डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
मुरुमखेडावाडी शाळेला पुस्तक भेट.... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुरुमखेडावाडी शाळेला पुस्तक भेट.... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पुण्यातील उच्च शिक्षित तरुणाने दिली वाचन शिदोरी भेट.....

पुण्यातील उच्च शिक्षित श्री हर्षल जोगळेकर यांची मुरुमखेडावाडी शाळेतील विद्यार्थ्यांना अनोखी वाचन शिदोरी भेट.....


औरंगाबाद जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा क्षेत्रात असलेल्या करमाड केंद्रातल्या मुरुमखेडावाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पुण्यातील उच्च शिक्षित जाॕन डियर टॕक्टर कंपनीत कार्यरत असलेले श्री हर्षल जोगळेकर यांनी वाचनाची आवड विद्यार्थ्यांना लागायला हवी या दृष्टीने व शाळेतील एकूण उपक्रम पहात शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट पाठवली आहे. 

      शाळेचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांना फेसबूक वर संपर्क त्यांनी केला व विद्यार्थ्यांना भेट पाठवायची आहे म्हणून पत्ता मागविला. 
तेनालीरामचे रंजक किस्से, इचिगो  इची, सुलभ महाभारत,थैलीभर गोष्टी , आजीच्या पोतडीतल्या गोष्टी अशा दर्जेदार पुस्तकांचा यात समावेश आहे.
     हर्षल यांनी सांगितले मी पुण्यात राहतो सिंहगड रोड जवळ.
एक ट्रॅक्टर कंपनी त काम,  करतो.... जॉन डिअर नावाच्या.

मला वाचनाची आवड आहे. वाचनामुळेच मी माझ्या आयुष्यातील अनेक प्रसंगात कसे वागावे कसे वागू नये हे शिकलो.
त्यामुळे दर महिन्याला एका शाळेला मी पुस्तकं पाठवतो.

      मुलांनी मैदानी खेळ खेळावेतच त्यामुळे अंगात शक्ती येईल.त्यानंतर उनाडक्या करण्यापेक्षा किंवा चुकीच्या संगतीत पडण्यापेक्षा, पुस्तके वाचून व्यक्तिमत्त्व विकसित करावे असे वाटते. त्याने मन सशक्त होईल.

        मुरुमखेडावाडी शाळेची गेल्या ३ वर्षात झालेल्या प्रगतीचे हे एक अनमोल बक्षिस आहे. श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी हर्षल जोगळेकर यांचे  शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानले आहेत.