डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर प्रोफाइल 4 दिवसात अपडेट करावी लागणार|teacher-transfer-ottmahard-online|

सेवाज्येष्ठता अनुज्ञेय करुन त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशीत केले आहे.

  मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र.५२०६/२०२५, ५२०७/२०२५ व ५२०८/२०२५ बाबत

                       

संदर्भ :- १. मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांचे दि.०९.०५.२०२५ रोजीचे आदेश.


२. शासन पत्र क्र. बैठक-१४२५/प्र.क्र.७२/आस्था-१४, दि.२८.०३.२०२५




उपरोक्त विषयाबाबत मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल याचिका क्र. ५२०६/२०२५ व अन्य संलग्न याचिकांमध्ये मा. उच्च न्यायालयाने दि.०९.०५.२०२५ रोजी दिलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडली आहे. तसेच संदर्भ क्र. २ येथील शासन समक्रमांक दि.२८.३.२०२५ रोजीच्या पत्रान्वये निर्गमित इतिवृत्तातील अनुक्रमांक ३ येथे दिलेले निर्देश रद्द करण्यात येत आहेत.


२. उपरोक्त न्यायनिर्णयाद्वारे मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, १९६७ मधील नियम ६ (८) (२) नुसार सेवाज्येष्ठता अनुज्ञेय करुन त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशीत केले आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करुन त्यानुसार बदली पोर्टलवर या शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कार्यवाही चार दिवसांमध्ये पूर्ण करण्याची सर्व मुख्यधिकारी जि. प. यांना विनंती करण्यात आलेली आहे.


प्रत माहितीस्तवः-           


१) मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.


२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).


मूळ आदेश पहा...