पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत|teachers-job-pavitra-portal|
शिक्षकांची ६०० पदे कायमची संपुष्टात ?
छ. संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षकांची ६०० पदे कायमची संपुष्टात ?
गेल्या अनेक वर्षापासून राज्यात चर्चेत असलेला कमीपट संख्येच्या शाळेचा विषय आता वास्तविक कारवाई स्वरूपात मार्गी लागताना दिसत आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील ५९० शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएडधारक तरुणाची नेमणूक करण्यात येणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील ६०० पदे कायमचीच संपुष्टात येणार आहेत.
'आरटीई' नुसार कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये दोन ते तीन शिक्षक कार्यरत होते. पटसंख्या जास्त असतानाही त्या शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळत नाहीत, अशी दुसरी बाजू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाने 'समूह शाळा' हा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, 'गाव तेथे शाळा' ही संकल्पना मोडीत निघेल व त्या गावातील विद्यार्थी शाळा शिकणार नाहीत म्हणून त्याला सर्वच स्तरातून विरोध झाला. त्यामुळे शासनाला तो पॅटर्न गुंडाळून ठेवावा लागला. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये शालेय शिक्षण विभागाने त्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला. आता सेवानिवृत्त शिक्षकाबरोबरच डीएड-बीएड झालेल्या सुशिक्षित तरुणालाही यात कंत्राटी शिक्षक म्हणून संधी देण्यात येणार आहे.
नेमकी अशी होणार कार्यवाही ...
२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर प्रत्येकी एक डीएड- बीएडधारक कंत्राटी तरुण-तरुणी किंवा सेवानिवृत्त शिक्षक घेण्यासंदर्भात शासन निर्णय झाला. परंतु, सध्या कार्यरत शिक्षकांपैकी कोणत्या शिक्षकाला तेथून दुसऱ्या शाळेत पाठवायचे, एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास निवड कोणाची कशा पद्धतीने करायची ? नियुक्तीचे अधिकार नेमके कोणाला ? यासंदर्भात संचालक कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना येतील. त्यानुसार काही दिवसांत कार्यवाही केली जाणार आहे.
या निर्णयाबाबत आपले मत पोस्टखाली काॕंमेट मध्ये व्यक्त करा...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन लागू |unified-pension-maharashtra|
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्राप्रमाणेच आता नवी पेन्शन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर केली आहे. ,या योजनेला युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) असे नाव देण्यात आले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन आणि खात्रीशीर किमान पेन्शन प्रदान करणे हा या नवीन योजनेचा उद्देश आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.
unified pension scheme या योजनेंतर्गत 10 वर्षे सेवा असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. त्याच वेळी, ज्या लोकांनी 25 वर्षे सेवा केली आहे त्यांना पूर्ण पेन्शन मिळेल.
unified pension scheme या योजनेअंतर्गत, जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर निवृत्तीपूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के पेन्शन म्हणून दिली जाईल. सध्याच्या पेन्शन व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ब्रीफिंगमध्ये यूपीएसच्या मंजुरीची घोषणा केली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून त्यात या नव्या पेन्शन योजनेचाही समावेश आहे. सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी यूपीएसची रचना करण्यात आली आहे.
एकात्मिक निवृत्ती वेतन योजनेचे विवरण
डॉ. सोमनाथ समितीची स्थापना विद्यमान पेन्शन योजनेचे पुनरावलोकन आणि सुधारणा करण्यासाठी करण्यात आली होती. जागतिक पेन्शन प्रणालीच्या विस्तृत विचार-विमर्शानंतर आणि विश्लेषणानंतर समितीने एकात्मिक पेन्शन योजनेची शिफारस केली.
यूपीएस जुन्या पेन्शन योजनेत कपात करत आहेत, केंद्रीय मंत्री म्हणाले, 'विरोधक जुन्या पेन्शन योजनेवरच राजकारण करत आहेत. जगभरातील देशांमधील योजना पाहिल्यानंतर आणि अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर या समितीने एकात्मिक पेन्शन योजना सुचवली. एकात्मिक पेन्शन योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
नवीन योजना 1 एप्रिलपासून लागू
नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाईल. या योजनेंतर्गत 10 वर्षे सेवा असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. 25 वर्षे सेवा केलेल्या लोकांना पूर्ण पेन्शन मिळेल. एवढेच नाही तर पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळेल.
युनिफाईड पेन्शन स्कीम |nps-old-pension|
केंद्र सरकारने एका नवीन पेन्शन योजनेला शनिवारी मंजुरी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या योजनेचा फायदा होणार आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम असं या योजनेचं नाव आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत असतानाच आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने आता नवीन पेन्शन योजना अर्थात एनपीएसच्या ऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे. या एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली आहे.
हे वाबळेवाडी मॉडेल आहे…
हे वाबळेवाडी मॉडेल आहे…
समर्पित शिक्षक, सर्वहितदक्ष पालक व स्वाभिमानी ग्रामस्थ यांच्या परस्पर आंतरक्रियेतून ही दैवी रचना तयार होते. श्री दीपक खैरे व श्री पोपट दरंदले यांच्यासारखी माणसे शिक्षक म्हणून जन्माला घालण्या पाठीमागे नियतीची खास योजना असू शकते. सध्याच्या काळात शिक्षक कसा असावा याचे वर्णन जर करायला सांगितले तर एकच वाक्यात सांगताना तो *“या दोघांसारखा असावा”* असे मी स्वानुभवातून सांगेन. असे शिक्षक राष्ट्राची संपत्ती असतात.
स्पर्धा परीक्षेसह सर्वच विषय ज्ञानावर कमालीचे *प्रभुत्व*, त्या ज्ञानाला मुलांकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असणारे नियोजनासह *कौशल्य* व त्यासाठीचे *सातत्य* या गोष्टी तर त्यांच्याकडे आहेतच, परंतु या व्यतिरिक्त त्यांच्यातील दृढ *सकारात्मकता*… निर्मळ *प्रामाणिकपणा*… समाज व मुलांप्रती निस्सीम *प्रेम व माणुसकीची* भावना… शिक्षक म्हणून असलेल्या जबाबदारीची *जाणीव*… या गोष्टी त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या आहेत.
शिवाय सगळी कर्तव्य पार पाडून झाल्यावर परिणामाचे श्रेय घेण्याची धावपळ नाही… कोणतीही असुरी महत्त्वाकांक्षा नाही… कधीही इतरांप्रती नकारात्मक भावना नाही… कर्तव्याचा कोणताही परतावा अथवा मोबदला यांना नको असतो … आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हे महात्मे कोणालाही हेवा वाटावा असे अतिशय *सात्विक, शांत व समाधानी जीवन* जगत आहेत जे सध्या विचार व आचाराच्या विसंगतीमुळे बहुतांश शिक्षकांच्याही नशिबी नाही. सात्विक जीवन कसे जगावे हे मी या दोघांकडून शिकलो.
खैरे गुरुजी व दरंदले गुरुजी यांच्या आगमनानंतर खऱ्या अर्थाने आम्ही वाबळेवाडी शाळाविकासाबरोबर उर्जादायी सहजीवनाचे आयुष्यभर स्मरणात ठेवावे असे क्षण अनुभवले व सर्वजण *समृद्ध* झालो. आज सोन्याच्या अंगठ्या नाकारून ते जवळपास दीड लाख रुपये विद्यार्थ्यासाठी interactive panel घेण्यास वापरायला सांगण्याला जे धैर्य लागते ते याच समृद्धतेतून येते…
____________________________
*हितचिंतकांसाठी थोडेसे -* 😊
वाबळेवाडी लोकसहभागाचे मॉडेल समजून घेण्यासाठी रक्तात प्रामाणिकपणा व माणुसकी असावी लागते. उगीच कुणाही स्वार्थी, लबाड, अहंकारी, विध्वंसक व जळक्या मनोवृत्तीच्या *साहेब… बापू… उडाणटप्पू… व आदींच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या ताई, माई, अक्का आणि त्यांचा कंपू* यांच्यासारख्यांच्या आवाक्यातली ही बाब नाही...
🖊 दत्तात्रय वारेसर
वेतन त्रुटी निवारण समिती कडे दि . ५ ऑगस्ट च्या सुनावणी
राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत
वेतन त्रुटी निवारण समिती कडे दि . ५ ऑगस्ट च्या सुनावणी* साठी *शालेय शिक्षण विभागाचे ०३ जुलै २०२४ चे पत्र...*
काल ०२-०८-२०२४ ग्राम विकास विभागातर्फे आयोजित सुनावणीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने साक्ष नोंदवली आहे
वेतन त्रूटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष, वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी/कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारीत वेळापत्रक देण्यात आले आहे. सदर पत्रात शालेय शिक्षण विभागाकरिता दिनांक ०५.०८.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते १.०० अशी वेळ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मंत्रालयीन पाठपुरावा..
"थकना हमे चलेगा,_
मगर रुकना हमे गवारा नहीं.."
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मंत्रालयीन पाठपुरावा..
कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचा सतत 2 दिवस ( 31 जुलै व 1 ऑगस्ट 2024) मंत्रालयीन पाठपुरावा सुरू होता, संघटनेची राज्य टीम , राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,राज्य सचिव गोविंद उगले, राज्य कोषाध्यक्ष प्रविण बडे, मिलिंद सोळंखी ,राज्य सोशल मीडिया प्रमुख विनायक चौथे यांनी मंत्रालय येथे विविध प्रश्ना संदर्भात संबधीत सचिव, अधिकारी यांच्या भेटी घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.
या साठी विशेष सहकार्य राज्य कार्यध्यक्ष आशुतोष चौधरी,राज्य सल्लागार सुनील दुधे व राज्य सहसचिव अरविंद पुलगुर्ले यांचे सहकार्य लाभले.
■ *नगर विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका,महानगरपालिका इत्यादी मधील 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त NPS/DCPS योजनेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना31 मार्च 2023 वित्त विभाग शासन निर्णयानुसार सेवेत मृत्यु किंवा रुग्णता मुळे सेवासमाप्ती प्रसंगी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अंतर्गत फॅमिली पेन्शन रुग्णाता निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान व सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा उत्पादनाचा लाभ लागू करणेबाबत.*
- या संदर्भात अपर सचिव उगले साहेब यांची भेट घेतली व त्यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ यावर कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधितास आदेशीत केले.
*■ 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात / अधिसूचना प्रकरणी शासन सेवेत दि. 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीत विद्यापीठे, व तत्सम अनुदानित संस्थेमधील कर्मचाऱ्यांना वित्त विभागाचा दि 2 फेब्रुवारी 2024 चा शासन निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू करणे बाबत.*
-काल आणि आज ग्रामविकास विभागात आणि वित्त विभागात इतर निमशासकीय कर्मचाऱ्यांना सदर वित्त विभागाच्या शासन निर्णाया नुसार शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी पाठपुरावा व भेटी घेण्यात आल्या..
*ग्रामविकास चा शासन निर्णय अंतिम टप्प्यात आहे,* संघटनेच्या निवेदनानंतर ग्रामविकास ने कालच याबाबत ची आकडेवारी सर्व जिल्हा परिषदांकडून मागवली आहे..
त्यानंतर लवकरच *ग्रामविकास चा शासन निर्णय निघेल.. आणि तिथून पुढील 6 महिने one time पर्याय देण्यासाठी कालावधी संबंधित पात्रता धारक कर्मचाऱ्यांना मिळतील* असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले..
2 ऑगस्ट ही तारीख शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अंतिम तारीख आहे.. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी याबाबत चिंता करण्याचे कारण नाही, जे पात्र आहेत त्यांना नंतर आपापल्या विभागाचा शासन निर्णय आल्यावर पुरेसा वेळ ( 6 महिने ) मिळेल.
*◆सन 2006, 2007, 2008-09 च्या बॅच मधील शिक्षणसेवकांना (आत्ताचे नियमित शिक्षक) 2 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार लाभ लागू आहे किंवा कसे.?* याबाबत राज्यभर जो संभ्रम निर्माण झाला आहे, त्याबाबत संघटनेद्वारे *ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांना निवेदन देऊन यावर मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करण्यात आली , व जे शिक्षक / कर्मचारी पात्र असतील , त्यांना वरील शासन निर्णयानुसार लाभ देण्यात यावा ही विनंती देखील करण्यात आली..*
*त्यावर ग्रामविकास विभागा कडून लवकरच वित्त विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे, कारण सर्व मूळ विषय वित्त विभागाशी असल्याचे संबंधित कक्ष अधिकारी यांनी सांगितले ..*
*■ शिक्षकांच्या नवीन संचमान्यता धोरण रद्द करणे, शिक्षण सेवक पद रद्द करणे व शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी लागू करणे, शिक्षकांना सुधारित वेतन लाभाची 10,20,30 आश्वासित प्रगती योजना लागू करणे,प्रलंबित केंद्रप्रमुख भरती परीक्षा लवकर आयोजित करणे, वैद्यकीय बिले, शिक्षकांचे कोविड 19 चे प्रलंबित प्रस्ताव ,अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील नैसर्गिक अनुदान वेतन वाढ करणे बाबत* इत्यादि विषयांवर शिक्षणमंत्री महोदयांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला पण ते मुंबई बाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही, मात्र त्यांचे स्वीय सचिव शिंदे यांची भेट घेऊन सदर निवेदन त्यांच्या कार्यालयात नोंदणी शाखेत जमा करण्यात आले, लवकरच शिक्षणमंत्री महोदयांची भेट घेऊन पुन्हा याबाबत पाठपुरावा करण्यात येईल..
*मयत कोविड योद्धा शिक्षक कै.अनिल लिलाधर नेहते याच्या प्रस्ताव बाबत स्मरणपत्र*
-संबंधित शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी यांची भेट घेऊन कोविड मध्ये झालेले मयत शिक्षक कै. अनिल नेहते सर, रावेर (जि.जळगाव) यांच्या प्रस्तावा बाबत पाठपुरावा करण्यात आला, संबंधित टेबल वर गेल्या 4 महिन्यापासून फाईल धूळ खात पडून असल्याचे आज निदर्शनास आले, त्यामुळे संबंधित विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना कडक शब्दात समज देण्यात आली व 15 दिवसात प्रस्ताव मंजूर केला नाही तर कुटुंबा सोबत संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसतील असा इशाराच देण्यात आला.. आणि याबाबत शालेय शिक्षण च्या प्रधान सचिवांच्या नावे ही एक स्मरणपत्र देण्यात आले..
*◆वित्त विभागातील भेटी-*
*- वित्त विभागाचा 2 फेब्रुवारी चा जाहिरात नुसार जुनी पेन्शन चा शासन निर्णय इतर विभागात लागू व्हावा* यासाठी इतर विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली त्यावर ग्रामविकास व इतर डिपार्टमेंट चे शासन निर्णय निघण्यासाठी वित्त विभाग आवश्यक ते कार्यवाही लवकर करणार आहे..
*- मयत राज्य कर्मचारी कुटुंबास उच्च दराने अर्थात 50% फॅमिली पेन्शन मिळण्यासाठी सलग 7 वर्ष सेवेची जी अट आहे, ती अट केंद्राच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर वगळण्यात यावी,* या अटीमुळे आजरोजी कमी सेवा असलेल्या मयत DCPS/NPS धारक कर्मचारी कुटूंबास केवळ 30% च फॅमिली पेन्शन मिळत आहे, जी ही अट रद्द केल्यावर फॅमिली पेन्शन 50% होईल.. त्यावर वित्त उपसचिव मॅडम यांनी तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वस्त केले..
*- ग्रॅच्युटी (उपदान) रकमेची कमाल मर्यादा केंद्रा प्रमाणे 25 लाख रु करण्यात यावी*, याबाबत 20 लाख रु ची फाईल अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले मात्र आता पुन्हा 25 लाख नुसार फाईल सादर करण्याचे त्यांनी आश्वस्त केले..
*- सन 2021 नंतर च्या DCPS रकमेवर ती रक्कम NPS मध्ये वर्ग होईल पर्यंत चे व्याज मिळावे* ही मागणी संघटनेने लावून धरली , कारण DCPS योजनेत जमा रकमेवर 2021 नंतर व्याज आकारणी करण्यात आलेली नाही, त्यामुळे शिक्षकांचे व्याजाचे लाखों रुपये नुकसान झाले असल्याचे संबंधित उपसचिव मॅडम याच्या लक्षात आणून दिले, त्यावर यात जिल्हा प्रशासनाची चूक असल्याचे त्यांनी सांगितले, तरीपण माहिती मागवून व्याज आकारणी बाबत कार्यवाही करू असे आश्वासन देण्यात आले..
*◆HRA दरात वाढ-*
सदर विषयी पाठपुरावा केला असता संघटनेने यापूर्वी दिलेले निवेदन आपल्यापर्यंत आल्याचे संबंधित वित्त च्या व्यय डिपार्टमेंट च्या अवर सचिव मॅडम यांनी सांगितले, पण केंद्राच्या वित्त विभागाचे स्पष्ट लाभ दिल्याचे पुरावे मिळेपर्यंत हा विषय सध्या पुढे नेता येत नसल्याचे त्यांनी सांगितले, वास्तविक या विषयावर संघटनेने केंद्राच्या विविध विभागाचे HRA दर वाढीचे पुरावे दिलेले आहे, पण ते पुरेसे नसल्याचे संबंधित मंत्रालय वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे, त्यावर संघटनेद्वारे आता केंद्रीय मंत्रालयाकडे माहिती मागवली आहे, ती मिळाल्यावर राज्य वित्त विभागास ती पुरवण्यात येईल..
*आदिवासी विकास विभाग-*
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी निर्णय निर्गमित व्हावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले..
◆ मुख्यमंत्री महोदयांनी निर्देशित केल्याप्रमाणे त्यांच्या प्रधान सचिवांसोबत ( मुख्यमंत्री कार्यालय) जुन्या पेन्शन संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट व्हावी यासाठी बैठकीसाठी ही निवेदन देण्यात आले..
राज्य कार्यकारणी सोबत संघटनेचे मुंबई चे नवनियुक्त महानगर अध्यक्ष श्री भाऊसाहेब घाडगे हे देखील उपस्थित होते..
मित्रांनो अश्या प्रकारे गेले 2 दिवस सतत कर्मचाऱ्यांच्या वरील विविध विषयांवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने द्वारे मंत्रालयात पाठपुरावा करण्यात आला..
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सतत कर्मचाऱ्यांच्या सेवेत कार्यतत्पर होती , आहे व राहील.. धन्यवाद!
गोविंद उगले,राज्य सचिव
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा|nps-old-pension|
सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा , मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची मागणी..💥
मित्रांनो,
आज 30 जुलै 2024 रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या राज्य कार्यकारणी शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन जुन्या पेन्शन च्या मुद्द्यावर चर्चा केली..
कर्मचाऱ्यांची मागणी ही सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे ही आहे.. आपल्या प्रस्तावित सुधारित पेन्शन योजने / GPS मुळे राज्यभरात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व नाराजी आहे..
सोबतच जुन्या पेन्शन साठी लढणारी राज्यातील सर्वात मोठी संघटना आमची असून आम्ही त्याचे आजचे पीडित आहोत, त्यामुळे सरकारने आमच्यासोबत चर्चा करावी, परंतु सरकार दुसऱ्याच लोकांना सोबत घेऊन चर्चा करते, त्यामुळे नव्या पेन्शन धारक कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.. संघटना लवकरच 5 लाख कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य असे जुनी पेन्शन अधिवेशन घेणार आहे, त्यात आपण जुनी पेन्शन योजनेचा निर्णय जाहीर करावा..
मुख्यमंत्री महोदयांनी बोलतांना सांगितले की..
➡️ *आम्ही जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित पेन्शन योजनेत /GPS मध्ये पेन्शन देऊ. NPS मध्ये पेन्शन/परताव्या च्या बाबत जी अनिश्चितता होती ती भरून काढण्याचे काम आम्ही सुधारित पेन्शन योजनेत करणार आहोत..*
*लवकरच सचिवांसोबत बैठक लावण्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली.*..
त्यानुसार लवकरच त्याबाबत बैठक लागेल..
तथापि कर्मचाऱ्यांना केवळ आणि केवळ 1982-84 ची जुनी पेन्शन योजनाच लागू व्हावी हीच आपली स्पष्ट भूमिका कालही होती , आजही आहे, व उद्याही राहील..
त्यामुळे येणारा काळ संघर्षाचा आहे..
आजच्या भेटी प्रसंगी शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य सचिव गोविंद उगले , राज्य कोषाध्यक्ष मिलिंद सोळंकी , राज्य सोशल मीडिया प्रमुख विनायक चौथे हे उपस्थित होते..
आजची बैठक आयोजित करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री श्री संजय राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले..
सोबतच बैठकीत आरोग्य संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे हे ही उपस्थित होते, बैठकीसाठी त्यांचेही अनमोल सहकार्य लाभले..
राज्याध्यक्ष /राज्यसचिव
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
२,७०० रुपये लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला अटक...
गेवराईत वेतनश्रेणीसाठी शिक्षकाकडून घेतले २,७०० रुपये लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला अटक
वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी शिक्षकाकडून २७०० रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २९) रंगेहाथ पकडले.
गेवराई पंचायत समितीत घडलेल्या घटनेप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेवराई पंचायत समितीत लाचप्रकरणी कारवाईची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. भारत शेषेराव येडे (वय ५७, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मन्यारवाडी, ता. गेवराई) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.
तक्रारदार शिक्षकाला चटोपाध्याय/ वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ अटी व शर्तीनुसार मान्य झाले होते. संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकाऱ्यांनी वरिष्ठ श्रेणी देय आहे किंवा कसे, असे पत्र काढले. त्यावरून तक्रारदार यांचे वरिष्ठ श्रेणीचे देयक तयार करून ते देयक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून व जिल्हा परिषदेतून मंजूर करून घेण्यासाठी २७ हजार रुपयांची रक्कम ठरली. प्राथमिक स्वरूपात या देयकाच्या १० टक्के रकमेची मुख्याध्यापकाने लाच म्हणून मागणी केली.
याबाबत शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व २७०० रुपये घेताना भारत येडे यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान
विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४
परिपत्रक :-
भाग एक-
शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी / विद्यार्थिनीस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे हे आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्ता पूर्ण शिक्षणा करिता विविध योजना राबविल्या जात आहेत. या ध्येय, धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरांवर प्रभावी अंमलबजावणी, पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानांच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक असते.
मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २६.०७.२०२४ रोजी बैठक पार पडलो. या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट-२०२४ मध्ये "विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान" राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते काय, तसेच अंमलबजावणीमध्ये येणा-या अडथळयांचा विचार करुन, आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यास्तव सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनो "विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान" अंतर्गत दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ या कालावधीदरम्यान परिशिष्ट-अ मध्ये जोडल्याप्रमाणे शाळांचे निरीक्षण करावयाचे आहे व अहवाल सादर करावयाचे आहेत.
अभियानाची कार्यदिशा :- १. अभियानादरम्यान पहिल्या २० दिवसात प्रत्यक्ष शाळाभेटी करणे, तद्नंतरच्या ०६ दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा / उपायोजना करणे, तदनंतरच्या ०४ दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे.
२. आठवडयातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यलयीन कामकाज करणे. उर्वरित तीन/चार दिवस शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेटी करणे. अ.क्र.१ मध्ये नमूद प्रमाणे कार्यवाही करणे.
३. सरल पोर्टलवर केंद्रप्रमुख/गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी/प्राचार्य/विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी/निरीक्षण अहवाल लॉगीन मधून दररोज अद्यावत करणे.
वरील मोहिमेसाठी आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील अशा प्रकारचे उद्दीष्ट ठरवून द्यावे. संबंधितांनी वरील मुद्दयांवर प्रभावी निरीक्षण करुन बिनचूक माहिती संकलित करावी. त्यांचे लगतचे पर्यवेक्षीय अधिकारी यांनी स्वतःचे उद्दीष्टांव्यतिरिक्त त्यांचे अधिनस्त कर्मचा-यांनी केलेल्या निरीक्षण शाळांची आवश्यकतेनुसार पडताळणी करावी. यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना योग्य प्रकारे पोहचत आहे काय याची खातरजमा होणे आवश्यक आहे.
भाग दोन :-
पालक, विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन तसेच विविध मा. लोकप्रतिनिधी यांच्याकडून आपल्या विभागातील शासकीय कार्यालयांकडे निवेदने/अर्ज प्राप्त होत असतात. अशा अर्जावर / निवेदनांवर वेळेत कार्यवाही होण्यास्तव विभागाने २५० पेक्षा जास्त सेवा "लोकसेवा हमी कायद्यांतर्गत घोषित केलेल्या आहेत. तसेच या व्यतिरिक्त ब-याच सेवा विभागामार्फत सर्वच स्तरावर देण्यात येतात. या सर्व सेवा लाभार्थ्यांना विहीत वेळेत मिळाव्यात असे अपेक्षीत आहे.
या करीता दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ या दरम्यान कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात यावा. यासाठी सर्वसाधारण आवक नोंदवही तसेच संबंधित कार्यासनाच्या कार्यविवरण पंजी (वर्कशीट) नोंदीचा संदर्भ घेण्यात यावा, त्यावर निर्णय घेण्याची कार्यवाही करून याबाबतच्या नोंदी परिशिष्ट-च मध्ये ठेवण्यात याव्यात. वेळोवेळी नजीकच्या संनियंत्रण अधिकारी यांनी सदर नोंदी काळजी
पूर्वक तपासाव्यात व तसे साक्षांकन करावे.
वरील दोन मोहिमा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधितांनी गांभीर्यपूर्वक या अभियानात सक्रीय सहभाग घेउन यशस्वीरीत्या सोबत जोडलेल्या दोन्ही परिशिष्टामधील माहिती उपसंचालक व संचालक यांनी नियमित संकलित करावी.
याबाबत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण), मा. प्रधान सचिव (शालेय शिक्षण) व आयुक्त (शालेय शिक्षण) क्षेत्रीय स्तरावर विभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. वरील दोन्ही बाबींची फलनिष्पत्ती तपासणार आहेत, याची नोंद घ्यावी. असे आदेशात म्हटलेले आहे.
आदेश पहा....
शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव
शिक्षा सप्ताह
शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव
दिवस सातवा 28 जुलै 2024
विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने, कार्यरत आणि सेवानिवृत शिक्षक, शास्त्रज, सरकारी/निमशासकीय अधिकारी, सेवानिवृत सशस्त्र दलाचे कर्मचारी, स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक, गृहिणी, आणि इतर कोणत्याही संस्था/समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे जान आणि कौशल्ये शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करु शकता किंवा शाळेसाठी मालमता/साहित्य/उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात.
उद्दिष्टे -
1. शाळांचे सक्षमीकरण करणे.
2. लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय
3. शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे.
4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उतरदायित्व निर्माण करणे,
विद्यांजली कार्यक्रमाचा व्याप्ती व वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमांचे आयोजन केले जावे.
1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे.
2. शाळेला मदत करणान्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिणे.
3. समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करणे. त्यासाठी प्रआत फेऱ्या पथनाट्य, पोस्टर मेकिंग, विद्यांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्ये स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
4. विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनो अभियान राबविणे.
6. शालेय परिपाठामध्ये शिक्षक, विद्यार्थी व डायट मधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे
7. विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे, स्थानिक रेडिओ वाहिन्या, पी एम ई विद्या
चॅनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे.
8. शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यमे व प्रसार माध्यमे याद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी.
अपेक्षित परिणाम -
1. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल
2. शाळांचे सक्षमीकरण होईल.
3. शाळा व समाज यामध्ये उत्तम नाते संबंध निर्माण होईल.
4. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण होईल.
सामाजिक शास्त्र विभाग
शिक्षण सप्ताह दिवस ६ वा
शिक्षा सप्ताह, दिवस सहावा
वार शनिवार दि. २७/०७/२०२४
Eco clubs for Mission LIFE Day
शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि #Plant4Mother या अभियान अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दि.२७/०७/२०२४ रोजी आयोजन करणे.
अ) शाळेमध्ये Eco clubs for Mission LIFE या थीम अंतर्गत Plant4 Mother अभियान आयोजित करण्यासाठी सूचना
वृक्षारोपण मोहिमेचे दि.२७/०७/२०२४ रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे. शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे. शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान ३५ रोपे लावावीत.
विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग : विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत. यामुळे विधार्थी, त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल.
नावांचे फलक लावणे विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा.
रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे:- विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक/अध्यक्ष/सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी.
मुरूमखेडावाडी शाळेत दरवर्षी घनवनाचा वाढदिवस विद्यार्थी |
वरील उपक्रमाच्या अनुषंगाने-
१. जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे जिओटॅग केलेले फोटो, सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकर लिंकवर अपलोड करावेत. https://docs.google.com/spreadsheets/d/13mepPOy8gmyX5HR4D1Swob OztSgb15eQRBNrFMwo/edit?gid=15896978#gid=15896978
२. सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल संमाजात जाणीवजागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो #Plant4 Mother आणि # एक पेड़ माँ के नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावेत.
ब) शाळांमध्ये मिशन लाइफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या सूचना
शाळांमधील मिशन लाइफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात. हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहांच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वतर्नशैलीला प्रोत्साहित करते. इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील, पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास
सक्षम करतात. केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील ८२३२ शासकीय शाळा व CBSE व इतर
व्यवस्थापनाच्या ५३८६ शाळांनी इको क्लबची स्थापना करावी.
मिशन लाइफसाठी इको क्लबची स्थापनाः विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी ज्या शाळांमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांनी मिशन लाइफसाठी इको क्लब स्थापन करावेत आणि
इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी.
नेतृत्व :- शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाइफसाठी इको क्लबचे प्रमुख /मार्गदर्शक असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांचे आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेख करतील.
समन्वयकाची जबाबदारी:- मिशन लाइफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक (PGT) किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) यांची नियुक्ती करावी. या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकाची जबाबदारी देण्यात यावी. हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करतील.
मिशन लाइफसाठी इको क्लबची रचना-
> इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील ४-५ विद्यार्थी असतील.
> मिशन लाइफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाईल > शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या
उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे.
> ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयांवर आधारित
उपसमित्यांची स्थापना करावी.
> इको क्लव अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे. प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२' हे अभियान राबविणेबाबत.
शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला. अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैत्यन निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.
उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४-२५ देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा प्रस्ताव
शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णयः-
१. अभियानाची व्याप्ती-:
i)राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.
ii)
या अभियानासाठी शाळांची विभागणी अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.
सदर अभियान अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र ब) वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच क) उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.
शिक्षण सप्ताह दिवस पाचवा
शिक्षण सप्ताह दिवस पाचवा
शुक्रवार दि. २६ जुलै २०२४
कौशल्य दिवस
सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण
प्रस्तावना
शिक्षणाबद्दल जागृती व महत्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षा सप्ताह हा कार्यक्रम या वर्षी भारतात साजरा करण्यात येत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात कौशल्य शिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी या आठवड्यात एक दिवस कौशल्य शिक्षणाबाबत विविध उपक्रम घ्यावयाचे आहे. या उपक्रमांतर्गत एक दिवस कौशल्य आणि डीजीटल शिक्षण यांतर्गत विविध उपक्रमाद्वारे २१ व्या शतकातील क्षमता व कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये साध्य करून त्यांना सक्षम करू शकतो.
कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यामध्ये रोजगारक्षमता वाढते, व्यक्तिमत्व विकास होतो व आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यामध्ये कौशल्य निर्मिती अभ्यासक्रमामुळे त्यांना नेमके काय करायचे आहे याची दिशा मिळते, त्यांच्या करिअर मध्ये प्रगती करण्यास सहाय्य मिळते, उद्योजकीय कौशल्य निर्माण होऊन रोजगार निर्मिती करता येते. यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी योगदान देऊ शकतो. विद्यार्थ्यामधील क्षमता व आवडीनुसार त्यांच्यामध्ये कौशल्य निर्मिती केल्यास व्यवसाय शिक्षणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य होऊ शकतात.
पार्श्वभूमी
भारताची तरुण व उत्पादक वर्गातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांना भविष्यवेधी कौशल्यासंबंधी सक्षम करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, शैक्षणिक धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ यामध्ये शिक्षणासोबत कौशल्य विकसनाच्या महत्वावर भर देण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यक्रमातील एक दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन विशेषत्वाने करायचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची ओळख करून देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.
याची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :
१) जागृकता वाढविणे यांतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपलब्ध कौशल्ये याबाबत माहिती द्यावयाची आहे.
२) सेतू निर्माण करणे - शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम यातील अंतर कमी करण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक, संस्था आणि नियोक्ते याबाबत माहिती उपलब्ध करून देणे यात अपेक्षित आहे
३) आवड निर्माण करणे पारंपारिक व्यवसायाच्या पलीकडले व्यवसायाचे मार्ग शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे यात अभिप्रेत आहे.
४) यशोगाथा कौशल्य शिक्षणातून समाजात यशस्वी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेचा प्रसार यातून केला जाणार आहे.
कौशल्य दिवस या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमाचे शाळेत अयोजन करता येईल. खाली दिलेल्या उपक्रमाचे आयोजन करताना कोणत्या विद्यार्थी कृतीचा समावेश करता येईल याबाबत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रमाचे आधीच नियोजन करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती करण्यासाठी खालील उपक्रमांतर्गत अधिकच्या कृतींचा समावेश करता येऊ शकेल.
१) संवाद कौशल्य, विक्री कौशल्य व विपणन कौशल्य (marketing) यांची ओळख -
उपक्रम - भूमिकाभिनय
विद्यार्थी कृतीः यांतर्गत विद्यार्थी संवाद कौशल्य, विक्री कौशल्य संबंधित विविध तंत्रे आणि विपणन धोरण यासंदर्भात कौशल्य विकसित करण्यासाठी भूमिकाभिनय या उपक्रमात सहभागी होतील.
ग्राहक प्रतिबद्धता व उत्पादन सादरीकरण
१) यात अभिरूप वातावरणात विद्यार्थी ग्राहकांना सेवा उपलब्धतेबबात माहिती सांगतील
२) सेवा व उत्पादने याबाबत ग्राहकांना प्रभावीपणे माहिती देतील. ३) ग्राहकांच्या गरजेनुरूप सेवा व उत्पादनाचे वैशिट्य सांगतील
आक्षेप हाताळणे व विक्रीबाबत योग्य निवड उपलब्ध करून देणे -
१) विद्यार्थी ग्राहकांचे आक्षेप अभिरूप वातावरणात आत्मविश्वासपूर्वक हाताळतील
२) ग्राहकांना खरेदीचा योग्य निर्णय घेण्यासाठी मन वळवण्याच्या तंत्राचा वापर करून विक्रीसाठी उपलब्ध पर्याय सांगतील.
*ग्राहक ओळख व निश्चितीकरण व बाजार संशोधन
१) विद्यार्थी लोकसंख्याशास्त्र, मानसशास्त्र, वर्तनावर आधारित वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा लक्ष्य गट निश्चित करतील
२) विद्यार्थी ग्राहकांची प्राधान्ये, स्पर्धकांचे विश्लेषण समजून घेण्यासाठी बाजार संशोधन करतील.
मॉक मार्केटिंग कॅम्पेन डेवलपमेंट
१) विद्यार्थी शाळेतील उपक्रम, कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी मॉक
मार्केटिंग मोहिमेत सहभागी होतील
२) पोस्टर्स, फ्लायर्स, मिडिया पोस्ट्स यासारखी प्रचारात्मक सामग्री विद्यार्थी तयार करतील.
३) लक्ष्यगट ग्राहकांना आकर्षित करण्यास व खरेदीप्रक्रियेत गुंतवून ठेवण्यास आकर्षक जाहिराती व विविध धोरणाची आखणी विद्यार्थी करतील
२) सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती
उपक्रम-ऐतिहासिक स्थळाला भेट
कौशल्य -ऐतिहासिक जागृती, सांस्कृतिक समज, निरीक्षण व विश्लेषण
विद्यार्थी कृतीः
१) या उपक्रमातून विद्यार्थी एखाद्या ऐतिहासिक वास्तुबद्दलचा संपन्न वारसा, व विशिष्ट संसृतिक महत्व याब्त माहिती घेतील
२) विद्यार्थी ऐतिहासिक स्थळ तज्ञ किंवा गाईड यांच्या मदतीने वस्तूबाबत माहिती घेतील.
३) यात विद्यार्थी त्या वास्तूचा इतिहास, ऐतिहासिक पात्र वास्तुशिल्प वैशिष्ट्ये याबाबत माहिती घेतील
४) विद्यार्थी यात वास्तुशिल्प अभ्यास संदर्भ साहित्य साहित्य अभ्यास आणि सदर वस्तूचा स्थानिक क्षेत्रातील इतिहास व वारसा यावर होणाऱ्या परिणामाबाबत चर्चा करतील
५) ऐतिहासिक वारसाच्या जतन व संरक्षणाचे महत्व, त्यांचे भूतकाळातील संस्कृती समजून घेण्यात त्यांचे महत्व, समकालीन समाजावर त्याचा होणारा परिणाम याबाबत चर्चा करतील
६) विद्यार्थी विविध गोळा केलेल्या ऐतिहासिक कलाकृती व वस्तू यांच्या संग्रहातून शाळेमध्ये ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे प्रदर्शन करू शकतील
७) विद्यार्थी ऐतिहासिक व्यक्तींचे योगदान याबाबत त्यांच्या उपलब्ध स्मारकातून माहिती गोळा करतील
८) स्थानिक इतिहासातील महत्वाच्या व्यक्तीचे त्यांचे समाजातील योगदान, त्यांचे कार्य यावर चर्चा करतील व त्यांच्या सन्मानाचे महत्व समजून घेतील.
९) इतिहासात योगदान देणाऱ्या व्यक्ती व वास्तूच्या माहितीतून विद्यार्थी मुल्ये व समाजातील योगदान याबाबत माहिती जाणून घेतील
३) निसर्ग व शेतीतून अध्ययन
उपक्रम- सेंद्रिय शेती, बागायती रोपवाटिका, कृशिबजार, दुग्ध संकलन केंद्र, पशुपालन प्रशिक्षण केंद्र, सहकारी संस्था, उद्याने, वने, बाग, तळे यांना भेट या उपक्रमांचा समावेश यात करता येईल.
कौशल्य : पर्यावरणीय जागरूकता, शोध, सर्जन शीलता विद्यार्थी कृतीः
१) विद्यार्थी या उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्ट पूर्तीसाठी भेट देतील
२) विविध वनस्पती, प्राणी, विविधता, सातत्य, नैसर्गिक प्रक्रिया यांचे मुद्देनिहाय निरीक्षण करतील
३) विद्यार्थी सजीवांच्या प्रकारांचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्तन, प्राण्यांची राहण्याची ठिकाणे याबाबत निरीक्षण करतील.
४) फायदेशीर कीटक व हानिकारक कीटक यांचे वर्गीकरण करतील
४) घरगुती कामातून शिकणे
उपक्रम - स्वयंपाक, स्वच्छता, बागकाम
कौशल्य - नियोजन, मोजमाप, वेळेचे व्यवस्थापन, संयम आणि पर्यावरणाची समज स्वयंपाक
१) विद्यार्थी स्वयंपाकातील एखादा खाद्य घटक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, पाक कृती, त्यादरम्यान आवश्यक सुरक्षितता नियम, स्वच्छता याबाबत माहिती सांगतील.
२) साफसफाई व स्वच्छता विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व विशद करतील, याबाबत शालेय, वर्ग स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतील.
३) बागकाम विद्यार्थी, विविध वृक्षांची लागवड, त्याची काळजी, संगोपन, पर्यावरणीय घटकांचा वनस्पतीवर होणारा परिणाम याबाबत उपक्रम राबवतील
५) हॅकेथॉन-
उपक्रम- कोडींग स्पर्धा
कौशल्य- समस्या निराकरण, प्रोग्रामिंग, संगणीकरण
विद्यार्थी कृतीः
१) विद्यार्थी गटामध्ये कोडींग स्पर्धा किंवा अप्लिकेशन तयार करण्यासाठी कार्य करतील.
२) प्रकल्पाचे सादरीकरण करतील
६) प्रसार माध्यम आणि करमणूक
उपक्रम - ऑनिमेशन आणि डिजिटली कथा सांगणे.
कौशल्य- संगणकीय विचार, कथा सांगणे, डीजीटल साक्षरता
विद्यार्थी कृतीः
विद्यार्थी स्क्रॅच या अप्लीकेशनच्या माध्यमातून कथा तयार करतील.
१) २) या उपक्रमातून विद्यार्थी कोडींग व अॅनिमेशनचे मुलभूत घटक शिकतील
७) डिझाईन
उपक्रम-डिझाईन थिंकिंग कार्यशाळा
कौशल्य - सहानुभूती, सर्जनशील विचार, समस्या निराकरण
विद्यार्थी कृतीः
१) या उपक्रमातून विद्यार्थी वर्गाचा नकाशा तयार करतील आणि त्याचा उपयोग इतर उपक्रम राबविण्यासाठी कसा उपयोग होईल याचा विचार करतील.
२) शालेय उपहार गृहातील कचरा कमी करून तेथील जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याचा आराखडा विकसित करतील.
३) यांसारख्या उपक्रमाचा यात सहभाग करता येईल.
(विद्यार्थी आनंद वर्गाची भन्नाट कल्पना, सुधा मूर्ती यांची पुस्तके, रीडर्स डायजेस्ट इ. यासारख्या पुस्तकांचे वाचन करून out of box विचार करू
शकतील)
८) मातीकाम कौशल्य
उपक्रम- मातकामातील विविध कौशल्याची माहिती देणे.
कौशल्य- शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य इत्यादी.
विद्यार्थी कृतीः
१) विद्यार्थी एक कला प्रकार म्हणून मातीच्या वस्तू तयार करणे याचा इतिहास व महत्व याची माहिती घेतील.
२) मातीपासून विविध वस्तू उदा. वाट्या, फुलदाणी तयार करतील.
९) बांबू कला कार्यशाळा-
उपक्रम- बांबू हस्तकला
कौशल्य- शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य, पर्यावरण जागरूकता इत्यादी.
विद्यार्थी कृतीः
A) बांबू क्राफ्ट तंत्र
१)) आयोजित कार्यशाळेमध्ये बांबू कापणे, आकार देणे आणि जोडणे यांच्या पारंपारिक पद्धतीचा वापर करावयास शिकतील
२) यासाठी चाकू किंवा करवत याचा वापर व त्या दरम्यानची सुरक्षितता यांचे
पालन करतील.
३) बांबूच्या वस्तू तयार करण्यासाठी विविध पद्धती शिकतील.
B) बांबू हस्तकला प्रकल्प
१) यामध्ये विद्यार्थी बांबूपासून बास्केट, फुलदाण्या, पेन स्टैंड यासारख्या वस्तू तयार करतील.
२) या वस्तूंना आकर्षक करण्यासाठी रंगवणे, सजवणे इत्यादीसारख्या विविध तंत्राचा शोध घेतील.
३) बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात सहभाग घेतील.
१०) पिशवी निर्मिती कार्यशाळा-
उपक्रम - चिंध्या पासून पिशव्या बनवणे.
कौशल्य - शिवणकाम, कारक कौशल्य, सर्जनशीलता.
विद्यार्थी कृतीः
१) या कार्याशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निरोपयोगी कपड्यांपासून पिशव्या तयार करणेबाबत माहिती दिली जाईल.
२) या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पिशव्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य,
तंत्र, विविध प्रकारच्या पिशव्यांचे उपयोग माहिती होईल. ३) विद्यार्थी स्वतः उपलब्ध साधनातून पिशवी तयार करतील.
११) सुरक्षित पाणी
उपक्रम- पाणी चाचणी कार्यशाळा.
कौशल्य- वैद्यानिक दृष्टीकोन, निरीक्षण, विश्लेषणात्मक विचार.
विद्यार्थी कृतीः
१) या उपक्रमातून विद्यार्थी पाण्याची गुणवत्ता तपासण्याची वैद्यानिक पद्धती शिकतील.
२) विविध स्त्रोतातून पाण्याचे नमुने गोळा करून पाण्याची गुणवत्ता तपासतील. ३) विद्यार्थी विविध चाचणी पद्धती, स्वच्छ पाण्याचे महत्व आणि पाणी चाचणीसाठी लागणारे साहित्य याबाबत माहिती घेतील.
४) जवळच्या जलस्त्रोतातील पाणी दुषित करणारे घटक आणि त्यांच्या आरोग्यावरील परिणामांबद्दल माहिती घेतील.
५) या कार्यशाळेत पाणी शुद्धीकरण पद्धतीचे प्रात्यक्षिक याचे निरीक्षण करतील.
१२) मातीची सुपीकता
उपक्रम - माती परीक्षण कार्यशाळा.
कौशल्य - वैद्यानिक निरीक्षण, माहिती संकलन, विश्लेषण
विद्यार्थी कृतीः
१) या कार्यशाळेत विद्यार्थी मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्याच्या पद्धती जाणून घेतील.
२) कार्यशाळेसाठी विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणातून मातीचे नमुने गोळा करून आणतील.
३) माती परीक्षण कीट वापरून मातीचा पोत, PH पातळी, पोषक घटक यांचे विश्लेषण करतील.
१३) व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट
उपक्रम - व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट
कौशल्य- व्यवसाय मार्गदर्शन, सहयोग
विद्यार्थी कृतीः
१) शालेय अथवा वर्गस्तरावर यशस्वी व्यावसयिक किंवा उद्योजक यांच्या व्याख्यानातून त्यांचा व्यवसायाचा प्रवास जाणून घेतील.
२) व्यावसायिकांच्या व्यवसाया दरम्यान आलेले अडथळे व त्यावर केलेली मात, टिकवलेले सातत्य याबाबत माहिती घेतील. ३) यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती घेतील.
१४) प्रथमोपचार कार्यशाळा
शिक्षण सप्ताह दिवस ४ था
शिक्षण सप्ताह
दिवस चौथा
शिक्षा सप्ताहः शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव
गुरुवार दि. २५ जुलै २०२४
सर्व शाळांमध्ये २५ जुलै २०२४ रोजी सांस्कृतिक दिन साजरा करणे. NEP २०२० मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीधी शिफारस करण्यात आली आहे. २२-२८ जुलै २०२४ दरम्यान शिक्षा सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजेच दि. २५ जुलै २०२४ रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा. हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा.
सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे
१. सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता, जागतिक जागरुकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेच्या प्रचार करणे.
२. कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनविणे.
३. शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे.
हा उपक्रम सुसंवाद आणणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे, अभिव्यक्तीला चालना देणे, सौहार्दपूर्ण वातावरणास प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल.
त्यासाठी पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.
> शाळांमध्ये विविध भाषा, वेशभूषा, खाद्यपदार्थ, कला, वास्तुकला, स्थानिक खेळ, चित्रकला, नृत्य, गाणी, नाट्य, लोक आणि पारंपारिक कला, पथनाट्य (नुक्कड नाटक), कठपुतळीचे कार्यक्रम, कथा-कथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
> लोक, प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम, सामुदायिक गायन, लोकनृत्य, शास्य आणि प्रादेशिक लोकप्रकार इ.
कलाप्रकारांतून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे.
> स्थानिक आणि पारंपारिक कलाकार/कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे. किंया शाळा स्थानिक कलाकार/कारागीर आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटींचे आयोजन देखील करू शकतात.
> संपूर्ण शाळेत पेंटिंग डे' किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे. जेथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमांसह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात.
> सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात. स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बाल भवन आणि बाल केंद्र, पुरातत्व स्थळे, विविध प्रकारची संग्रहालये इत्यादींचे सहकार्य घेण्यात यावे.
उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे
१. राज्य/संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबवले जातील. तथापि, अशा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा.
२. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण, सर्जनशील असावा
३. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे
४. विशेष गरजा असलेल्या मुलांचा (CWSN) सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमांची रचना करण्यात यावी.
शिक्षण सप्ताह दिवस ३रा
शिक्षण सप्ताहः
शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव
दिवस तिसरा
बुधवार दि. २४ जुलै २०२४ क्रीडा दिन
नवीन राष्ट्रीय धोरण (NEP 2020) गध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती, लोककला यांचा परिचय उत्तम रित्तीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे. या अनुषंगाने केंद्र शारानाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने २१ ऑगस्ट २०२३ रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत.
उद्दिष्ट्ये:- विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी-
१. खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्वाबद्दल जागरुकता वाढविणे.
२. समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे.
३. तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे.
४. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे
५. खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे,
६. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. (विशेषतः
भारताचे स्वदेशी खेळ)
७. विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे.
८. विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त बनवणे.
९. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून
विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे.
१०. खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे.
शिक्षण सप्ताहाच्या तिसन्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हंटले आहे. या अनुषंगाने पुढील गार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.
> शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील १ ते २ तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे.
> इयत्ता १ ली ते ५ वी साठी सापशिडी, पत्ते, शर्यत, गोट्या, सागरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा लिंबू, सुई दोरा, दोरीवरच्या उड्या अश्या प्रकारचे खेळ घ्यावेत.
> इयत्ता ६ वी ते १२ वी साठी बुद्धिबळ, सारीपाट, खो-खो, कबड्डी, विटी दांडू, भालाफेक,
मल्लखांब, धावणे शर्यत, लंगडी, लगोरी, ३ पायांची शर्यत, लांब उडी व उंच उडी, लेझीम, हे खेळ घ्यावेत
> तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या ७५ स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी.
> शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा, खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा.
> स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य
सहभागी होतील याची दक्षता घ्यावी.
> पालक आणि नागरी समाज संस्था यांचे मदत घेण्यात यावी.
> सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समवेश करण्यात यावा.
अपेक्षित परिणामः-
विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल.
वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल.
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती, निष्पक्षता, संघकार्य आणि एकता ही मूल्ये रुजविली जातील.
शिक्षण सप्ताह दिवस दुसरा
शिक्षा सप्ताह दिवस दुसरा
मंगळवार दि.२३ जुलै २०२४ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान :
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर धोरणातील
महत्वपूर्ण कार्यनिती पुढीलप्रमाणेः
१) पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण (ECCE) याला प्राधान्यक्रम
२) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी (शासननिर्णय २७ ऑक्टोबर २०२१)
३) उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्य चे विकसन
४) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन
५) बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रीय सहभाग
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे महत्व
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता २ री च्या अखेरीस आकलनासह वाचन व मुलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय. संबंधित कौशल्ये ही पुढील
बाबीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतात.
a बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकर,न
अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास निर्मिती
समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे.
शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे
सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.
उदिष्टे :
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाण- घेवाण करणे.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षण तज्ञ, पालक व समुदाय यांचा सक्रीय सहभाग घेणे.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरीता आयोजित करावयाचे उपक्रम :
कार्यशाळा व परिसंवाद आयोजन: पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण
अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा/परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचे आयोजन करावे. बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन :
1. शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी.
https://www.youtube.com/watch%20?v=u4R9iLox3ik&t=9s&ab%20channel=%20NCERT OFFICIAL
२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरीत करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका (मराठी, इंग्रजी, उर्दू) व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जावू शकतात. शाळेच्या सकाळच्या सत्रातील ३० मिनिटे भाषेचे तसेच ३० मिनिटे गणिताचे खेळ घेतले जावू शकतात.
३. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल.
४. जादुई पिटारा/PSE कीट शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले PSE कीट / महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृती करून घेण्यात याव्यात.
५. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी (नोडल अधिकारी) हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेवू शकतात.
६. विद्यार्थ्यांना वर्गात, शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टीचे ऐकवाव्यात तसेच त्याचे वाचन करावयास लावाचे व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित. वेविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देता येईल.
७. राज्याद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून (जादुई पिटारा. पीएसइ संच) खेळाधारित अध्ययन / उपक्रम घेण्यात यावे तसेच बाहुलीनाट्याचे सत्र आयोजित करता येईल.
८. शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय, नृत्याचे कार्यक्रम तसेच मुळाक्षराची व अंकांची गाणी, विविध मुळाक्षराच्या व भौमितिक आकृत्याच्या रांगोळ्या, भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजावटी, पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरविण्यात यावे व याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला व हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जाणीव जागृती करता येवू शकते.
९. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची उदिष्टे, महत्य व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या चित्र फितीचे प्रक्षेपण करण्यात यावे.
9.https://www.youtube.com/watch?v=SOzerROJmXq&ab%20channel-NCE%20RTOFFICI
१०. शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास वाचन तासिका घेण्यात यावी.
११. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तदनुषंगिक बाबीच्या साह्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे..
१२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोस्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत दि.९. फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमांचा देखील समावेश करता येईल.
समुदायाचा सहभाग
- शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांचा शाळेतील सदर उपक्रमात सक्रीय सहभाग घेण्यात यावा.
- उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक ८,११ यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमाचे आयोजन करून पालक व समुदायाचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.
शिक्षण सप्ताह विविध उपक्रम राबविणेबाबत...
शिक्षण सप्ताह
२८ जुलैपर्यंत राबविणार विविध उपक्रम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या ही चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २८ त जुलैदरम्यान शिक्षण सप्ताह साजरा न करण्यात येणार आहे. या शिक्षण र सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस ■ एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित - करण्यात आला आहे.
शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारकांमध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे. हा सप्ताह सर्व शाळांसह अंगणवाडी केंद्रामध्येदेखील राबविण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या. त्या अनुषंगाने योजनेची अंमलबजावणी होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिल्या. राज्यात शासकीय ६५ हजार ४३१, तर सीबीएसई व इतर बोर्डाच्या ४३ हजार २० अशा एकूण १ लाख ८ हजार ४५१ शाळा आहेत. त्यापैकी शासकीय ३२ हजार ५०३ व सीबीएसईच्या १६ हजार ८९ अशा एकूण ४८ हजार ५९२ शाळांनी यामध्ये सहभाग घेतला.
राबविण्यात येणारे उपक्रम
■ सोमवार (ता. २२) : अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस
■ मंगळवार (ता. २३) : मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस
■ बुधवार (ता. २४) : क्रीडा दिवस
■ गुरुवार (ता. २५) : सांस्कृतिक दिवस
■ शुक्रवार (ता. २६) : कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस
■ शनिवार (ता. २७) : मिशन लाइफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब
उपक्रम, शालेय पोषण दिवस
■ रविवार (ता. २८) : समुदाय सहभाग दिवस
शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण
शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण
शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे शिक्षणातून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण.
शिक्षण क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्याना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम व्हावे तसेच मुलभूत संशोधनास वाव मिळावा हा या फेलोशीपचा हेतू आहे.यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने २० प्राथमिक शिक्षक आणि १० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप दिली जाणार आहे. सदर फेलोशिपची रक्कम साठ हजार असेल.
आज घडीला शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची नितांत आवश्यकता वाटते आहे. यावर्षी (२०२४ -२५) महाराष्ट्रातील २० प्राथमिक आणि १० माध्यमिक शिक्षकांना आणि १० एकात्मिक बी. एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप देण्यात आली. या फेलोशिप अंतर्गत भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजविणे, स्वयंअध्ययन आणि सहअध्ययन यांचा अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत प्रभावी वापर, कला व खेळ यांच्याशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचे आकलन वाढविणे, वाचन आणि आकलन वाढवण्यासाठीचे उपक्रम, पालक आणि स्थानिक समाज यांचा शालेय कामकाजात आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभाग, शाळेची इमारत आणि परिसर यांचा शैक्षणिक साधन म्हणून वापर, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल लर्निंगचा प्रभावी वापर, असे उपक्रम या वर्षीच्या फेलोशिप प्राप्त शिक्षकांनी निवडले आहेत.
ही केवळ उदाहरणे म्हणून दिली आहेत, तरी परंतु आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, कोणते उपक्रम निवडावे याचे संपूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असेल. २०२५- २६ च्या फेलोशिपसाठीची अर्ज प्रक्रिया १८ जुलै २०२४ पासून होत आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ अखेर *https://apply.sharadpawarfellowship.com* या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.