डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
छ. संभाजीनगर नाव वापरणेबाबत आदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
छ. संभाजीनगर नाव वापरणेबाबत आदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दैनंदिन कामकाज व पत्रव्यवहारात औरंगाबाद ऐवजी "छत्रपती संभाजीनगर" हे नाव वापरणे बाबत

 शासकीय/निमशासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयीन फलकावर तसेच दैनंदिन कामकाज व पत्रव्यवहारात औरंगाबाद ऐवजी "छत्रपती संभाजीनगर" हे नाव वापरणे बाबत.

संदर्भ -

 1 महाराष्ट्र शासन अधिसूचना राजपत्र असाधारण क्र 364 दिनांक 15 सप्टेंबर 2023 संदर्भ


2. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र 2023 / प्राफेब/जमाबंदी/ कायी/1163 दि.18.09.2023 3. या कार्यालयाचे पत्र जाक्रजिप औ/ 04- प्रशासन/4012/2023 दिनांक 28/09/2023


4. महाराष्ट्र शासन, अधिसूचना राजपत्र असाधारण क्र 379 दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 5. कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पत्रक्र झेडपीए-2023/प्र.क्र.108/पं.रा-1 दिनांक 12.10.2023


उपरोक्त विषयी संदर्भ क्र. च्या अधिसुचना अन्वये महसुली क्षेत्राचे नाव औरंगाबाद जिल्हा, उपविभाग, तालुका व गावाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे. तसेच संदर्भिय क्र 4 नुसार ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचे अधिसुचना नुसार आदेशाचे दिनांकापासून जिल्हा, उपविभाग, तालुका व गावाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे.


सबब संदर्भ क्र 5 अन्वये, जिल्हा परिषद "छत्रपती संभाजीनगर" अंतर्गत सर्व खाते प्रमुख कार्यालय प्रमुख गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती अंतर्गत सर्व कार्यालय प्रमुख यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, त्यानी त्यांच्या कार्यालयीन फलकावर तसेच दैनंदिन कामकाज व पत्रव्यवहारात "छत्रपती संभाजीनगर" हे नाव वापरावे त्याचप्रमाणे उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावीपणे करावी. असे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशित केलेले आहे.

मुळ आदेश पहा....