डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावा लागेल ऑनलाइन अर्ज |online leave application|

 

 १ एप्रिलपासून रजेसाठी ऑफलाइन अर्ज चालणार नाही; शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावा लागेल ऑनलाइन अर्ज



राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून रजा घ्यायची असल्यास त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यामुळे प्रचलित ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया कालबाह्य होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील आदेश आज (गुरुवारी) काढले आहेत.
राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकविषयक बाबीसंदर्भात ‘ई-एचआरएमएस’ (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधिनस्थ कार्यालयांचा (उदा. आयुक्तालय, संचालनालय इ.) समावेश या नवीन प्रणालीत करण्यात येत आहे. या प्रणालीवर सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकविषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ३ मार्च २०२३ च्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या आहेत. या नवीन प्रणालीमध्ये सुटी (leave) या पर्यायात रजेचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे.



आता ही नवीन प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित होण्यासाठी प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रजेचे अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकांनी त्यांच्याअंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी (खुद्द आणि क्षेत्रीय) यांना १ एप्रिलपासून त्यांच्या सर्व रजेचे अर्ज या नवीन प्रणालीमार्फतच करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही सामान्य प्रशासन विभागाच्या या आदेशात नमूद आहे.

रजेचा ऑफलाइन अर्ज चालणार नाही

सर्व विभागांनी त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रजा लेखे अद्ययावत ठेवावेत. कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाइन घेण्यात येऊ नयेत, अशा सूचना राज्यातील सर्व शासकीय विभागांना सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी दिनेश कदम- पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना यापुढे रजेचा अर्ज ऑनलाइनच करावा लागणार आहे. यामुळे कोणता अधिकारी, कर्मचारी रजेवर आहे, हे एका क्लिकवर समजण्यास मदत होणार आहे.



वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना|pat|

 नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत.


संदर्भ:

१. शासन निर्णय क्रमांक: आरटीई २०२२/प्र.क्र.२७६/एसडी.१ दि. ०७.१२.२०२३


२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/PAT संमू-२/२०२३-२४/११८२ दि. ०७.०३.२०२४


उपरोक्त विषयाच्या अनुशंगाने संदर्भ क्र. २ अन्वये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) (संकलित मूल्यमापन २) व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देणेत आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीतील अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत (संकलित मूल्यमापन - २)


२. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका, उत्तर पत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहेत.


३. संदर्भ क्र. २ नुसार दिनांक ०२.०४.२०२४ ते ०४.०४.२०२४ या कालावधीत संकलित मूल्यमापन - २ घेण्याचे नियोजन कळविण्यात आलेले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन - २ ही दि. ०४.०४.२०२४ ते ०६.०४.२०२४ या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे.

संकलित मूल्यमापन २ चे वेळापत्रक


विषय


दिनांक


इयत्ता निहाय परीक्षेचा वेळ (तीनही दिवसांसाठी)


अ. क्र.


प्रथम भाषा (सर्व माध्यम)


०४.०४.२०२४


१) तिसरी / चौथी स. ८.०० ते ९.३०



गणित (सर्व माध्यम)


०५.०४.२०२४


२) पाचवी / सहावी स. ८.०० ते ९.४५



३. इयता ३ री, ४ थी, ६ वी व ७ वी या इयत्तांना प्रथम भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या


संकलित मूल्यमापन -२ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या


इंग्रजी


०६.०४.२०२४


३) सातवी / आठवी - स. ८.०० ते १०.००



शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. ४. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील परंतु दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत.


५. संकलित मूल्यमापन २ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


• इयता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षाः


२. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयता पाचवी व आठवी करिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी.


४. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेणेत यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.


५. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाना PAT अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित मूल्यमापन २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासना मार्फत घेण्यात येणारी PAT३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे.






मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय|eknath shinde|

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहितेपुर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दोन्ही उपमुख्यमंत्री  यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.



👉 मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय 


✅ राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी


✅ तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार


✅ मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला


✅ १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.  


✅ संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार


✅ शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण 


✅ विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल


✅ पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.


✅ हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना


✅ संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार


✅ राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार


✅ ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान


✅ भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप


✅ संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार


✅ वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन


✅ राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर


✅ श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

जिल्हा परिषदेच्या आदेशामुळे हाफडे थांबला |zp school latest update|

 दि.16 मार्च 2024 पासून शाळा पुढील आदेशापर्यंत पूर्ण वेळ चालू ठेवणे बाबत.


वरील विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, सध्या वातावरणात पाहिजे तसा बदल झालेला नसल्याने दि. 16 मार्च 2024 पासून शाळेची वेळ अर्धवेळ न करता पुढील आदेशापर्यंत पूर्ण वेळ ठेवण्यात येत आहे. शाळेच्या वेळेत आपल्या स्तरावरुन कोणताही बदल करण्यात येवू नये.


तसेच परस्पर शाळेच्या वेळेत बदल केल्याचे आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापक / केंद्रप्रमूख यांच्यावर कार्यवाहीचा प्रस्ताव या कार्यालयास तात्काळ सादर करण्यात यावा. याची नोंद घेण्यात यावी असे आदेशात म्हटलेले आहे.




महागाई भत्तांमध्ये चार टक्के वाढ/da hike/4%da/

 महागाई भत्तांमध्ये चार टक्के वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे 

भारत सरकारच्या वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक 01/01/2024 E-II ( B) दिनांक 12 मार्च 2024 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवा मधील अधिकाऱ्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाही करीता अग्रेषित करण्यात आलेली आहे .

सदर केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या नमुद ज्ञापनानुसार दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेल्या 4 टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनांमध्ये नमुद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना लागू असणार आहेत , व त्यानुसार दिनांक 01 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहेत .

या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..




शिक्षकांना ड्रेस कोड लागू /teacher dress code/

 राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मागदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत.

शासन परिपत्रक:-

दिनांक: १५ मार्च, २०२४.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशतः अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. तसेच, जनमानसात त्यांचेकडे गुरु/मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांचेशी येत असतो. तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधितांच्या वेशभूषेवरुनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरुप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावर तसेच, त्यांचेसमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांचेवर होत असतो. ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरीता दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा याबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :-

) सर्व १ शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.

२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.

३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.

शासन आदेश पहा....

१) सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.
२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.

३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.

जागतिक किडनी दिन

 "जागतिक किडनी दिन"

 हा दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसन्या गुरुवारी साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू हाच आहे की, सर्वांनाच ह्या अवयवाविषयीची व आजारांची माहिती मिळावी, जेणे करून किडनीचे आजार टाळण्यासाठी किंवा आजार असल्यास त्याची योग्य काळजी घेण्यासाठी मदत मिळेल. यावर्षी हा दिवस आपण १४ मार्च रोजी साजरा करत आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीचे जागतिक किडनी दिनाचे ब्रीदवाक्य आहे "सर्वांसाठीच किडनीचे आरोग्य".



किडनी फेल होण्याची महत्त्वाची कारणे


> अनियंत्रित मधुमेह


>> अतिउच्च रक्तदाब


>> दुर्लक्षित मुतखड्याचा आजार


> लहान मुलांमधील मूत्रमार्गांचे आजार


>> पॉलिसिस्टीक किडनी डिसीज


>> दीर्घकालीन वेदनाशामक औषधांचे सेवन


किडनीचा आजार झाल्यास घ्यावयाची काळजी


काही विशिष्ट आजारांच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


किडनी रोगाची माहिती व प्राथमिक


निदान : चेहरा व पायावर सूज येणे,


उलटी मळमळ होणे, अन्नाची चव नसणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे, लघवीला त्रास होणे, रात्री वारंवार लघवीला जाणे, ही किडनीच्या आजाराची लक्षणे असू शकतात. असा त्रास असणाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. लघवीवाटे प्रथिने जाणे किंवा रक्तातील युरिया/ क्रिआटीनीनचे प्रमाण वाढणे हे किडनी विकाराचे लक्षण असते.


• उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी घ्यायची काळजी : वेळेवर औषधी घेणे, जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे, वर्षातून एकदा लघवी व रक्त तपासणे. कमी वयात उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यास किडनीची तपासणी करून घेणे.


• मधुमेहाच्या रुग्णांनी घ्यायची काळजी : औषधे व पथ्य पाळून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, दर तीन महिन्यांनी लघवीतील प्रथिनांचे प्रमाण तपासून घेणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार कमी होत असेल, तर किडनीच्या आजाराची शक्यता पडताळून पाहणे.


क्रोनिक किडनी फेल्युअरच्या रुग्णांनी घ्यायची काळजी


खाण्यातील पथ्ये पाळणे, नियमित औषधी घेणे व तपासणी करणे, जेणे करून डायलिसिस व किडनी प्रत्यारोपणाची गरज लांबणीवर टाकता येते.


• मुलांच्या मूत्रमार्गातील संसर्ग: वारंवार ताप येणे, वजन न वाढणे,लघवीमध्ये जंतुसंसर्ग होणे या लक्षणांची वेळेवर तपासणी करून योग्य उपचार केल्यास भविष्यातील किडनी फेल्युअर टाळता येते.


• मुतखडा व प्रोस्टेट ग्रंथीची सूत्र योग्य तपासणी व औषधोपचार करून कि घेणे, गरज असल्यास शक्रि उपचार करून घेणे, मुतखडा वारंवार होऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात पा पिणे, खाण्यातील पथ्य पाळणे


अचानक किडनी फेल झाल्यास


अति प्रमाणात जुलाब, मलेरिया, रक्तातील जंतुसंसर्ग, अतिरक्तस्याव,मूत्रमार्गातील अडथळे हे किडनी अचानक फेल होण्याची मुख्य करणे आहेत. या आजारांवर वेळीच व योग्य उपचार केल्यास किडनी कायमची फेल होणे टाळता येते.


• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा

वापर : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय


वारंवार वेदनाशामक औषधे घेणे हे किडनी फेल होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. काही आयुर्वेदिक औषधांमधील जड धातू किडनीवर कायम स्वरूपाचे परिणाम करू शकतात, अशी औषधे टाळावीत.


किडनी प्रत्यारोपण म्हणजे काय ?

ज्या व्यक्तीला किडनीचा आजार आहे म्हणजे क्रॉनिक किडनी स्टेज ५. अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये एका किड़नीदात्याकडून किडनी बसवली जाते.

share for care