मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहितेपुर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉 मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय
✅ राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी
✅ तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार
✅ मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला
✅ १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
✅ संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार
✅ शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण
✅ विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल
✅ पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
✅ हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना
✅ संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार
✅ राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
✅ ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
✅ भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप
✅ संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार
✅ वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन
✅ राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर
✅ श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित