डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

रखडलेल्या शिक्षक बदल्या आता मार्चनंतर.... #Teacher #transfer

 शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या लवकरात लवकर कराव्यात, असे निवेदन शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. 



यावेळी ग्रामविकास मंत्र्यांनी, बदल्या सॉफ्टवेअर टेंडरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. टेंडरिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल व मार्चमध्ये बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या होतील, अशी ग्वाही दिली.




शिष्टमंडळात शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, रवी अंबुले, जयप्रकाश हेडाऊ, शत्रुघ्न मरस्कोल्हे, असलम शेख, अमीर अली सिद्दिकी उपस्थित होते. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी, पोकळ बिंदू नामावलीनुसार आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांच्या बदल्या करणे, राज्य रोष्टर, विभाग रोष्टर एक करणे, 10 टक्केची अट रद्द करावी तसेच आदिवासी, नक्षलग्रस्त भागात सेवा करणाऱ्या शिक्षकांचा वेगळा संवर्ग निर्माण करणे, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या बदल्या विनाअट करणे, शिक्षणसेवक मानधन वाढवून 20 हजार करणे, पदोन्नतीची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा पाचवा टप्पा राबवावा, सर्व मुलांना मोफत गणवेश देण्यात यावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: