उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणार (HSC Exam) आहेत. संभाव्य तारखांचे वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. आता ऑनलाईन माध्यमातून आवेदनपत्रे भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत ही आवेदनपत्रे कनिष्ठ ( HSC Exam ) महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरता येणार आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी,नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे भरणे आवश्यक आहे.
या संकेतस्थळावर करता येणार आवेदन...
नियमित शुल्क भरून ही आवेदनपत्रे भरता येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क आरटीजीएस द्वारे भरणा करावा.
आरटीजीएस/एनईएफटी पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलीस्ट जमा करण्याची तारीख नंतर कळवली (HSC Exam) जाणार आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.