डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

पाढा आला नाही म्हणून हातावर चालवले ड्रील मशीन

 

विद्यार्थ्याला पाढा वाचता येत नाही म्हणून एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला शिक्षा देण्यासाठी त्याच्या हातावर ड्रिल मशीन चालवले.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये घडली. विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, शिक्षण अधिकार्‍यांची याची गंभीर दखल घेतली आहे.

कानपूरमधील प्रेमनगर य़ेथील प्राथमिक शाळेत विबान पाचवीच्या वर्गात शिकतो. त्याला दोनचा पाढा अनुज नावाच्या शिक्षकांनी वाचायला सांगितलं. त्‍याला पाढा वाचता आला नाही. संतापलेल्या शिक्षकाने मुलाच्या हातावर ड्रिल  मशीन चालवून त्याला जखमी केले, असा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला. ही घटना गुरुवारी दि.२४ नोव्हेंबर ला घडली. 

ही घटना विबानच्या घरी समजताच त्याच्या नातेवाईकांनी शाळेत गोंधळ घातला. प्रकरणाची माहिती शिक्षणाधिकारी Education officer यांना  मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून प्रकरणाची चौकशी केली.

विबानच्या हातावर शिक्षकाने ड्रिल मशीन चावले त्‍याच्‍या हातातून रक्‍त आल्‍यानंतर वर्गात एकच गोंधळ उडाला. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. बेसिक एज्युकेशन कौन्सिल एम्प्लॉईज युनियनचे विभागीय अध्यक्ष परवेज आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलासोबत झालेल्या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, गुरुवारी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष यादव रजेवर होते. सहायक शिक्षिकेच्या हातात चार्ज होता.

शाळेत बीएसए सुरजित कुमार यांच्या परवानगीने कौशल्य विकास योजनेंतर्गत मुलांना विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते, त्याचसाठी ड्रिल मशीन ठेवण्यात आले होते. परवेज आलम यांचा शिक्षकांशी संवाद झाल्यानंतर त्यांना समजले की, मुलाला दोनचा पाढा ऐकवला जात होता, मात्र त्याचे लक्ष नव्हते. त्यामुळे त्याला घाबरवण्याच्या उद्देशाने मशीन सुरू करण्यात आल्याची शक्यता आहे, परंतु मशीनमुळे मुलगा जखमी झाला.


वन्यजीवमंडळ, शास्त्रज्ञ उपक्रम

 जि.प,प्रा.शा. मुरुमखेडावाडी केंद्र करमाड ता/जि औरंगाबाद येथे Our knowledge zone अंतर्गत उपक्रम राबवीत आहोत.प्रकाशसिंग राजपूत व सहकारी शिक्षक दिलीप आढे

1) वन्यजीव मंडळ,
2) ग्रंथालय
3) शास्त्रज्ञ विषयक माहिती
4) परमवीरचक्र विजेते
5) आॕलंपिक पदक विजेते खेळाडू

#olympic #paramvir #scientist


उपक्रमाचा व्हिडीओ पहा....



*माझी शाळा माझे कॅलेंडर...डाऊनलोड करा👇*

              *2023*




*शास्त्रज्ञ व परमवीर चक्र विजेत्यांची जयंती साजरी करण्यासाठी उपयुक्त कॅलेंडर*


 *Pdf ची झेरॉक्स काढून शाळेत लावू शकता...*

झेडपी शाळा आता ग्रामपंचायत नियंत्रणाखाली

 

सरकार झेडपीच्या शाळा ग्रामपंचायतींच्या ताब्यात देणार असल्याची चर्चा आहे.



यासंदर्भात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मुंबईत याची माहिती दिली. तिसरीपासून आठवीपर्यंत परिक्षा नियमित घेतल्या जाणार आहेत, अर्थात नापास न करण्याची प्रक्रिया मात्र तूर्तास कायम ठेवली जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. सध्या हा सर्व प्रकल्प राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, लवकरच शिंदे- फडणवीस सरकार त्यावर निर्णय घेईल असे शिक्षणमंत्री  केसरकर यांनी  सांगितले.

केरळमध्ये शिक्षणाबाबत खूप चांगले व यशस्वी मॉडेल तयार करण्यात आले असून तेथे शाळा ग्रामपंचायतींकडे सोपवल्या आहेत. महाराष्ट्रातही ग्रामपंचायतींकडे शाळा सोपविण्याचा सरकारचा विचार आहे. त्यातून स्थानिक ठिकाणच्या समस्या व त्यावर स्थानिक ठिकाणचे नियंत्रण या महत्वाच्या गोष्टी घडतील.

 बदली अर्जबाबत...

सध्या झेडपीचे शिक्षक हे शाळा व्यवस्थापन समिती असली तरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी किंवा ग्रामस्थ.शिक्षक विद्यार्थीकेंद्रीत असतात, तिथे मात्र स्थानिक ग्रामस्थ व पालकांचे संबंध चांगले राहतात, त्याचा विचार करता शाळांमधील वातावरण स्थानिक ठिकाणच्या परिस्थितीनुसार सुरळीत राहण्यासाठी व शिक्षकांवर वेळेचे, अभ्यासाचे नियंत्रण राहण्यासाठी ग्रामपंचायतींकडील नियंत्रण महत्वाचे ठरेल असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

खोटी माहिती भरून बदली घेतल्यास

 *ग्रामविकासचे दि. 22/11/2022 चे पत्र*

*चुकीची माहिती देऊन, खोट्या कागदपत्राच्या आधारे बदली झाल्यास.......


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. तद्नंतर, दि. २१/१०/२०२२ व दि.१८/११/२०२२ च्या पत्रान्वये सन २०२२ मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही सुरु आहे. सदर सुधारित वेळापत्रकानुसार दि.१८/११/२०२१ ते दि. २२/११/२०२२ दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांनी संगणकीय बदली प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेले आहे. अशा शिक्षकांनी खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज सादर केले असल्यास व त्या आधारे अशा शिक्षकांच्या बदल्या झाल्या, तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणान्या खऱ्या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो. शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांनी सादर केलेल्या अर्जाच्या पडताळणीबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत-


१) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांर्गत बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर संवर्गीय शिक्षकांनी भरलेल्या अर्जाची काटेकोरपणे पडताळणी करण्यात यावी. संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतांनाही जाणिवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेले आढळल्यास नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी. सदर पडताळणीचे काम कोणत्याही परिस्थितीत दिनांक २२/११/२०२२ ते २४/११/२०२२ या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे.

२) पडताळणीअंती ज्या शिक्षकांनी जाणिवपूर्वक खोटया व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिध्द होईल. त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीतील संबंधित संवर्गातून बाद करण्यात यावा व अशा शिक्षकांविरुध्द शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करावी. मात्र, बदल्यासंदर्भात विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याची अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे. अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा अनुज्ञेय असणार नाही.

पत्र खालील प्रमाणे ...







बदली अर्जबाबत

 जिल्हा अंतर्गत बदलीतील पहिला टप्पा म्हणजे संवर्ग एक व दोनच्या बदल्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अर्जातू रद्द करावयाचे अर्ज याविषयीचा मार्गदर्शक व्हिडिओ  कडून देण्यात आलेला आहे .

यामध्ये कोणते अर्ज संवर्ग एक व दोन मध्ये रद्द करता येतील याविषयी मार्गदर्शन देण्यात आलेले आहे पूर्ण माहितीसाठी खालील व्हिडिओ अवश्य पहा व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा...

https://youtube.com/@DigitalSchoolGroup




कराhttps://youtu.be/FBWkRBhtoJo

 *अखेर बदली पोर्टल सुरू*

*खालील लिंकवर क्लिक करून आपण फॉर्म भरू शकता.*


https://ott.mahardd.in/



अजून ही आपण डिजिटल स्कूल चॕनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच  करा...


Subscribe Now





बदली सुधारित वेळापत्रक

 जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात आजच्या शासन निर्णयामध्ये बदल झालेला आहे.

 सदरील बदलीचे वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे .सलग तिसरे पत्र बदलीच्या वेळामध्ये बदल  बाबतीत आलेले आहे .

आपण खाली दिलेल्या  प्रमाणे हे पत्र पाहू शकतात






आजपासून संवर्ग १ व २ ची प्रक्रिया

 जिल्हांतर्गत बदल्यांमधील टप्पा क्रमांक एक व दोन च्या बाबतीत महत्त्वाची प्रोसेस आज पासून सुरू झालेली आहे यामध्ये आज स ११ वाजता रिक्त पदांची यादी सीईओ लॉगिन मधून प्रसिध्द होईल व त्यानंतर संवर्ग 1 व 2 साठी लॉगिन सुरू होणार आहे

आपल्या गटातील ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 1 अथवा विशेष संवर्ग भाग 2 मधून लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी लॉगिन करून कार्यवाही दि.18/11/2022 ते दि.20/11/2022 अखेरपर्यंत पूर्ण करावयाची आहे . 
ऑनलाईन अर्ज सादर करतांना  माहिती साठी Vensys कंपनी चा खालील  व्हिडीओ पहावा
.


शालेय पोषण आहार खात्याचे आॕडीट

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे महालेखापाल (AG) व स्थानिक निधी लेखा विभागामार्फत लेखापरिक्षण होत असते. तथापि, या विभागांमार्फत शाळांचे १०० टक्के लेखापरिक्षण होत नाही. सदरच्या लेखापरिक्षणाकरीता शाळांची निवड यादृच्छिक (random) पद्धतीने केली जाते. तसेच स्थानिक निधी लेखा परिक्षण • विभागामार्फत शासकीय अनुदानाचा लाभ घेणाऱ्या आस्थापनांचे लेखापरिक्षण व Test Audit करण्यात येते. शाळांच्या आकडेवारीचा विचार करता दरवर्षी ३८ टक्के शाळांचे लेखापरिक्षण होत असल्याचे   निदर्शनास आलेले आहे असे पत्रात म्हटलेले आहे .

केंद्र शासनाने वितरीत केलेला निधी लाभार्थ्यांपर्यंत विहित कालमर्यादेत पोहचत असल्याची खातरजमा करणे, वितरीत केलेले अनुदान कोणत्याही कारणासाठी शाळास्तरावर प्रलंबीत राहणार नाही हा उद्देश या लेखापरिक्षणामागे असून शाळा, तालुका व जिल्हास्तरावर योजनेकडून वितरीत करण्यात आलेले अनुदान, खर्च करण्यात आलेले अनुदान वितरणाच्या आणि मार्गदर्शन याअनुषंगाने लेखापरिक्षण करणे करीता विहित कार्यपध्दतीनुसार शिंदे, चव्हाण, गांधी अॅन्ड कंपनी या सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे.


योजनेच्या खर्चाबाबत वेळोवेळी निदर्शनास आलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी व भविष्यात लेखे सुधारीत पद्धतीने ठेवण्यासाठी संस्थेमार्फत सकारात्मक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदरील आदेश पहा... 👇





बदलीपात्र नेमके कोण ?

 शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्याच प्राधान्य क्रमाने त्यांच्या बदल्या केल्या जातील .

बदलीपात्र शिक्षक-

   ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे .

आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहे, अथवा ज्या शिक्षकाची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे .


असे शिक्षक दहा + पाच(10+5) वर्ष कुठल्याही क्षेत्रात म्हणजेच अवघड अथवा सुगम क्षेत्रात पूर्ण झालेली असेल तर तो शिक्षक बदलीपात्र आहे.


बदली पात्र शिक्षकांची बदलीतून सुटका यावेळी होणार नाही त्यांची बदली ही प्रणाली द्वारे होणारच...

 अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन दहा वर्षांपूर्वी केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून प्रस्थापित करण्यात येईल .

अवघड क्षेत्रातील सुंदर शाळा जि.प.प्रा.शा.मुरूमखेडावाडी, औरंगाबाद  


बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्या असल्यास त्या भरण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा शिक्षकांची निवड होईल त्याला विद्यमान शाळेत पाच वर्षे पूर्ण असण्याची अट लागू होणार नाही.