डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
education लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
education लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

'विकसित भारत' लक्ष्य प्राप्तीसाठी विकसित शिक्षण प्रणाली व आरोग्य व्यवस्था आवश्यक - राज्यपाल रमेश बैस

'विकसित भारत' लक्ष्य प्राप्तीसाठी विकसित शिक्षण प्रणाली व आरोग्य व्यवस्था आवश्यक - राज्यपाल रमेश बैस

 भारताचा महामार्ग विकसित शिक्षण प्रणाली, विकसित आरोग्य सेवा, उद्यमशीलता व नवसृजनाच्या वाटेने जातो, असे सांगून विकसित भारताचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी नव्या भारतातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.


राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. १३) प्रशासन, पोलीस, आरोग्यसेवा, समाजकार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ६५ व्यक्तींना 'नव भारत के शिल्पकार' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रकाशनाचे ९० वर्षे साजरे करीत असलेल्या नवभारत समूहातर्फे हे पुरस्कार देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे औचित्य साधून नवभारत समूहातर्फे 'शिव राज्याभिषेक ३५० वर्ष' या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षांनी भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयाला आला आहे. आपल्याला भेटणारे विविध देशांचे राजदूत, विविध देशांचे संसद सदस्य या सर्वांचे या बाबतीत मतैक्य असल्याचे त्यांनी सांगितले. भारत येत्या काही वर्षात जगातील तिसरी मोठी आर्थिक सत्ता होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला असल्याचे सांगून विकसित भारत ध्येय गाठण्यासाठी विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. या दृष्टीने आपण राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना 'विकसित विद्यापीठ' बनविण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले

नवभारत नवराष्ट्र तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर सचित्र ग्रंथ काढल्याबद्दल आनंद व्यक्त करुन प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे महिलांचा सन्मान, विविध धर्म व पंथांचा आदर व जनसामान्यांचे कल्याण यासाठी कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.


शिक्षण आयुक्तांच्या या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

 

राज्यातील 36 शिक्षण अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी, असे पत्र  शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अर्थात् एसीबीला लिहिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचे आयुक्तांनी पत्रात लिहिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेताना पकडले जातात. मात्र, पुन्हा सेवेत येतात आणि पुन्हा भ्रष्टाचार करतात. कारवाई होत नाही. त्यामुळे आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहिल्याची माहिती आहे. ज्या शिक्षकांवर छापे पडले, त्यांची खुली चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात मागील काही काळापासून भ्रष्ट कारभाराची कीड लागली आहे. शिक्षक बदल्यांसाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शिक्षक बदलीच्या फायलीवर आर्थिक वजन ठेवल्यानंतर शिक्षकांना सोयीच्या जिल्ह्यात बदली झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांत आपण पाहिली आहेत.


केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा संपूर्ण माहिती

शिर्डी संस्थानचा शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय...

 शिक्षण संस्थांच्या मक्तेदारीला आता आव्हान मिळण्याची शक्यता आहे. 


देशातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध प्रकारचे उच्च शिक्षण देणारी महाविदयालये सुरू करण्यात येणार आहे. संस्थानचे अद्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनीच एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे.

परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी शैक्षणिक संस्था सुरू करण्यात येणार असून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी अध्यक्ष आमदार काळे यांनी दिली.

'संस्थानतर्फे एमबीबीएस, बी.एस्सी., नर्सिंग, विधीशाखा, अध्यापन शास्त्र याप्रकारचे शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. परिसरातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात चांगले शिक्षण मिळावे, यासाठी हा प्रयत्न आहे', असे काळे यांनी सांगितले.

शिर्डी संस्थानला अशी शिक्षण संस्था सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास या भागातील कोपरगाव, प्रवरानगर, संगमनेर येथील सध्या सुरू असलेल्या विविध नेत्यांच्या शिक्षण संस्थांसाठी मोठा स्पर्धक निर्माण होण्याची शक्यता आहे.

डीव्हीईटी लवकरच 700 पदे भरणार... #Jobs,

 व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) अधिपत्याखालील प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत शिक्षकीय संवर्गातील सातशे पदांची भरती करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथील एकूण सातशे पदे सरळसेवेद्वारे भरली जातील.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यात ७ हजार ३९६ नियमित शिक्षकीय पदे मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार ३६३ पदे रिक्त आहेत. कंत्राटी तत्त्वावरील एक हजार ५०० पदांपैकी १ हजार ९०१ पदे रिक्त आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील जास्त मागणी असलेल्या अभ्यासक्रमांची रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांसाठीची उपलब्ध यंत्रसामुग्री, स्कील गॅप धोरणानुसार पदाची आवश्यकता आदी बाबी विचारात घेऊन सरळसेवेच्या कोट्यातील १ हजार २०३ पदे भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यातील शिक्षकीय संवर्गातील (निदेशक) सातशे पदांची सरळसेवा कोट्यातून भरती करण्यास शासन नियुक्ती उपसमितीने मान्यता दिल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयांनुसार मुंबईमध्ये १८७, पुण्यामध्ये १०८, नाशिकमध्ये १०१, औरंगाबादमध्ये १०७, अमरावतीमध्ये ८५, नागपूरमध्ये ११२ अशी सातशे पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे

सौदी मध्ये शालेय अभ्यासक्रमात महाभारत व रामायण समावेश करण्याचा निर्णय....#saudi #education

 सौदी मध्ये शालेय अभ्यासक्रमात महाभारत व रामायण  समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला 


ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत यात इस्लामी देशही मागे नाहीत हेच सांगण्याचा प्रयत्न  प्रिन्स मोहम्मद यांनी त्यांच्या  निर्णयाने जाहीर केला आहे. अलीकडेच त्यांनी विजन ट्वेंटी-थर्टी ची घोषणा केली या अंतर्गत आता शालेय अभ्यासक्रमात विविध देशांचा इतिहास शिकवला जाणारा याबाबतचा  एक व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
अकाऊंटवरून ही पोस्ट टाकण्यात आली आहे त्यात एका महिलेने आपल्या मुलाच्या सामाजिक विज्ञान परीक्षेचे संबंधित प्रश्नांचा स्क्रींनशाॕट शेअर केलाय यात विद्यार्थ्यांना हिंदू धर्म बौद्ध धर्म रामायण आणि महाभारत अशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले  .

सौदी अरेबिया विजन ट्वेंटी थर्टी असे यात  देण्यात आला.   असून सौदी अरेबियात योगा प्रशिक्षक म्हणून पहिल्या प्रमाणपत्र मिळवल्याबद्दल गौरवण्यात आलं होतं सूत्रांच्या माहितीनुसार सौदीच्या अभ्यास क्रमांमध्ये पुढील  गोष्टींचा समावेश केला जाणार रामायण महाभारत व योग आणि आयुर्वेद.

सौदीच्या तरुणाईला जगाच्या संस्कृतीचा ज्ञान मिळावं
सौदीचे भारतासोबत संबंध दृढ व्हावेत हा त्यामागचा उद्देश त्या  निमित्ताने इतरही मुस्लिम राष्ट्रांमध्ये भारताची संस्कृती आणि इतिहास पोहोचण्यास मदत होणार आहे.