डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बदली प्रक्रिया 2024- 25 चे वेळापत्रक|ottmaha-teacher-transfer-timetable|

शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बदली प्रक्रिया 2024- 25 चे वेळापत्रक 




 बदली प्रक्रिया 2024- 25 चे वेळापत्रक 



शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया 2024- 25 या वर्षातील वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल..

Ottmaha



*बदली संवर्ग -१ :-* 

28 एप्रिल 2025 ते 3 मे 2025 

कालावधी एकूण सात दिवस


*बदली संवर्ग २ :-*

4 मे 2025 ते 9 मे 2019 

एकूण कालावधी सहा दिवस 


*बदली संवर्ग ३:-*

10 मे 2025 ते 15 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


*बदली संवर्ग 4 :-*

16 मे 2025 ते 21 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


*विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया राऊंड :-*

22 मे 2025 ते 27 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


*अवघड क्षेत्रातील जागा भरणे:-*

28 मे 2025 ते 31 मे 2015 

एकूण कालावधी चार दिवस 


उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्राम विकास विभाग स्तरावर देण्यात आलेली आहे. अनेक शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या वेळापत्रक  करिता सर्व शिक्षक बांधवांच्या माहितीस्तव जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचे वेळापत्रक देण्यात येत आहे.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत...|शासन-निर्णय-gr-zpschool-educational-news|

 शासन निर्णयाव्दारे स्थापन केलेल्या समीत्यांचे विलीनीकरण खालील प्रमाणे करण्यात येत आहे.





शाळा व्यवस्थापन समिती

समाविष्ट/विलीन करावयाच्या समिती




१. माता पालक संघ

२. शालेय पोषण आहार योजना समिती

३. पालक शिक्षक संघ

४. नवभारत साक्षरता समिती

५. तंबाखू सनियंत्रण समिती

६. SQAAF स्वयं मूल्यांकन समिती

विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती

१. विद्यार्थी सुरक्षा समिती

२. तक्रार पेटी समिती

३. शाळा बांधकाम समिती

४. परिवहन समिती

५. शाळा व्यवस्थापन व विकास समिती

६. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती



यापुढे शाळास्तरावर आवश्यक समित्या पुढीलप्रमाणे-


1) शाळा व्यवस्थापन समिती


2) सखी सावित्री समिती


3) महिला तक्रार निवारण समिती / अंतर्गत तक्रार समिती


4)  विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती


शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये 


१. शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे.


२. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून त्याची शिफारस करणे.


३. त्या शाळेस शासनाकडून / स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणा-या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.


४. बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व यासंदर्भातील पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण राज्य शासन यांच्या जबाबदा-यांबाबत माहिती देणे.


५. शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे


६. बालकांची १०० टक्के उपस्थिती सातत्याने राहील यासाठी दक्षता घेणे.


७. शाळेतील विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नयेत या करीता संबंधित पालकांशी चर्चा करून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता प्रयत्न करणे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना पुन्हा नियमित शाळेत येण्याकरीता प्रयत्न करणे.


८. दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.


९. शाळेतील विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे. त्यांच्या अध्ययन सुविधांचे सनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे


१०. शाळेतील प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सनियंत्रण करणे


११. शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे


१२. शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे.


१३. मुख्याध्यापकांच्या दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.


१४. निरूपयोगी साहित्य रू ५०००/- (रू. पाच हजार मात्र) किंमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे.


१५. शाळा इमारत इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरूस्त्यांवर देखरेख करणे.


१६. शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखी स्वरूपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे.


१७. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करणे.


१८. वर्षातून दोन वेळा माता पालक व पिता पालक यांचा मेळावा आयोजित करणे.


१९. नवभारत साक्षरता कार्यक्रम योजनेचे शाळा स्तरावरील अंमलबजावणी कार्यावर सनियंत्रण करणे.


२०. शालेय परिसर हा तंबाखू मुक्त होण्यासाठी कार्यक्रम अंमलबजावणीवर देखरेख आणि सनियंत्रण करणे. 


२. सखी सावित्री समिती


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२२/प्र.क्र.३९/एसडी-४ दिनांक १०.०३.२०२२ अन्वये सखी सावित्री समितीची रचना व कार्ये राहतील.


३. महिला तक्रार निवारण समिती/अंतर्गत तक्रार समिती-

   

महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मकचौ २००६/ प्र.क्र.१५/मकक, दिनांक १९.०९.२००६ व महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मकचौ २०१३/प्र.क्र.६३/मकक, दिनांक १९.०६.२०१४ व महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मकचौ २०१४/प्र.क्र.६३/मकक, दिनांक ११.०९.२०१४ अन्वये सदर समितीची रचना व कार्ये राहतील.


४. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती -


इयत्ता १ ते १२ चे वर्ग / यापैकी वर्ग असलेल्या शाळांसाठी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. सदर समिती १२ ते १६ सदस्यांची राहील.

शासन निर्णय पहा...






शिक्षकांची अशैक्षणिक कामं कमी

 अशैक्षणिक काम कमी करण्याचा निर्णय : "राज्यातील शिक्षकांची किमान ५० टक्के अशैक्षणिक कामं कमी करण्याचा निर्णय येत्या १५ दिवसातच घेण्यात येईल.

 जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्याचे आव्हान आहे. यासाठी शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. बहुसंख्य जिल्हा परिषद शिक्षक नवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढवीत आहेत, ते राज्यभरातील शाळांमध्ये अंमलबजावणी करु व राज्यात अशा शिक्षकांची 'आयडॉल बँक' तयार करण्याचा मानस समोर ठेवला आहे. सुट्ट्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून नवीन उपक्रमांबाबत पालकांना माहिती द्यावी, जेणेकरून पटसंख्या वाढीत मदत होईल व जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता व पटसंख्या टिकून राहील, यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे," असं आवाहन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलं.


; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; font-weight: bolder;">गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे : शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण निर्णय आगामी काळामध्ये घेण्यात येणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे मे महिन्यातच वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच ज्या शाळांना इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत अशा ठिकाणी इमारती, वर्गखोल्या उभारणीसाठी शासन प्रयत्नशील असून, यासाठी विविध सेवाभावी संस्थांचीदेखील मदत घेण्यात येणार असल्याचं दादा भुसे म्हणाले. वास्तवात सध्या जिल्हा परिषद, नगरपालिका त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे पटसंख्या टिकविण्याचे आव्हान समोर आहे. अशा परिस्थितीत सर्व शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दादा भुसे यांनी दिलेत.

22222

संवर्ग एक व दोन मधून प्रथमत: बदली करताना सेवेची अट नसल्याबाबतचे आजचे परिपत्रक|teacher-transfer-ottmaha-शिक्षक-बदली|

संवर्ग एक व दोन मधून प्रथमत: बदली करताना सेवेची अट नसल्याबाबतचे परिपत्रक....


या विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरीता या विभागाचे दि.२३.११.२०२२ रोजीचे पत्र रद्द करुन, शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम असल्याबाबत संदर्भ क्र.३ येथील दि.२.४.२०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये आपणांस कळविण्यात आले आहे.

               

२. उपरोक्त दि.२.४.२०२५ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी प्रथमतः विनंती अर्ज सादर करण्याकरीता विद्यमान शाळेतील ३ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही.


उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याकरीता तात्काळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.


मूळ आदेश पहा...

शिक्षक बदली