डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
सैनिकी शाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सैनिकी शाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिक्षकांची पदसंख्या घटणार आता विशेषज्ञ शिक्षकांची होणार कंत्राटी नियुक्ती | teachers-jobs-sainiki-school|

 राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांसाठी केलेल्या सुधारित धोरणानुसार या शाळांतील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे. 

सद्यस्थितीत असलेली शिक्षकांची १ हजार १४ पदे कमी होऊन ७५६ पदे करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सैनिकी शाळांमध्ये सध्या रिक्त असलेल्या आणि भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांवरील शिक्षक भरती सेवाप्रवेश विषयक प्रचलित नियमांनुसार, तसेच पवित्र प्रणालीमार्फत करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



सद्यस्थितीत सैनिकी शाळांमध्ये १९९५च्या शासन निर्णयानुसार सहावी ते दहावीसाठी प्रति तुकडी दोन शिक्षक, तर २००२च्या शासन निर्णयानुसार अकरावी ते बारावीसाठी प्रति तुकडी ५.५ शिक्षक लागू आहेत. त्यानुसार सध्या सहावी ते दहावीसाठी ८२६ शिक्षक, अकरावी-बारावीसाठी १८८ शिक्षक मंजूर आहेत. मात्र, या ऐवजी आता संचमान्यतेच्या निकषांनुसार राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व सैनिकी शाळांमध्ये सातारा सैनिकी शाळेप्रमाणे सहावी ते दहावीसाठी प्रति तुकडी १.५ शिक्षक पदे मंजूर करावी, तर अकरावी, बारावीसाठी प्रति वर्ग प्रति तुकडी दोन या प्रमाणे एकूण चार पदे मंजूर करण्यात येतील. त्यामुळे सहावी ते दहावीसाठी ६२० शिक्षक, तर अकरावी-बारावीसाठी १३६ अशी एकूण ७५६ पदे अशी रचना करण्यात येणार आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधास प्रचलित कार्यपद्धतीनुसार सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागाची मान्यता घेतली जाणार आहे.

सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष वरुन रु.२० लक्ष करण्याबाबत अधिक वाचा...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध अंतिम केल्यावरही इतर विषयांच्या अध्यापनासाठी आवश्यकता भासल्यास विशेष शिक्षकांची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षण संचालकांची मान्यता घ्यावी लागणार आहे. तसेच प्रत्येक शाळेत तीन विशेषज्ञ शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती करण्यात येणार आहे.

🏮🎉🪄 *दिवाळी अभ्यास*🪄🎉🏮


*डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र व ॲक्टिव्ह गुरुजी  आपणासाठी खास दिवाळी सुट्टीसाठी  घेऊन आला आहे. मोफत दिवाळी अभ्यास 🎊🎉*


🪭🎁 *इयत्ता १ ली दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/22g3lbgf

🪭🎁 *इयत्ता २ री दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/2cpczadq

🪭🎁 *इयत्ता ३ री दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/28k4a442

🪭🎁 *इयत्ता ४ थी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/23xnep3g

🪭🎁 *इयत्ता ५ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/2y2tabla

🪭🎁 *इयत्ता ६ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/27o9n3rn

🪭🎁 *इयत्ता ७ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/235nzptd

🪭🎁 *इयत्ता ८ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/2ckalusr

🪭🎁 *इयत्ता ९ वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/29cel6nv

🪭🎁 *इयत्ता १०वी दिवाळी अभ्यास*🎁🪭

https://tinyurl.com/24k9xyc6

🖼️🎈🎁 *दिवाळी स्पेशल पेन्टीग👇*🎁🎈🖼️

https://tinyurl.com/299nxezb

           *संकलन*

   *प्रकाशसिंग राजपूत*

*📺 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🖥️*


*जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा...*