डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक पदासाठी असलेले क्र.२ मधील निकष रद्द करण्यात येत असून त्याऐवजी पुढील सुधारित निकष विहित

 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे.

शासन निर्णय :-

शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक पदासाठी असलेले क्र.२ मधील निकष रद्द करण्यात येत असून त्याऐवजी पुढील सुधारित निकष विहित करण्यात येत आहेत :- २. मुख्याध्यापक (प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा) पदासाठीचे सुधारित निकषः-



२.२ उक्त तक्त्या मधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळामध्ये मुख्याध्यापक पदांवर समायोजित करावे. अशा समायोजनानंतर तरीपण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होई पर्यत/पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे. सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेस सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्ये अभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करावे.


२. शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील क्र.७ सर्व साधारण मध्ये पुढील तरतुदीचा समावेश करण्यात येत आहे:-

७.७ संयुक्त शाळेस (वर्ग १ ते ७, वर्ग १ ते ८, वर्ग १ ते १०, वर्ग १ ते १२, वर्ग ५ ते १०, वर्ग ६ ते १०, वर्ग ५ ते १२, वर्ग ६ ते १२, वर्ग ८ ते १२, वर्ग ९ ते १२ (अशा किमान २ गट)। अशा प्रकारच्या शाळांमध्ये शाळेचा वेगवेगळा भाग समजून एकापेक्षा अधिक मुख्याध्यापक पदे अनुज्ञेय ठरत असल्यास फक्त वरीष्ठ शाळेतील मुख्याध्यापक पद अनुज्ञेय राहील.

३ . वरील तरतुदीसह संदर्भाधीन शासन निर्णयातील इतर सर्व निकष आदेश आहेत तसेच लागू राहतील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४१००९१८५०३८९५२१ असा आहे.



0 Comments:

टिप्पणी पोस्ट करा

याबाबत आपली काॕमेंट करा.