डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
National awarded लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
National awarded लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खोसे सरांचे विचार....

डिजिटल समूह उस्मानाबादचे तंत्रस्नेही समूह सदस्य व यावर्षी तब्बल २ राष्ट्रीय  पुरस्काराने सन्मानित खरोखर आदर्श कार्य असलेले श्री उमेश खोसे सरांचे विचार वाचा....

🙏 *मनःपूर्वक धन्यवाद व आभार* 🙏
         *कृतज्ञ मी, कृतार्थ मी*

🙏 *विद्यार्थी हेच दैवत मानून गेली 14 वर्षे झाली शिक्षण सेवेचा वसा घेऊन काम करत आहे. यात जि.प.प्रा.शाळा लमाण तांडा बेळब व जि.प.प्रा.शाळा जगदंबानगर कडदोरा या दोन शाळेत कार्य केले,करत आहे. जे काही करायचे ते विद्यार्थी व शाळा विकासासाठी करायचे हे ध्येय ठेवून सातत्याने काम करत आहे. हे करत असतानाच  30 जून 2021 रोजी राष्ट्रीय आय.सीटी.पुरस्कार जाहीर झाला व 18 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.*
         *खरे तर 30 जून रोजी आय.सीटी. पुरस्कार जाहीर झाल्यापासून सातत्याने प्रत्यक्ष भेटून, सोशल मिडियाद्वारे, पत्राद्वारे, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाद्वारे, अभिनंदन, कौतुक व सन्मान होत आहे. त्याच वेळी आभार प्रदर्शन व्यक्त करावे वाटत होते परंतु राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मुलाखती सुरू होत्या आणि मनाला पक्का विश्वास नव्हे खात्री होती की यावेळी आपल्याला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळेल व त्याच वेळी आपण दोन्ही पुरस्काराचे आभार व्यक्त करूया. ( खर तर हे चुकीचे होते ) पण सातत्याने सर्वांनी सन्मान करत असल्याने गेली साडे तीन महिने कसे गेले ते समजलेच नाही. आभार व्यक्त करायला नक्कीच उशीर झाला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. काम असताना सतत एकच विचार मनात राहायचा तो म्हणजे*
➖➖➖➖➖➖➖➖➖ 
*कष्ट इतके शांततेत करा की*
*यशाने गोंधळ घातला पाहिजे.*
*जे पाहिजे ते एका दिवसात होणार नाही*
*परंतु एक दिवस नक्की होणार आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖

      *यापूर्वीही मी 2 वेळा प्रयत्न केला व दिल्लीपर्यंत सादरीकरण करून यश आले नव्हते. परंतु अपयशाने खचून जान्यासारखे काहीच नव्हते. कारण अजून 25 वर्षे सेवा शिल्लक आहे असे समजायचो. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी कोणाला तरी प्रतिनिधित्व करण्याची संधी देत असतो. कारण शिक्षक संख्या खुप जास्त आहे, पुरस्कार संख्या देशातून 45 व महाराष्ट्रात मागील 3 वर्षे एकच मिळत होता. त्यामुळे सर्व शिक्षक बांधवांचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मला लाभले आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*चांगले विचार आणि चांगले लोक तुमच्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही.*
➖➖➖➖➖➖➖➖➖

*जुन 2007 सालापसून काम करत असताना विद्यार्थी विकासासाठी जे जे करता येईल ते ते करत आलो. यामध्ये बेळब तांडा व कडदोरा गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक महिला, तरुण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सहकारी शिक्षक यांनी माझ्यापेक्षाही जास्तीचे योगदान दिले. उमरगा तालुक्यातील शिक्षक मित्र परिवार यांचे प्रोत्साहन नक्कीच अविस्मरणीय आहे.*
      *खर तर राष्ट्रीय स्तरावरील एक पुरस्कार मिळावा हे शिक्षकांच्या आयुष्यात स्वप्न असते. पण निःस्वार्थ भावनेने केलेल्या कामाची पावती म्हणजे एकाच महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार जाहीर झाले. आणि गेली साडे तीन महिने झाले सातत्याने आपले प्रेम मिळत आहे, सन्मान मिळत आहे, कौतुक करत आहात. नक्कीच जीवनातील सर्वोत्तम काळ जगत आहे. यातच कडदोरा ग्रामस्थ व जगदंब प्रतिष्ठण यांनी बैलगाडीतून काढलेली मिरवणूक व उमरगा तालुका शिक्षक समिती परिवाराच्या वतीने केलेला सन्मान हा जीवनातील अत्युच्च आनंद देणारे प्रसंग होते.*
       *राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 व राष्ट्रीय आय.सीटी पुरस्कार 2018 हे  पुरस्कार मी माझ्या शाळेतील बालकांना समर्पित केलेले आहेत. तसेच हे पुरस्कार महाराष्ट्र व उस्मानाबाद जिल्ह्यातील, उमरगा तालुक्यातील, माझ्या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सतत धडपडणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा आहे. माझ्या बेळब व कडदोरा गावाच्या  प्रत्येक बालक व पालकांचा व ग्रामस्थांचा आहे . मला शिक्षक म्हणून घडविणाऱ्या गुरुजनांचा आहे.  मला प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक मित्रांचा आहे.  शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या अधिकार्‍यांचा, पदाधिकाऱ्यांघा आहे. शिक्षणाला समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मिडीयाचा आहे. मला जन्म देणाऱ्या माझ्या जन्मदात्यांचा हा सन्मान आहे. सोबतीने साथ देणाऱ्या धर्म पत्नीचा आहे. मी तर केवळ एक प्रतिनिधी आहे.*

🙏 *या गेल्या साडे तीन महिन्यात नक्कीच आपल्याला प्रतिसाद देणे शक्य झाले नसेल, एखादा कॉल घेणे शक्य झाले नसेल. बोलताना किंवा लिहताना कोणाचे आभार मानायचे राहून गेले असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.*

💐 *आपण वेळात वेळ काढून मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळल्याबद्दल अभिनंदन केलात, कौतुक केलात, सन्मान केलात त्याबद्दल आजच्या या शुभ दिनी दसऱ्याच्या दिवशी आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. यापुढेही आपले प्रेम व आशीर्वाद असेच मिळत राहो हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो.*

🌳 *आपणास व आपल्या कुटुंबास दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.*

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

✍️ *श्री.उमेश रघुनाथ खोसे*
     राष्ट्रीय आय.सीटी पुरस्कार 2018
    राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021
     मराठवाडा रत्न पुरस्कार 2021

https://www.ukguruji.in/2021/10/blog-post_15.html?m=1

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏