डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
innovative लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
innovative लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

🙌🏼हात पाय धुवू.....करोनाला वाडीबाहेर ठेवू... #unicef covid

 राष्ट्रीय स्तरावरील आयोजित स्पर्धेत...

 जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी , केंद्र / बीट करमाड , ता/ जि. औरंगाबाद  या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना या संकटापासून वाडीला वाचविण्यासाठी शोधलेला हा उपाय खूपच महत्त्वाचा व वाडीच्या लोकांना आरोग्य व स्वच्छतेचा संदेश देणारा ठरणार आहे. 



जगभरामध्ये पसरलेल्या करणामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात आलेले आहे . लोकांचा बाहेर जाणे येणे  थांबवता येत नाही. पण घरी येताना त्यांनी जर स्वच्छतेची काळजी घेतली तर निश्चित या संकटापासून वाचण्यासाठी पूरक असा उपक्रम मुरूमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे .त्यांना या कामासाठी शाळेचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केलेले आहे.



वर स्टोरी पहा 

 शालेय जीवनात मुलांना मिळालेला हा अनुभव पुढील आयुष्यामध्ये त्यांना निश्चितच आरोग्यदायी दृष्टिकोन निर्माण होण्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. समाजाविषयी एक नागरिक म्हणून आपले काय देणे असते याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे. स्वच्छतेमुळे अनेक आजारांना टाळता येते याची जाणीव सुद्धा त्यांना यामुळे होणार आहे. हे करत असतांना विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस याबाबतीत विचार करण्यास सुरुवात केली त्यांना मुख्यतः खालील समस्या या सतावत होत्या.




१) लोक वारंवार बाहेरगावी जातात.
२) हात पाय न धुता तसेच घरात येतात.
३) लोकांना हात धुण्याची योग्य पद्धत माहीत नाही.
४) डोंगर खोर्‍यात वाडी असल्याने सुरक्षित आहे पण सतत जाणारे-येणारे धोका वाढवीत आहे.

       या सर्व समस्यांवर विचार करत त्यांनी *🙌🏼हात पाय धुवू.....करोनाला वाडीबाहेर ठेवू...*

    या उपक्रमाची स्वतः आखणी केली . वाडीतील मोठया मुलांच्या सहकार्याने वाडीत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर त्यांनी शाळेसमोर हात पाय धुण्यासाठी नळ व वटा निर्माण केला व तेथे हँण्डवाँश लिक्विड उपलब्ध करुन दिले. 

             एक प्रकारचा थांबा निर्माण करत लोकांना बाहेरून येतांना हात पाय धुवून वाडीत येण्याविषयी प्रबोधन केले व हात धुण्याची योग्य पद्धत ही समजावली.

       "small things make big change"

       याप्रमाणे या उपक्रमाचा फायदा खालीलप्रमाणे होणार आहे.

१) लोक बाहेरून येतांना हात पाय स्वच्छ करुन येणार असल्याने कुटूंबाला तसेच पर्यायाने समाजाचा कोरोना पासून बचाव होणार आहे.

२) हात धुण्याची योग्य पद्धत ही लोकांना माहित होणार आहे.

३) जेव्हा शाळा उघडातील तेव्हा शाळेत येतांना व शाळेतून जातांना विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे.


           *विद्यार्थी सहभागी टीम*


जयपाल बालोद,पार्थ बचाटे,  साक्षी बचाटे , कल्याणी बचाटे, सागर बालोद, प्रतिक्षा बचाटे.*

                *मार्गदर्शक*

        *प्रकाशसिंग राजपूत*

            

               *सहकार्य*

    *श्री दिलीप आढे*

*अर्जून बालोद व गावकरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सर्व सदस्य*


Share for care....

▶️ *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🎞️


If combined Child orphan and old age home

किती छान होईल ना? जर अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र केले तर....*


समाजात सदैव दोन घटक फारच दुर्लक्षित केलेले दिसून येतात. एक म्हणजे ज्यांना या समाजात नागरिक म्हणून तयार व्हायचे आहे ते तर दुसरे म्हणजे ज्यांनी या समाजासाठी खूप काही करून ठेवलेले असते परंतू त्यांचे असणे माञ समाजाला ओझे वाटू लागते. यावरून एक गोष्ट नक्कीच आपल्या लक्षात  आली असेल ती म्हणजे इथे चर्चा होत आहे ज्याला या जगात कोणीही नाही अशी अनाथ मुले व ज्याला या जगात सर्वजण असून ही परिस्थितीने झालेली परकी वृद्ध मंडळी ज्यांना त्यांचे कुटुंबातील लोक पहायला तयार नाहीत.




     आपण समाजात पहात असतो मुलांच्या  वाढदिवसाच्या दिवशी बरीच मंडळी या दोन्ही घटकांना एका दिवसा करिता का होईना परंतू प्रेम जिव्हाळा दाखवून परत येतात. परंतू याने काही यांचे जीवन बदलू शकत नाही .  


        एकीकडे देशाचे उज्वल भविष्य तर दुसरीकडे देशाच्या विकासाला हातभार लावून थकलेले खांदे*.

 एक सोशल मिडियावर एक फोटो याच बाबतीत वाचला व मन ते वाचून अगदी आतून पेटून उठले .खरंच जर या दोन्हीही घटकांना एकत्र आणले तर यांच्या आयुष्यात किती बदल होईल. मुलांना संस्कारांची , आदर्शवादी विचारांची व ममता, प्रेम जिव्हाळा याची शिदोरीच मिळेल. वयोवृद्धांना ही यांच्या सोबत नवचैतन्य व जीवन जगण्यातील नैराश्यावर उपाय मिळेल, नक्कीच आयुष्याच्या अखेरच्या वाटेवर काही दिवस खरे जगण्याचे समाधान त्यांनाही मिळून समाजात एक नवा बदल या दोन्हीहीच्या एकत्रित होण्यातून मिळेल.



          अशा एका सामान्य बदलाने या दोन्हीही घटकावर सकारात्मक बदल होत असेल तर याकडे गांभीर्याने विचार करुन त्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्याची गरज आहे. आपल्या समाजाला पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीचा विसर होत आहे त्यामुळेच वृद्धाश्रम हे नको असलेले परंतू एक कटु सत्य भारतीय संस्कृतीत निर्माण झालेले आहे. 

         अतिथी देवोभव !.... माननारे आपण भारतीय लोक घरातीलच लोकांना बाहेर काढू लागलो हे आपल्या भारतीय संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास  नाहीतर काय? .

        अलिप्त विभक्त कुटुंब पद्धती ही खरंतर समाजात खूप मोठी दरी निर्माण करणारी ठरली आहे. यातूनच स्वार्थ निर्माण होत तीच बीजे पेरली जाऊ लागली. ३०-४० वर्षापूर्वी इतकी वाईट अवस्था आपल्या कुटुंब  पद्धतीची नव्हती कारण तेव्हा एकत्र कुटुंब पद्धत नांदत होती. मोठ्या प्रमाणात होत असलेले शहरीकरण हे कुटूंब पद्धतीला हानी पोहचविणारे ठरले आहे. सुखसोयी करीता माणूस शहराच्या वाटा जरी धरू लागला,  परंतू वृद्धाश्रम ही  समाजात निर्माण झालेली समस्या फार जटील बनून राहीली आहे. आयुष्यभर ज्या लेकरांसाठी आई वडील कष्ट करत राहीले त्यांनेच म्हातारपणी त्यांना असे परके करायचे हे किती कष्टदायी व मनाला त्रास देणारे आहे. त्यांच्या संपुर्ण आयुष्यातील हा वेदनादायी प्रसंगच असतो.

       अनाथ आश्रम मधील काही मुलांचे भाग्य उजळते ज्यांना दत्तक घेणारे पुढे सरकावतात परंतू प्रत्येक बालकाला हे भाग्य लाभत नाही. अशा सर्व बालकांना जर आश्रयरुपी या वृद्धांची वटवृक्षरूपी सावली मिळाल्यास त्यांच्यावर पडलेल्या संस्काराने नक्कीच त्यांचे ही भाग्य हे उजळून येईल पर्याने समाजाला उत्कृष्ट नागरिक ही लाभतील .  आई वडील नसले तरी असंख्य आजोबा आजी हे यांचे पालक बनतील तेव्हा यांना अनाथ बनविणारा देव ही स्वतःच्या निर्णयाचा विचार करु लागेल.

      अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र करण्याच्या दिशेने समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक पाऊल उचलणे महत्त्वाचे होईल या बाबतीत राजकीय , सामाजिक नवचैतना निर्माण होत भारतीय संस्कृतीच्या उत्कर्षाला प्रेरणा तर नक्कीच मिळेल आपण खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीला जोपासणारे नागरिक म्हणून अभिमानाने या समाजात जगू शकू. 


          उत्कर्षाचा पेटवू नव ज्वाला,
          अनाथ न राहील येथील बाळा,
         आधाराची लाभेल एक काठी,
        वृद्धपणी सुटेल परकेपणाच्या गाठी....



        प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 

                 

 आपल्याला काय वाटते काॕमेंटमध्ये अवश्य लिहा....