राज्याच्या शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांच्या भरतीसाठी ५० वर्षे वयोमर्यादा आणि ५० टक्के गुणांची ठेवलेली अट रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या भरतीपासून वंचित राहणाऱ्या शिक्षकांना आता दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ५ जून रोजी केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती.
केंद्रप्रमुख पदे ही बढतीने कार्यरत प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून सेवाज्येष्ठता ५० टक्के व मर्यादित विभागीय परीक्षेने ५० टक्के अनुशेष भरण्याच्या निर्णय घेतला होता; परंतु गेल्या ७९ वर्षांत ही पदे कोणत्याच पद्धतीने न भरल्याने आता परीक्षेसाठी कमाल ५० वर्षे वयोमर्यादा आणि पदवीला ५० टक्के गुणांची अट ठेवल्याने अनेक सेवाज्येष्ठ, अनुभवी, राज्य राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक पात्रता असूनही केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेला बसण्यापासून वंचित राहणार होते.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.