डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

डी.एड शासकीय महाविद्यालय बंद होणार Ded college closed

 राज्यात एकूण 12 शासकीय अध्यापक महाविद्यालय कार्यरत होती. मात्र, यापैकी पाच महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाअभावी बंद करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता कमी झाल्याने विद्यार्थ्यांचा अध्यापक महाविद्यालयांकडे ओढा नसल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 



ही महाविद्यालये होणार बंद ? 

 विद्यार्थी संख्येअभावी राज्यातील रायगड जिल्ह्यातील सासवणे शासकीय अध्यापक विद्यालय, 

  • माणगाव शासकीय अध्यापक विद्यालय,
  •  बीड जिल्ह्यातील नेकनूर शासकीय अध्यापक विद्यालय,
  •  अमरावती जिल्ह्यातील अमरावती शासकीय अध्यापक विद्यालय 
  • आणि पुणे जिल्ह्यातील उर्दू शासकीय अध्यापक विद्यालय


 बंद करण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालकांनी घेतला आहे. ही महाविद्यालये बंद करण्यात येत असल्याबाबत राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही दुजोरा दिला.

का झाली महाविद्यालय बंद ? 

राज्यात अध्यापक महाविद्यालय म्हणजे डीएड महाविद्यालयांची संख्या एक हजार शंभर इतकी होती. मात्र, गेल्या काही वर्षात शिक्षकांची नोकरभरती झालेली नाही. त्यामुळे नोकरी मिळणार नाही, या कारणास्तव शिक्षकी पेशाकडे वळण्यास अथवा अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी उत्सुक नाहीत.



 यामुळे राज्यातील महाविद्यालयांची संख्या 2019-20 मध्ये 894 वर पोहोचली तर आता ती आणखी कमी होऊन 654 पर्यंत घसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून शासनाने खासगी अध्यापक विद्यालयाचे वेतनेतर अनुदान बंद केले आहे. त्यामुळे केवळ अनुदानासाठी महाविद्यालय चालवली जात नाहीत, तर प्रयत्न करून आणि मोफत प्रवेश देऊनही विद्यार्थी येत नसल्याने संस्थाचालक हवालदिल झाले आहेत.

शिक्षक बदली 2022 विशेष बैठक #teacers transfer

 *शिक्षक बदली 2022 ठळक घडामोडी*



आज महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती आणि बदली अभ्यास गट महाराष्ट्र राज्य यांच्यात ऑनलाईन 3 तास बदली 2022 या विषयावर चर्चा झाली.

*सदर बैठकीस मा. आयुष प्रसाद साहेब मा. ओंबासे साहेब मा. कर्डीले साहेब उपस्थित होते.तसेच मा. संभाजीराव थोरात तात्या मा. मधुकर काठोळे मा.काळुजी बोरसे मा. अंबादास वाजे मा. चिंतामण वेखंडे मा. नवनाथ गेंड मा. साजिद निसार मा. संजय जाधव मा.देविदास बसवदे मा. यादव पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.



*खालील मुद्यावर चर्चा झाली.*



1) 30 जून 3 वर्ष, अनफिट फॉर लेडीज*

2) आंतर जिल्हा बदली बाबत काही विषय*

3) प्रमोशन, संच मान्यता आदी*



*मा. काठोळे साहेब, मा. अंबादासजी वाजे साहेब मा. चिंतामण वेखंडे साहेब, देविदास बसवदे साहेब यांनी 3 वर्ष 30 जून आणि अनफिट फॉर लेडीज याबद्दल संघटनेची भूमिका मांडली.याबाबत मा. आयुष प्रसाद साहेबांनी सकारात्मक भूमिका घेत ह्यावर्षी पारदर्शक बदल्या होतील तशी कार्यवाही सुरु असून संघटनेच्या पाठपुराव्यामुळे विशेष बदली म्हणून 3 वर्षात विनंती बदली साठी शासनाकडे प्रस्ताव पाठवू असे सांगितले*.


*मा. संभाजीराव थोरात तात्या यांच्या पाठपुराव्याकडे आता अन्यायग्रस्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे. कारण मा. मुश्रीफ साहेब यांच्याकडेही पाठपुरावा करणे आवश्यक आहे.*



*परंतु आजच्या मिटिंगमुळे पोर्टल मध्ये बदलाबाबत प्रशासन सकारात्मक असून शासनाकडून येणाऱ्या सूचनेनुसार अपेक्षित बदल करू असे सांगितले आहे.*


शिक्षकांचे वरीष्ठ व निवड श्रेणीचे शिक्षण सशुल्कच होणार.... Nivadshreni,

 राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण सशुल्कच होणार असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (एससीईआरटी) स्पष्ट करण्यात आले आहे.



प्रशिक्षण आयोजित करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून या बाबत माहिती देण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी ३१ डिसेंबर २०२१ ला १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण, तर ३१ डिसेंबर २०२१ ला २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरणार आहेत.

 शिक्षण विभागातर्फे आतापर्यंत हे प्रशिक्षण विनामूल्य घेण्यात येत होते; परंतु यंदा हे प्रशिक्षण ऑनलाइन होत असून, त्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांला दोन हजार रुपये प्रशिक्षण शुल्क द्यावे लागणार आहे. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतरही शुल्क आकारूनच प्रशिक्षण होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.



'प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी 'एससीईआरटी'कडे कोणताही निधी उपलब्ध नाही. तसेच केंद्र किंवा राज्य यांच्याकडून वरिष्ठ, निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र निधी मिळत नाही. ऑफलाइन आणि ऑनलाइन प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी मोठा खर्च होणार आहे. नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ विकसित करणे, ई साहित्य विकसित करणे, प्रशिक्षणाकरिता मॉडय़ुल, मार्गदर्शिका तयार करणे, चित्रीकरण, प्रशिक्षण तज्ज्ञांचे मानधन, मार्गदर्शिका, हस्तपुस्तिका, प्रमाणपत्र आदी बाबींवर खर्च होणार आहे. त्यासाठी शुल्काच्या रकमेचा वापर केला जाईल,' असे एससीईआरटीचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी स्पष्ट केले आहे.