डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

How to Download SSC & HSC Marksheet in 2023

 10 वी 12 वी मार्कशीट डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत



How to Download SSC & HSC Marksheet in 2023





1) मार्केट डाउनलोड करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

2) येथे Create New Account वरती क्लिक करा.

3) येथे तुमची काही माहिती भरावी लागेल. ती भरून OTP टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या.

4) आता परत Boardmarksheet Maharashtra वेबसाईटच्या Home पेज वरती या.

5) येथे तुम्ही तयार केलेला User ID व Password टाका आणि Login करून घ्या.

6) तुम्हाला येथे दोन पर्याय दिसतील, 1) Verify SSC/10th Mark Sheet & Verify HSC/12th Mark Sheet

7) या दोघी पर्यायांपैकी तुम्हाला जे मार्कशीट डाऊनलोड करायचं असेल त्याच्यावर क्लिक करा.

8) येथे परत तुमची काही माहिती तुम्हाला टाकावी लागेल त्यानंतर Submit बटनावर क्लिक करा.

9) आता येथे तुम्ही तुमचं दहावी व बारावीचा मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.

10) डाउनलोड झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्याचा तुम्ही आता वापर करू शकता.

मुरूमखेडावाडी शाळेला विप्रो केअर बॕगलरु टिमची विशेष भेट

 

🌷  *मुरूमखेडावाडी शाळेला विप्रो केअर बॕगलरु टिमची विशेष भेट*🌷💐



*छ. संभाजीनगर तालुक्यात दुर्गम क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणारी शाळा व सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त मुरूमखेडावाडी  शाळेला बॕगलरू(बंगलोर) टीमने शाळेस भेट दिली या टीमच्या मुख्य HR मॕनेजर तसेच प्रोजेक्ट लिडर सोबत होत्या.*




     *मुरूमखेडावाडी शाळेतील विद्यार्थींनींचे इंग्रजी वाचन करतांना त्यांनी ही इंग्रजी माध्यम शाळा आहे का? विचारणा केली तर १ ली २ री च्या विद्यार्थ्यांचे अक्षर व प्रगती पाहून त्या त्यांच्याजवळ जाऊन बसल्या .*
*शाळेच्या सुंदर वातावरणातील बाग व घनवन हे सामर्थ्य क्षेत्र पाहून शाळा खूपच आनंददायी वातावरण देणारी आहे ही प्रशंसा ही त्यांनी केली.*




     *येणाऱ्या काळात एका विशेष प्रोजेक्ट साठी मुरूमखेडावाडी ही शाळा आम्ही निश्चित करत आहोत. याबाबतीत बंगलरू येथे बैठक घेऊन आपणांस कळवू असेही टीमने म्हटले.*

*प्रकाशसिंग राजपूत व दिलीप आढे*
      *सहशिक्षक*
जि.प.प्रा.शा.मुरूमखेडावाडी, केंद्र करमाड , ता/ जि. छ. संभाजीनगर 

स्वातंत्र्य दिन भाषणे independence day bhashan

 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र स्वातंत्र्य दिना निमित्त आपणासाठी घेऊन आलो आहे .



मुलांसाठी छोटी छोटी भाषणे जी की त्यांना वकृत्व कौशल्य विकास होण्यास उपयोगी पडणार आहे.


स्वातंत्र्य  दिन भाषण क्र. १  independence day


स्वातंत्र्य  दिन भाषण क्र. २  independence day



स्वातंत्र्य  दिन भाषण क्र. ३  independence day



स्वातंत्र्य  दिन भाषण क्र. ४  independence day




स्वातंत्र्य  दिन भाषण क्र. ५  independence day





स्वातंत्र्य  दिन भाषण क्र. ६  independence day


स्वातंत्र्य दिन चारोळी व शायरी independence day poem

 स्वातंत्र्य दिनासाठी खास डिजिटल समूह आपणांसाठी घेऊन आला आहे चारोळी व शायरी....




चारोळी independence day



स्वातंत्र्य दिन शायरी independence day


Dcps समितीस मुदतवाढ nps

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS)व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत.

दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से. अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे.
 सदर समितीस तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीचे सांख्यिकीय, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिकदृष्टया विश्लेषण करून शासनास परिपूर्ण शिफारस / अहवाल सादर करण्यासाठी समितीस दिनांक १४.०६.२०२३ पासून पुढील दोन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली  आहे.



सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०७२७१५२९४२०१०५ असा आहे. हा शासन निर्णय खालील प्रमाणे आहे.



.

सेतू उत्तर चाचणी डाऊनलोड setu chachni

 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र आपणासाठी घेऊन आला आहे. सेतु अभ्यासक्रम आधारित उत्तर चाचणी वर्गानुसार व विषयानुसार डाऊनलोड करा,

       सदरील चाचणी ही २७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घ्यावयाची असून इतरांना ही अवश्य शेअर करा. सेतू उत्तर चाचणी डाऊनलोड खालील टॕबला क्लिक करा. 






सेतू अभ्यास उत्तर चाचणी : मराठी माध्यम [Bridge Course Post Test : Marathi Medium]

अनु. क्र./Sr.No.
इयत्ता/Standard
गणित /Maths
मराठी/Marathi
इंग्रजी/English
विज्ञान/Science
सामाजिक शास्त्र /Social Science
1.
इयत्ता २ री
2.
इयत्ता ३ री
3.
इयत्ता ४ थी
4.
इयत्ता ५ वी
5.
इयत्ता ६ वी
6.
इयत्ता ७ वी
7.
इयत्ता ८ वी
8.
इयत्ता ९ वी
9.
इयत्ता १० वी

मुल्यशिक्षण moral story

 मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो.चांगले किंवा वाईट या दोन्हीतील सापेक्ष संकल्पना आहेत. एखादी चांगली वाटणारी गोष्ट इतरांना चांगली वाटेल तसे नसते. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यक आहे.

बालवयापासून,आपल्या,आई-वडील,आजी,आजोबा इत्यादी कुटुंबातील मोठे आपल्याला जे संस्कार किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात.

मुरूमखेडावाडी शाळेत परिपाठात निश्चितच याचा सहभाग केलेला आहे.



मूल्यशिक्षणाचे एकूण दहा प्रकार आहेत.


1.नीटनेटकेपणा।Neatness.

प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अंतर्बाह्य चांगला बदल घडवून नीटनेटकेपणा हा महत्त्वाचा असून नीटनेटकेपणा म्हणजे, 

एखाद्या व्यक्तीचे राहणीमान, बोलणे, वागणे, तसेच केशभूषा वेशभूषा किंवा घरातील आपल्या इतर कुटुंबातील व्यक्ती सोबत राहणे घरातील किंवा ऑफिसमधील, शाळेतील वस्तूंची योग्य व्यवस्थित मांडणी, आपले आचार, विचार योग्य रीतीने मांडणी नेटकेपणा ची सवय प्रत्येकाने आपल्या जीवनात लावली पाहिजे.

 

आपण आपल्या घरात कसे राहतो याचे मूल्यमापन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक समारंभ, कार्यक्रम या ठिकाणी आपण कसे वागतो, कसे बोलतो, यावर सुद्धा लक्ष देणे गरजेचे असते. यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामधील नीटनेटकेपणा ला महत्त्व आहे. 


आपली विचारसरणी कशी आहे, यावर आपण विचार करणे गरजेचे आहे. "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" हे तत्व बाळगणे आवश्यक आहे. नीटनेटकेपणा हा दैनिक जीवनाचा भाग आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा ची सवय किंवा महत्त्व जाणून घेणे व अंगिकारने खूप महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर होतो.


त्यासाठी त्यांना बालवयात नीटनेटकेपणा चे महत्व पटवून देणे आवश्यक आहे. त्यामध्ये बोलणे,वागणे, वक्तशीरपणा या गोष्टीचा अंतर्भाव होतो.तसेच शाळेमधील वस्तूची, नीटनेटकेपणाने मांडणी करणे शाळेतील स्वच्छता करणे,गावातील,परिसरातील स्वच्छता करणे, घरातील वस्तूंची व्यवस्थित मांडणी करणे, इत्यादी या सर्व गोष्टी नेटकेपणा मध्ये येतात. 


नीटनेटकेपणा मध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण विद्यार्थ्यांना सवयी लावू शकतो. नीटनेटकेपणा आणि टापटीपपना यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर, दप्तरा मधील वह्या व्यवस्थित लावणे, पुस्तक व्यवस्थित लावणे, कंपास पेटीतील साहित्य व्यवस्थित ठेवणे, आपल्या वस्तूची काळजी घेणे, तसेच आपल्या वस्तू खराब होणार नाहीत याकडे लक्ष देणे. इत्यादी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण नीटनेटकेपणा विद्यार्थ्यांमध्ये वाढ करू शकतो.