राज्यातील 36 शिक्षण अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी, असे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अर्थात् एसीबीला लिहिले आहे.
शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचे आयुक्तांनी पत्रात लिहिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेताना पकडले जातात. मात्र, पुन्हा सेवेत येतात आणि पुन्हा भ्रष्टाचार करतात. कारवाई होत नाही. त्यामुळे आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहिल्याची माहिती आहे. ज्या शिक्षकांवर छापे पडले, त्यांची खुली चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात मागील काही काळापासून भ्रष्ट कारभाराची कीड लागली आहे. शिक्षक बदल्यांसाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शिक्षक बदलीच्या फायलीवर आर्थिक वजन ठेवल्यानंतर शिक्षकांना सोयीच्या जिल्ह्यात बदली झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांत आपण पाहिली आहेत.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.