात्र दि. १ जानेवारी, २०१६ पासून दिनांक ३१ मे, २०२५ पर्यंत कुठल्याही संवर्गाला वरील शिफारशींमुळे थकबाकी अनुज्ञेय ठरणार नाही. तसेच जोडपत्र १ मध्ये नमूद संवर्गातील जे कर्मचारी दि. १ जानेवारी, २०१६ ते दि.३१ मे, २०२५ या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील, त्या कर्मचाऱ्यांची दि.१ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतनसंरचनेत काल्पनिक वेतननिश्चिती करण्यात यावी. दि.१ जानेवारी, २०१६ ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्तिवेतन सुधारित करण्यात यावे. सुधारित निवृत्तिवेतनाचे प्रत्यक्ष लाभ दि.१ जून, २०२५ पासून देण्यात यावेत, त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञेय करण्यात येऊ नये.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०६०२१६३८३८४१०५ असा आहे.




शासन आदेश डाऊनलोड करा...

         


महाराष्ट्र शिक्षण सेवा ब मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली २०२५|gr-shashan-nirnay-officer-transfer-education|

 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-ब मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली २०२५


उपशिक्षणाधिकारी व तत्सम
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग


महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ हे दिनांक ०१ जुलै, २००६ पासून अंमलात आले आहेत. सदर अधिनियमातील कलम ४ (४) (दोन) व कलम ४ (५) मधील तरतुदीनुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याच्या लगतनंतरच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याच्या पूर्व मान्यतेने खालील तक्त्यात नमूद अधिकाऱ्याची विनंतीवरुन बदलीने त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या पदावर पदस्थापना करण्यात आलेली  आहे.




शिक्षक प्रोफाइल दुरुस्तीसाठी दिनांक 27 व 28 मे 2025 या दोन दिवसाचा कालावधी दिलेला आहे.

बदली अपडेट 2025



आज दिनांक 27 मे 2025 रोजी बदली पोर्टलवर शिक्षणाधिकारी लॉगिन मध्ये शिक्षकांची माहिती अपलोड करणे व असलेली माहिती दुरुस्त करणे यासाठी 28 मे 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.


त्याबरोबरच गटशिक्षणाधिकारी लॉगिन वरून शिक्षकांची प्रोफाइल माहिती एक्सेप्ट करण्यासाठी देखील दिनांक 28 मे 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.


बदली पोर्टलवर दिनांक 24 मे 2025 रोजी बदली पात्र,  बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षकांच्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.


परंतु मुदतीत याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये अनेक चुका लक्षात आल्यामुळे आता त्या चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांच्या प्रोफाईल मधील माहिती दुरुस्त करण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे.


अवघड क्षेत्रातील ज्या शाळा 2022 ला सुगम करण्यात आल्या अशा शिक्षकांना बदली अधिकार पात्र मधून एक संधी देण्याकरिता त्यांची पुरवणी यादी सुद्धा ज्या कार्यालयाची  अपलोड झालेली ती करण्याकरिता  गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन वरून करण्याकरिता लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.


शिक्षक प्रोफाइल दुरुस्तीसाठी दिनांक 27 व 28 मे 2025 या दोन दिवसाचा कालावधी दिलेला आहे.


अर्थात दिनांक 28 मे 2025 पर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या रिक्त पदांच्या व इतर याद्या पोर्टलवर पब्लिश होऊ शकतात.


बदली पोर्टल लिंक.    


https://ott.mahardd.com


 संचमान्यता सन 2023-24 व सन 2024-25 नुसार सर्व जिल्हा परिषदांनी रिक्त पदांची माहिती अद्ययावत करुन तयार ठेवावी. बदली प्रक्रिया करिता कोणती संच मान्यता घ्यावी याबद्दल अधिकृत सुचना दिलेली  नाही अधिकृत सूचना आरडीडी कडून प्राप्त झाल्यानंतर पोर्टल सुरु होताच सदर माहिती एक दिवसामध्ये भरुन पूर्ण करावी.*


मे.विन्सीस कडून बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येतील व बदलीची पुढील प्रक्रिया सुरु होईल.