डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षकांचे वरीष्ठ व निवड श्रेणीचे शिक्षण सशुल्कच होणार.... Nivadshreni,

 राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण सशुल्कच होणार असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (एससीईआरटी) स्पष्ट करण्यात आले आहे.



प्रशिक्षण आयोजित करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून या बाबत माहिती देण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी ३१ डिसेंबर २०२१ ला १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण, तर ३१ डिसेंबर २०२१ ला २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरणार आहेत.

 शिक्षण विभागातर्फे आतापर्यंत हे प्रशिक्षण विनामूल्य घेण्यात येत होते; परंतु यंदा हे प्रशिक्षण ऑनलाइन होत असून, त्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांला दोन हजार रुपये प्रशिक्षण शुल्क द्यावे लागणार आहे. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतरही शुल्क आकारूनच प्रशिक्षण होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.



'प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी 'एससीईआरटी'कडे कोणताही निधी उपलब्ध नाही. तसेच केंद्र किंवा राज्य यांच्याकडून वरिष्ठ, निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र निधी मिळत नाही. ऑफलाइन आणि ऑनलाइन प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी मोठा खर्च होणार आहे. नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ विकसित करणे, ई साहित्य विकसित करणे, प्रशिक्षणाकरिता मॉडय़ुल, मार्गदर्शिका तयार करणे, चित्रीकरण, प्रशिक्षण तज्ज्ञांचे मानधन, मार्गदर्शिका, हस्तपुस्तिका, प्रमाणपत्र आदी बाबींवर खर्च होणार आहे. त्यासाठी शुल्काच्या रकमेचा वापर केला जाईल,' असे एससीईआरटीचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी स्पष्ट केले आहे.




1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

प्रशिक्षण कधी सुरू होणार आहे हे कळवा