शाळांना इ.५ वी व इ. ८ वी चा वर्ग जोडण्याबाबत
राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळांच्या शाळांना इ.५ वी व इ. ८ वी चा वर्ग जोडण्याबाबतचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत. सदर प्रकरणी खालील मुद्द्यांची माहिती शासनास आजच सादर करावी. असे आदेशात निर्गमित करण्यात आलेले आहे.
१. सद्यस्थितीत राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळाच्या इ. १ ली ते इ. ४ थी, इ. १ ली ते इ. ७ वी, इ. ५ वी ते इ. ७ वी च्या किती शाळांना
इ. ५ वी / इ. ८ वी चा वर्ग जोडावयाची कार्यवाही अद्यापपर्यंत प्रलंबीत आहे.
२. तसेच राज्यातील किती जिल्हा परिषद शाळा संबंधीत नगरपालिका/ महानगरपालिका/ कटकमंडळे यांच्याकडे स्थलांतरीत करण्यात आलेल्या आहेत,
अशी माहिती ही शिक्षण संचालकांना विचारण्यात आलेली आहे.