केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणेबाबत पत्र .
रिक्त पदांचा तपशिल संचालनालयास सादर करणेबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०९/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदयांनी केंद्र प्रमुखांची दिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५०: ५० भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
सदरील कार्यवाहीस काही कालावधी लागेल तो पर्यंत केंद्रप्रमुख भरती बाबतचे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय व दिनांक १० जुन २०१४ ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदूनामावलीनुसार ४० टक्के सरळसेवा व ३० टक्के विभागीय मर्यादित परीक्षेच्या रिक्त पदांचा तपशिल सदर पत्रासोबत जोडलेल्या विहित नमुन्यांत Excel शिट मध्ये उक्त माहिती संचालनालयास त्वरित उपलब्ध करुन द्यावी जेणेकरून केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करून आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे याना सादर करणे संचालनालयास सुलभ होईल..
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा