डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
#Maharashtra लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#Maharashtra लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिक्षण क्षेत्रात घसरण शरद पवार

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स 2.0 (पीजीआय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्‍या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.

राज्य म्हणून शैक्षणिक गुणवत्तेत खूपच मागे पडलो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पीजीआय अहवालासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. यासंदर्भात संबधितांची लवकरात लवकर बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. 

सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेयव्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे, ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे, असे विधान शरद पवार यांनी केलेले आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा ...

 महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आज कोकणसह मराठवाड्यात मुंबईच्या हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.

तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडताना दिसत आहे. मात्र, आता राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

विदर्भात ऑरेंज अलर्ट

हवामान खात्यानं आज 20 ऑगस्टला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. 

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही यलो अलर्ट दिला आहे. तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथेही यलो अलर्ट जारी केलाय. दरम्यान, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा इथे आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नोकरी नाही म्हणून विद्यार्थ्यांची डी.टी.एडकडे पाठ फिरवली

दरम्यान, 21 ऑगस्टला म्हणजे उद्या ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती पिकांचे देखील या पावसामुळं नुकसान झालं होतं. ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे.

राज्याचे मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर..#maharashtra,

 राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

श्री  राधाकृष्ण विखे-पाटील - 

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

------------------------------------------------------------

सुधीर मुनगंटीवार- 

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

------------------------------------------------------------

चंद्रकांत पाटील- 

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

------------------------------------------------------------

डॉ. विजयकुमार गावित- 

आदिवासी विकास

------------------------------------------------------------

गिरीष महाजन- 

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

------------------------------------------------------------

गुलाबराव पाटील-

 पाणीपुरवठा व स्वच्छता

------------------------------------------------------------

दादा भुसे-

 बंदरे व खनिकर्म

------------------------------------------------------------

संजय राठोड- 

अन्न व औषध प्रशासन

------------------------------------------------------------

सुरेश खाडे- 

कामगार

------------------------------------------------------------

संदीपान भुमरे- 

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

------------------------------------------------------------

उदय सामंत- 

उद्योग

------------------------------------------------------------

प्रा.तानाजी सावंत- 

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

------------------------------------------------------------

रवींद्र चव्हाण - 

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

------------------------------------------------------------

अब्दुल सत्तार-

 कृषी

------------------------------------------------------------

दीपक केसरकर-

 शालेय शिक्षण व मराठी भाषा

------------------------------------------------------------

अतुल सावे-

 सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

------------------------------------------------------------

शंभूराज देसाई- 

राज्य उत्पादन शुल्क

------------------------------------------------------------

मंगलप्रभात लोढा- 

पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर...