डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

रखडलेल्या शिक्षक बदल्या आता मार्चनंतर.... #Teacher #transfer

 शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या लवकरात लवकर कराव्यात, असे निवेदन शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. 



यावेळी ग्रामविकास मंत्र्यांनी, बदल्या सॉफ्टवेअर टेंडरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. टेंडरिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल व मार्चमध्ये बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या होतील, अशी ग्वाही दिली.




शिष्टमंडळात शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, रवी अंबुले, जयप्रकाश हेडाऊ, शत्रुघ्न मरस्कोल्हे, असलम शेख, अमीर अली सिद्दिकी उपस्थित होते. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी, पोकळ बिंदू नामावलीनुसार आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांच्या बदल्या करणे, राज्य रोष्टर, विभाग रोष्टर एक करणे, 10 टक्केची अट रद्द करावी तसेच आदिवासी, नक्षलग्रस्त भागात सेवा करणाऱ्या शिक्षकांचा वेगळा संवर्ग निर्माण करणे, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या बदल्या विनाअट करणे, शिक्षणसेवक मानधन वाढवून 20 हजार करणे, पदोन्नतीची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा पाचवा टप्पा राबवावा, सर्व मुलांना मोफत गणवेश देण्यात यावेत.

खिन्न प्रवास भावनांचा.... नविन काव्यरचना... #Poem

 *खिन्न प्रवास भावनांचा*






खिन्न प्रवास भावनांचा....


विनी वेळ दुःख जणू जीवनास,

आता होत खिन्न प्रवास भावनांचा,

सामर्थ्य  हे उरत काट तरण्यास,

जागवी ध्यास मनास या साधनांचा



प्रफुल्लित होते ते ही काही क्षण 

उत्साही होते हे किती माझे मन,

नैराश्याशी होतो  जीवनी हा समर,

विचार आता तेथेच  गोते खात अन्



फिरलो जरा ध्येयापासुन अलगद 

वेचत होतो विजयाची सुमने अनंत,

तोल या जगण्याचा डगमगला जरी,

तग धरण्या ध्येर्य बांधले चिरंत,



हुरुप सदासर्वदा कसाच जागतो,

न मानुनी हार लढण्या जगतो,

सांभाळून बाजू असली जरी उणी,

स्वतःस लढाऊ बनवून तारतो....


       कवी

🖊️प्रकाशसिंग राजपूत🖊️

            औरंगाबाद  


माझे काव्यरंग पुस्तक Flipkart /Amazon  वर उपलब्ध ....नक्कीच खरेदी करा

Buy now


गीत अलंकारवर माझ्या रचना ऐकण्यास उपलब्ध चॕनलला सबस्क्राईब अवश्य करा...


युटूब चॕनल पहा.....



अशाच नवनविन काव्य रचना आपणांस उपलब्ध राहण्यासाठी लवकरच गीत अलंकार वेबसाईट उपलब्ध करून देत आहोत.... 




अनाथ झालेल्या १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ... #Exam fees

 शैक्षणिक प्रगतीस अडथळा न येऊ म्हणून  फी माफ केलेली आहे....



महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून, कोविड मुळे आपले पालक गमावलेल्या आणि  2021 - 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये १० वी आणि १२ वी परीक्षेत बसलेल्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ही माहिती शालेय शिक्षण मंत्री मा.प्रा.  वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली.  



   शैक्षणिक प्रगतीस अडथळा न येऊ म्हणून  फी माफ केलेली आहे....


   देशभरात  नव्हे तर संपूर्ण जगात  कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे हयात असलेले पालक किंवा कायदेशीर पालक,दत्तक पालक गमावले आहेत.  आर्थिक अडचणींमुळे, अशा विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा (दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) फी भरण्यात अडचण येऊ शकते.  त्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षा नाकारल्यास त्याची शैक्षणिक प्रगती खुंटून त्याचा पुढील प्रवास खुंटण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेत राज्य शासनाने  त्यामुळे, महाराष्ट्र राज्यातील अशा वंचित विद्यार्थ्यांचे मोठे हित लक्षात ठेवून , महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क माफ करण्यास मान्यता दिली आहे. गेल्या वर्षीच्या अहवालानुसार, 1742 मुले कोरोनामुळे अनाथ झाली.

   नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात सुप्रीम कोर्टात अनाथ मुलांची माहिती सादर केली होती.  आकडेवारीनुसार, मार्च 2020 पासून देशात एकूण 1742 मुले अनाथ झाली आहेत.  एन सी पी सी आर च्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या काळात देशातील सुमारे 7464 मुलांनी त्यांच्या पालकांपैकी एकास गमावला आहे.  

असे अधिकारी बदली होऊन गेल्यावर त्यांची उणीव भासणारच....

 💐💐🌹🌹🎁🌹🌹💐💐

 *निरोप समारंभ*

💐💐🌹🌹🎁🌹🌹💐💐

💐💐🌸🌸🦚🦚🌺🌺☘️☘️🌹🌹


 " आम्हा कर्तृत्वाची होती वट वृक्षसावली,
प्रोत्साहनाने सदा वाट नवी गावली,
आपल्या नसण्याने उणीव आता जाणवली,
आता कौतुकांच्या थापाची माळ नवी ओवली....


रमाड बीट च्या शिक्षण विस्तार  अधिकारी श्रीमती विद्या दीक्षित मॕडम यांची गंगापूर तालुक्यात बदली झाल्याने त्यांना करमाड केंद्रातर्फे भव्य निरोप समारंभ घेऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी केंद्रप्रमुख बनकरसाहेब, केंद्रिय मुख्याध्यापक सोनूनेसर तथा कुंभेफळ केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती शिंदेमॕडम उपस्थित होत्या . यावेळी मुरुमखेडावाडी शाळा तथा माझ्या वतीने आदरणीय दीक्षित मॕडम यांना माझ्या काव्यरंग पुस्तकाची भेट देण्यात आली.





    

🌹आमल्या करमाड बीट च्या शिक्षण विस्तार  अधिकारी आदरणीय श्रीम.विद्या दीक्षित मॕडम यांची गंगापूर तालुक्यात बदली झाल्यामुळे करमाड केंद्रातर्फे भव्य निरोप समारंभ घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

🌹याप्रसंगी केंद्रप्रमुख बनकर सर, केंद्रिय मुख्याध्यापक सोनूने सर, कुंभेफळ केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती शिंदेमॕडम उपस्थित होत्या. तसेच केंद्रातील सर्व शाळांचे  मुख्याध्यापक आणि करमाड शाळेतील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.

🌹याप्रसंगी सर्वात आधी मॅडमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व भेटवस्तू देण्यात आली. उपस्थित सर्वांचेही स्वागत करण्यात आले.

🌹श्री.राजपूत सर यांच्या काव्यरंग या काव्यसंग्रहाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

🌹श्रीम.फारुखी मॅडम, श्री.राजपूत सर, श्रीम.बोरसे मॅडम यांनी खूप छान प्रतिक्रिया दिली.

🌹आदरणीय बनकर सर आणि सोनुने सर यांनी आठवणींना उजाळा देत दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय हृदयस्पर्शी होत्या.

हे सर्व ऐकत असताना मॅडम खूपच भावनिक झाल्या होत्या.

मॅडम जेव्हा त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी उठल्या त्यावेळेस त्यांना गहिवरुन आले होते.त्यांनी बरेच अनुभव सांगितले, सर्वांना मार्गदर्शन केले.तसेच सर्वांसोबत फोटोही काढले.

🌹मॅडमला त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

🙏🏻🙏🏻🙏🏻


*प्रकाशसिंग राजपूत*
   सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी 

केंद्र करमाड, ता/जि.औरंगाबाद 


DRDO मध्ये १० वी पास विद्यार्थ्यांना नौकरीची संधी... #Jobs #drdo

 DRDO मध्ये १० वी पास विद्यार्थ्यांना नौकरीची संधी...


DRDO Recruitment 2021 जारी करण्यात आली आहे. विविध दहावी आणि ITI अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे.



 पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती अप्रेन्टिस ड्राफ्ट्समन (सिव्हिल) मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स ओ.एल टूल मेकॅनिक मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम मेकॅनिक (एम्बेडेड सिस्टम आणि पीएलसी) आर्किटेक्चरल असिस्टंट (सिव्हिल)- ओले घरकाम करणारा फिटर मशीनिस्ट टर्नर सुतार इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक (मोटार वाहन) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) संगणक आणि परिधीय हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल मेकॅनिक संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग बी असिस्टंट (COPA) डिजिटल छायाचित्रकार सचिवीय सहाय्यक लघुलेखक (हिंदी) Career Tips: Technology फिल्डमध्ये करिअर करायचंय? 'हे' कोर्सेस घडवतील करिअर शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार Stipend अप्रेन्टिस - 8050/- रुपये प्रतिमहिना ड्राफ्ट्समन (सिव्हिल) - 8050/- रुपये प्रतिमहिना मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स ओ.एल - 8050/- रुपये प्रतिमहिना टूल मेकॅनिक - 8050/- रुपये प्रतिमहिना मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम - 8050/- रुपये प्रतिमहिना मेकॅनिक (एम्बेडेड सिस्टम आणि पीएलसी) - 8050/- रुपये प्रतिमहिना आर्किटेक्चरल असिस्टंट (सिव्हिल)- ओले - 7700/- रुपये प्रतिमहिना घरकाम करणारा - 7700/- रुपये प्रतिमहिना फिटर - 8050/- रुपये प्रतिमहिना मशीनिस्ट - 8050/- रुपये प्रतिमहिना टर्नर - 8050/- रुपये प्रतिमहिना सुतार - 8050/- रुपये प्रतिमहिना इलेक्ट्रिशियन - 8050/- रुपये प्रतिमहिना इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - 8050/- रुपये प्रतिमहिना मेकॅनिक (मोटार वाहन) - 8050/- रुपये प्रतिमहिना वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) - 8050/- रुपये प्रतिमहिना संगणक आणि परिधीय हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल मेकॅनिक - 7700/- रुपये प्रतिमहिना संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग बी असिस्टंट (COPA) - 7700/- रुपये प्रतिमहिना डिजिटल फोटोग्राफर - 7700/- रुपये प्रतिमहिना सचिवीय सहाय्यक - 7700/- रुपये प्रतिमहिना लघुलेखक (हिंदी) - 7700/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो धक्कादायक! 'या' IT कंपन्यांवर आली संक्रांत; दर 5 पैकी 1 कर्मचारी देतोय राजीनामा अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 20 डिसेंबर 2021

पदनाम विवरण
या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेअप्रेन्टिस ड्राफ्ट्समन (सिव्हिल) मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स ओ.एल टूल मेकॅनिक मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम मेकॅनिक (एम्बेडेड सिस्टम आणि पीएलसी) आर्किटेक्चरल असिस्टंट (सिव्हिल)- ओले घरकाम करणारा फिटर मशीनिस्ट टर्नर सुतार इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक (मोटार वाहन) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) संगणक आणि परिधीय हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल मेकॅनिक संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग बी असिस्टंट (COPA) डिजिटल छायाचित्रकार सचिवीय सहाय्यक लघुलेखक (हिंदी)
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार Stipend7700/- - 8050/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.drdo.gov.in 

मुरुमखेडावाडी शाळेत पाखरं आनंदाने झेपावलीत....#back to school

 मुरुमखेडावाडी शाळेत पाखरं आनंदाने झेपावलीत....


मार्च २०२० नंतर  जवळजवळ २० महिन्यानंतर  १ ली ते ४ थी वर्ग सुरु झाले. 




      पहिला दिवस मुलांचा उत्साह गगन भरारी घेणाराच जणू...... हक्काची सुंदर  शाळा व येथे पाऊल पडले ते वेगळया विश्वात रमले...... 





        २४ पैकी  २२ विद्यार्थी उपस्थित होत. आज त्यांच्या हस्ते नविन संगणक उदघाटन ही झाले व डोंगराळ भागात गुगल सर्च इंजिन आता सज्ज झाला असून आता संपुर्ण जग हे वर्गात आल्याचे वाटू लागले. Skype चे ही दिमाखात खाते सुरुवात होत आता लवकरच जगवारी..... नवी गगन भरारी ही होणारच..... 

        



 *दिवसभराचा आनंद वेचल्यानंतर शाळा सुटल्यावर आमचा ग्रूप फोटो व त्यातील मुलांची प्रसन्नता मनाला भुरळ पाडणारीच आहे.....*

*थांबलो जरा आणखी  हरलो नाही,*
*उत्साह नवा दाटला मंत्र नवा जपला,*
*घेऊ तीच भरारी पंख हे पुन्हा पसरले,*
*सामना या भवितव्याचा नव्याने सजला....*



*प्रकाशसिंग राजपूत  व दिलीप आढे*

         सहशिक्षक 

  जि.प.प्रा.शा. मुरुमखेडावाडी ,

   केंद्र  करमाड, ता/जि औरंगाबाद

अक्षरगट निहाय डिजिटल शैक्षणिक साहित्य...#अक्षरगट

अक्षरगट निहाय डिजिटल शैक्षणिक साहित्य...


इयत्ता पहिली 

विषय- मराठी


अक्षरगट निहाय निर्मित शैक्षणिक साहित्य विषयीं थोडसं ...


मित्रांनो, अक्षरगट का असावी याची माहिती देण्यापूर्वी थोडं माहिती करून घेऊया. पुर्वी शिक्षक वर्णमालेतील वर्णाच्या क्रमाने मुलांना शिकवित असत. काहीतर वर्णमालेचं तक्ता भिंतीला टांगून ठेवायची आणि मुलांना अ अननस आ-आगगाडीचा या पद्धतीने शिकवायची. याप्रमाणे संपूर्ण वर्णमालेतील अक्षरे शिकवून झाल्यावर स्वरचिन्ह लावून अक्षरं शिकविली जात असे. तेव्हा बाराखडी. त्यामुळे मुले उशिरा शब्द वाक्य वाचायला शिकायची.




अक्षरगट का असावी याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजनानुसार अक्षरगटातील काही अक्षरे व काही स्वरचिन्ह परिचय करून मुलांना प्रारंभिक स्तरावरच स्वरचिन्हविरहित शब्द, वाक्ये व स्वरचिन्हयुक्त शब्द, वाक्य वाचनाचा सराव व्हावा यासाठी अक्षरगट असावे लागते. एका दृष्टीक्षेपात शब्द वाचन करता येणं हे खूप महत्त्वाचे असते. तसेच वाक्यांचा सुद्धा आहे. मुले वाक्य वाचन करताना एका दृष्टीक्षेपात वाक्य वाचायला हवं, असं जर होत नसेल तर वाक्य वाचन करताना त्या वाक्याचा अर्थ निसटून जाण्याची शक्यता असते त्यामुळे समजपुर्वक वाचनात अडथळा निर्माण होत असते. एक दोन अक्षरगट झाली की, त्यावर तयार होणारे वाचन पाठ वाचता यावे हेसुद्धा अपेक्षित आहे त्यानुसार पाठ्यपुस्तकात वाचनपाठाचा समावेश केलेला आहे.

इयत्ता पहिलीत ४ वाचनपाठात एकूण ९ अक्षरगट आहेत. जसजसे पुढे जाऊ तसतसे मुलांचे शब्द ज्ञान वाढत असते. त्या त्या अक्षरगटातील अक्षरे व स्वरचिन्ह व पुर्वीच्या अक्षरगटातील अक्षरे व स्वरचिन्ह घेऊन शब्द वाक्य तयार करून मुलांना वाचन व लेखन सराव करावा हे अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकात वाचन लेखनासाठी प्रातिनिधिक स्वरूपात मोजके शब्द वाक्यांचा समावेश असतो. पण शिक्षकांना भरपूर शब्द व वाक्यांचा वाचन लेखन सराव द्यावे लागते.

आपण यासाठी गडचिरोलीसह महाराष्ट्रातील पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या नवोपक्रमाने दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मिती करून शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांचे वाचन लेखन विकास व्हावा यासाठी अक्षरगट निहाय शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यात आली. सदर साहित्य शिक्षक लॅपटॉप, प्रोजेक्टर, संगणक, टॅब, स्मार्ट मोबाईल व मुद्रित साहित्य वापरता येईल.

शैक्षणिक साहित्य निर्मिती
 
श्री. वाल्मीक वन्नेवार
जि.प.प्रा. शाळा, कसुरवाही पं.स.- जि. गडचिरोली



 इयत्ता १ ली अक्षरगट डाऊनलोड करा....


अ.क्र.अक्षरगट क्रमांक डाऊनलोड 

1

अक्षरगट १   

Download  


2

अक्षरगट २  

Download


3

अक्षरगट ३  

Download


4

अक्षरगट ४  

Download


5

अक्षरगट ५ 

Download


6

अक्षरगट ६ 

Download


7

अक्षरगट ७  

Download










इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे....#school open



आता इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण: २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६




२. या विभागाच्या दिनांक ०७ जुलै २०२१ च्या परिपत्रकामध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर दि. १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका/नगरपंचायत/ ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.


२.१ सदर समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी असे आदेश काढण्यात आले. 



(i)  शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.


ii) सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. 


iii) विद्यार्थ्याच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.


(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.


(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे  विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत तसेच कोविंडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.


२.२) शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गाना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ.यासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.


२.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. 


२.४) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.


३. शासन परिपत्रक, दिनांक ७ जुलै, २०२१, दिनांक १० ऑगस्ट २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकातील •अतिरिक्त मार्गदर्शक सूचना एकत्रित करून वरील प्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे.


४. दि. १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा अशा सुचना देण्यात आल्या  आहे.


५. दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करण्याच्चे सुचविले आहे. भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावयाचा आहे. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा लागणार आहे. वरील मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड १९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करावयाचे आहे. 


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६



HammerHead अमर असलेल्या ह्या जीवा बद्दल तुम्हाला माहित आहे का.....

 अमर असलेल्या ह्या जीवा बद्दल तुम्हाला माहित  आहे का..... 


हॕमरहेड  Hammerhead worm हा एक विषारी प्राणी आहे परंतु याचा मानवाला थेट धोका नाही,


पृथ्वीवर करोडो जीव आहेत असे काही जीव आहेत त्यांना आपण कधीच पाहिलेले नसते  किंबहुना अचानक पहिल्यांदा नजरी पडल्यास आपण त्याबद्दल माहित करून घेण्यासाठी फार उत्सुक होऊन जातो. 
तर आज आपली उत्सुकता व माहिती वाढवणारी पोस्ट घेऊन आलो आहोत.




 Earthworm ची मोठ्या प्रमाणात शिकार करत असल्यामुळे  Earthworm हे वनस्पती साठी उपयुक्त आहे.


 आणि त्यांची संख्या hammerhead worm मूळ जर कमी झाली तर पर्यावरण संकटात येऊ शकते .


तसेच हा प्राणी संभाव्य अमर आहे. 


           याबद्दल व्हिडीओत अधिक माहिती पहा...

            

हा मला दोन चार दिवसापूर्वी सिल्लोड परिसरात आढळला होता. मला सुरुवातीला त्याची ओळख नव्हती नंतर त्याची ओळख झाली आणि त्याविषयी थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे सविस्तर माहिती आपण गुगलवर सर्च करून पाहू शकता.


       लेखन व व्हिडीओ निर्मिती 

                श्रीकृष्ण बडकसर 

ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना...#Obc student #education

 ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना


ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ "शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना" सुरू होणार आहे.



   ज्याचा फायदा ४०० विद्यार्थ्यांना होणार


 असून यासाठी  जवळपास ६ कोटीचा निधी तरतुद करण्यात आला आहे. याबाबत माहिती इ.मा.बहूजन कल्याण मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

   या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना राज्य अंतर्गत , देशातील तथा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम यावरील शिक्षण करीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.


या योजनेची राज्य व देश अंतर्गत शिक्षण घेण्याची कर्ज मर्यादा ही  महत्त्तम १० लाख तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम शिक्षण कर्ज मर्यादा २० लाख इतकी असणार आहे.


      या योजनेत बॕकेचा जास्तीत जास्त १२ % व्याज परतावा नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना होणार आहे.