डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
#Song लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#Song लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ओ देश मेरे...

 शाळेतील विद्यार्थी घडवितांना गुणवत्ता व कलागुणांचा त्यांच्यात भंडार व्हावा हाच सदैव उद्देश ठेवत कार्य करत आलो आहोत.... 

मुरुमखेडावाडी शाळेतील कु. कल्याणी व साक्षी बचाटे यांनी कठीण असे गीत आत्मसात केले आहे.

    नक्कीच पहा 👇



      प्रकाशसिंग राजपूत व दिलीप आढे

        सहशिक्षक 

       मुरुमखेडावाडी 

लगबग शाळेची गीत ...राजपूत प्रकाशसिंग

गेली दोन वर्षे  कोरोनाने शिक्षणाची फार दैना केली आता मात्र विद्यार्थी नव्या आशेने शाळा उघडण्याची वाट पहात आहे यावरच लिहिलेले हे काव्य ...

 कुणी गीत बनवू इच्छित असाल तर स्वागत 

     गीतलेखन     प्रकाशसिंग राजपूत 

               औरंगाबाद  9960878457 



 

लगबग लगबग ओढ शाळेची आता...


शाळेची घंटा वाजण्याची होती चिंता,

वर्षामागे वर्ष करोनाने वाया जाता,

रोहीण्या येता मनी उत्सव नवा सजता,

लगबग लगबग ओढ शाळेची आता .....



सुट्टीचा मनास लोभ खूप होता,

आता मात्र नको रे देवा पुन्हा  ही थट्टा,

अभ्यास  गेला वाहून पुर जसा येता,

खूप  शिकायचं स्वप्नं सत्यात यावं आता...


लगबग लगबग शाळेची ओढ आता.....



खुलेल शाळा बहरुन आम्ही जाता,

शिक्षणाची शिदोरी पुन्हा मिळता,

तेज नवा आम्हा बालकांना येता,

घरोघरी दीप ज्ञानाचा दिसेल पेटता,


लगबग लगबग शाळेची ओढ आता.....


खेळात नव्हता  रस काही उरता,

शाळेच्या गप्पांची उणीव राहता,

बालकांचा शत्रू करोना कसाच होता,

देवारं आस नव्याने घेतोय आता....


लगबग लगबग शाळेची ओढ आता.....



     *प्रकाशसिंग राजपूत*

           औरंगाबाद

        9960878457