शासकीय/निमशासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयीन फलकावर तसेच दैनंदिन कामकाज व पत्रव्यवहारात औरंगाबाद ऐवजी "छत्रपती संभाजीनगर" हे नाव वापरणे बाबत.
संदर्भ -
1 महाराष्ट्र शासन अधिसूचना राजपत्र असाधारण क्र 364 दिनांक 15 सप्टेंबर 2023 संदर्भ
2. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र 2023 / प्राफेब/जमाबंदी/ कायी/1163 दि.18.09.2023 3. या कार्यालयाचे पत्र जाक्रजिप औ/ 04- प्रशासन/4012/2023 दिनांक 28/09/2023
4. महाराष्ट्र शासन, अधिसूचना राजपत्र असाधारण क्र 379 दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 5. कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पत्रक्र झेडपीए-2023/प्र.क्र.108/पं.रा-1 दिनांक 12.10.2023
उपरोक्त विषयी संदर्भ क्र. च्या अधिसुचना अन्वये महसुली क्षेत्राचे नाव औरंगाबाद जिल्हा, उपविभाग, तालुका व गावाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे. तसेच संदर्भिय क्र 4 नुसार ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचे अधिसुचना नुसार आदेशाचे दिनांकापासून जिल्हा, उपविभाग, तालुका व गावाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे.
सबब संदर्भ क्र 5 अन्वये, जिल्हा परिषद "छत्रपती संभाजीनगर" अंतर्गत सर्व खाते प्रमुख कार्यालय प्रमुख गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती अंतर्गत सर्व कार्यालय प्रमुख यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, त्यानी त्यांच्या कार्यालयीन फलकावर तसेच दैनंदिन कामकाज व पत्रव्यवहारात "छत्रपती संभाजीनगर" हे नाव वापरावे त्याचप्रमाणे उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावीपणे करावी. असे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशित केलेले आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.