आश्वासित प्रगती योजना
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या (१०, २० व ३० वर्षानंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय करणारी) सुधारीत सेवातंर्गत आश्वासित प्रगती योजना
दिनांक ०१/०१/२०१६ पासून अस्तिवात आलेली आहे.महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०२/०३/२०१९ नुसार सुधारीत सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे.
सदरची योजना दिनांक ०१/०१/२०१६ पासून अंमलात आली आहे. सातव्या वेतन आयोगातील वेतन स्तर एस-२० पर्यंत वेतन घेणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू राहील.
या योजनेतील पात्र अधिकारी / कर्मचारी यांना संपूर्ण सेवेत पात्रतेनुसार तीन वेळा लाभ मंजूर होईल, जर कार्यात्मक दोन वेळा पदोन्नत्या मिळाल्या असतील तर या योजनेत एकच लाभ अनुज्ञेय होईल.
जे अधिकारी / कर्मचारी दिनांक ०१/०१/२०१६ पूर्वीच शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत/ मृत्यू पावले आहेत त्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही. जरी दि. ०१/०१/२०१६ पूर्वी या योजनेच्या लाभास अधिकारी/ कर्मचारी पात्र ठरत असले तरी, दिनांक ०१/०१/२०१६ पासूनच या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल.