🌷 *मुरूमखेडावाडी शाळेला विप्रो केअर बॕगलरु टिमची विशेष भेट*🌷💐
*छ. संभाजीनगर तालुक्यात दुर्गम क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणारी शाळा व सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त मुरूमखेडावाडी शाळेला बॕगलरू(बंगलोर) टीमने शाळेस भेट दिली या टीमच्या मुख्य HR मॕनेजर तसेच प्रोजेक्ट लिडर सोबत होत्या.*
*मुरूमखेडावाडी शाळेतील विद्यार्थींनींचे इंग्रजी वाचन करतांना त्यांनी ही इंग्रजी माध्यम शाळा आहे का? विचारणा केली तर १ ली २ री च्या विद्यार्थ्यांचे अक्षर व प्रगती पाहून त्या त्यांच्याजवळ जाऊन बसल्या .* *शाळेच्या सुंदर वातावरणातील बाग व घनवन हे सामर्थ्य क्षेत्र पाहून शाळा खूपच आनंददायी वातावरण देणारी आहे ही प्रशंसा ही त्यांनी केली.*
*येणाऱ्या काळात एका विशेष प्रोजेक्ट साठी मुरूमखेडावाडी ही शाळा आम्ही निश्चित करत आहोत. याबाबतीत बंगलरू येथे बैठक घेऊन आपणांस कळवू असेही टीमने म्हटले.*
*प्रकाशसिंग राजपूत व दिलीप आढे* *सहशिक्षक*
जि.प.प्रा.शा.मुरूमखेडावाडी, केंद्र करमाड , ता/ जि. छ. संभाजीनगर
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS)व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत.
दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से. अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे.
सदर समितीस तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीचे सांख्यिकीय, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिकदृष्टया विश्लेषण करून शासनास परिपूर्ण शिफारस / अहवाल सादर करण्यासाठी समितीस दिनांक १४.०६.२०२३ पासून पुढील दोन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो.चांगले किंवा वाईट या दोन्हीतील सापेक्ष संकल्पना आहेत. एखादी चांगली वाटणारी गोष्ट इतरांना चांगली वाटेल तसे नसते. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
बालवयापासून,आपल्या,आई-वडील,आजी,आजोबा इत्यादी कुटुंबातील मोठे आपल्याला जे संस्कार किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात.
मुरूमखेडावाडी शाळेत परिपाठात निश्चितच याचा सहभाग केलेला आहे.
मूल्यशिक्षणाचे एकूण दहा प्रकार आहेत.
1.नीटनेटकेपणा।Neatness.
प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अंतर्बाह्य चांगला बदल घडवून नीटनेटकेपणा हा महत्त्वाचा असून नीटनेटकेपणा म्हणजे,
एखाद्या व्यक्तीचे राहणीमान, बोलणे, वागणे, तसेच केशभूषा वेशभूषा किंवा घरातील आपल्या इतर कुटुंबातील व्यक्ती सोबत राहणे घरातील किंवा ऑफिसमधील, शाळेतील वस्तूंची योग्य व्यवस्थित मांडणी, आपले आचार, विचार योग्य रीतीने मांडणी नेटकेपणा ची सवय प्रत्येकाने आपल्या जीवनात लावली पाहिजे.
आपण आपल्या घरात कसे राहतो याचे मूल्यमापन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक समारंभ, कार्यक्रम या ठिकाणी आपण कसे वागतो, कसे बोलतो, यावर सुद्धा लक्ष देणे गरजेचे असते. यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामधील नीटनेटकेपणा ला महत्त्व आहे.
आपली विचारसरणी कशी आहे, यावर आपण विचार करणे गरजेचे आहे. "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" हे तत्व बाळगणे आवश्यक आहे. नीटनेटकेपणा हा दैनिक जीवनाचा भाग आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा ची सवय किंवा महत्त्व जाणून घेणे व अंगिकारने खूप महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर होतो.
त्यासाठी त्यांना बालवयात नीटनेटकेपणा चे महत्व पटवून देणे आवश्यक आहे. त्यामध्ये बोलणे,वागणे, वक्तशीरपणा या गोष्टीचा अंतर्भाव होतो.तसेच शाळेमधील वस्तूची, नीटनेटकेपणाने मांडणी करणे शाळेतील स्वच्छता करणे,गावातील,परिसरातील स्वच्छता करणे, घरातील वस्तूंची व्यवस्थित मांडणी करणे, इत्यादी या सर्व गोष्टी नेटकेपणा मध्ये येतात.
नीटनेटकेपणा मध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण विद्यार्थ्यांना सवयी लावू शकतो. नीटनेटकेपणा आणि टापटीपपना यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर, दप्तरा मधील वह्या व्यवस्थित लावणे, पुस्तक व्यवस्थित लावणे, कंपास पेटीतील साहित्य व्यवस्थित ठेवणे, आपल्या वस्तूची काळजी घेणे, तसेच आपल्या वस्तू खराब होणार नाहीत याकडे लक्ष देणे. इत्यादी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण नीटनेटकेपणा विद्यार्थ्यांमध्ये वाढ करू शकतो.
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र आपणासाठी घेऊन आला आहे....
इयत्ता पाचवी ते सातवी या महत्वपूर्ण इयत्तेसाठी स्वाध्याय पूर्ण करून घेणारे ॲप निर्माण केलेले आहे.
हे ॲप डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रचे तंत्रस्नेही सदस्य तथा कोल्हापूर डिजिटल समूहाचे जिल्हा प्रमुख श्री राजू खाडे यांनी निर्माण केलेल्या असून इयत्ता पाचवी, सहावी व सातवी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे .
सदरील स्वाध्याय अॕप खालील दिलेल्या वर्गानुसार आपण इन्स्टॉल करू शकता.