डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

12 वी ऑनलाईन माध्यमातून आवेदनपत्रे भरण्याची तारीख जाहीर

 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा  फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणार (HSC Exam) आहेत. संभाव्य तारखांचे वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. आता ऑनलाईन माध्यमातून आवेदनपत्रे भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.




9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत ही आवेदनपत्रे कनिष्ठ ( HSC Exam ) महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरता येणार आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी,नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे भरणे आवश्यक आहे.

या संकेतस्थळावर करता येणार आवेदन...

www.mahahsscboard.in 

 नियमित शुल्क भरून ही आवेदनपत्रे भरता येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क आरटीजीएस द्वारे भरणा करावा.

आरटीजीएस/एनईएफटी पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलीस्ट जमा करण्याची तारीख नंतर कळवली (HSC Exam) जाणार आहे.

नागपुरातील शिक्षण संस्थांनी वज्रमुठ बांधली

 

राज्य सरकार शालेय व उच्च शिक्षणात दररोज नवनवीन शासन निर्णय घेऊन शिक्षण क्षेत्रात अराजकता निर्माण करीत आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी आणि शिक्षकांना बसतो आहे. याविरोधात नागपुरातील शिक्षण संस्थांनी वज्रमुठ बांधली आहे.



सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करण्यासाठी शुक्रवार दि.६ आॕक्टोंबरला नागपुरातील शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयापुढे सर्व संघटनाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व विद्यार्थी, पालक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाचे सरकार्यवाह रविंद्र फडणवीस यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व सर्व शैक्षणिक संस्थाव्दारे राज्यभरातील लोकप्रतिनिधींना त्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात येत आहेत. नागपुरात विभागीय समन्वय समितीतर्फे महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणाविरोधात आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके, आ. टेकचंद सावरकर, आ. अभिजित वंजारी, आ. सुनील केदार व आ. विकास ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी शिक्षक आमदार नागो गाणार,

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस, विभागीय कार्यवाह किशोर मासुरकर व राज्य कार्यकारिणी सदस्य आल्हादजी भांडारकर, मिलिंद बावसे उपस्थित होते.


केंद्रप्रमुखांच्या भरतीसाठी ५० वर्षे वयोमर्यादा आणि ५० टक्के गुणांची ठेवलेली अट रद्द

 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांच्या भरतीसाठी ५० वर्षे वयोमर्यादा आणि ५० टक्के गुणांची ठेवलेली अट रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या भरतीपासून वंचित राहणाऱ्या शिक्षकांना आता दिलासा मिळाला आहे.






महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ५ जून रोजी केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली  होती. 

केंद्रप्रमुख पदे ही बढतीने कार्यरत प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून सेवाज्येष्ठता ५० टक्के व मर्यादित विभागीय परीक्षेने ५० टक्के अनुशेष भरण्याच्या निर्णय घेतला होता; परंतु गेल्या ७९ वर्षांत ही पदे कोणत्याच पद्धतीने न भरल्याने आता परीक्षेसाठी कमाल ५० वर्षे वयोमर्यादा आणि पदवीला ५० टक्के गुणांची अट ठेवल्याने अनेक सेवाज्येष्ठ, अनुभवी, राज्य राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक पात्रता असूनही केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेला बसण्यापासून वंचित राहणार होते.