डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

नविन शिक्षण आयुक्त यांच्या समोरील आव्हाने....

 नविन शिक्षण  आयुक्त यांच्या समोरील आव्हाने....

शिक्षक पात्रता परीक्षेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या परीक्षा परिषदेच्या कामावर नियंत्रण ठेवणे,  या नव्या आव्हानांसह प्रलंबित पडलेली विविध प्रकरणे मार्गी लावणे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे, विद्यार्थी हिताच्या योजना सक्षमपणे राबवून घेण्याचे मोठे आव्हान नव्या शिक्षण आयुक्तांपुढे उभी आहेत.


 माजी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यानंतर शिक्षण आयुक्तपदाची सूत्रे सूरज मांढरे यांच्याकडे आली आहेत. नव्या आयुक्तांसमोरील आव्हाने आणि अपेक्षांबाबत विविध संघटनांनी मते नोंदविली. मराठी शाळांमधील रिक्त पदांपासून ते वेतनश्रेणीतील प्रलंबीत मागण्यांसंदर्भातील ज्वलंत प्रश्न संघटनांनी मांडले.

प्रमुख अडचणी 

१. प्रशासन  स्तर

शिक्षण विभागातील विविध संचालकांची पदे रिक्त पडली आहेत. शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालकांचीही बरीचशी पदे मंजूर असतानाही भरण्यात आलेली नाही. पदोन्नत्या रखडल्या आहेत. यामुळे अधिकाऱ्यांकडे विविध विभागाचे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली असून त्याचा कामकाजावरही विपरीत परिणाम होतो आहे.

२. शाळा स्तर

राज्यात शाळांमध्ये शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत, शाळांना पुरेसे शिक्षक नाहीत, त्यातही शिक्षकांवर केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक पदाचे अतिरिक्त प्रभारी म्हणून कार्यभार देण्यात आलेले आहेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, राज्यात डीएड बीएड धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, टीईटी, टीएआयटी सारख्या परीक्षा देऊन सुद्धा शिक्षकभरती होत नाहीय, यासाठी शिक्षण आयुक्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, यासाठी राज्यातील डीएड बीएड धारक उमेदवार सातत्याने मागणी करत आहे.

पवित्र पोर्टलवर सूचना देऊनही अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा २०२२ एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आलेली नाही, टीईटी घोटाळ्यामुळे टीएआयटी परीक्षेला मुहूर्त मिळत नाहीय


शाळापूर्व तयारी अभियान.....अशी तयारी करा...

 शाळापूर्व तयारी अभियान.....

           शाळापूर्व तयारी मेळावा घ्यायच्या दिवशी सर्व प्रथम प्रभातफेरी काढायची आहे. 

आपल्याला शाळेत ७ प्रकारचे स्टॉल लावायचे आहेत. सर्व स्टॉल हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित आहेत.



 स्टॉल क्र-१ नाव नोंदणी आणि रिपोर्ट कार्ड देणे.


             पहिलीत येणाऱ्या मुलांचे स्वागत करायचे आहे.त्यांचे वजन,उंची याची नोंद करायची आहे.

स्टॉल क्र-२ शारीरिक विकास...


             यामध्ये दोरीच्या उड्या, दोन्ही हाताच्या साहाय्याने चेंडू किंवा रिंग फेकणे,कागदाच्या साहाय्याने होडी तयार करणे,रंग भरणे,चेंडू बादलीत टाकणे अशा वेगवेगळ्या कृतींचे आयोजन करून मुलांचा शारीरिक विकास कितपत झालेला आहे हे तपासायचे आहे.यात मुलांना मदतीची गरज आहे का किंवा तो चांगले करतो/करते याप्रमाणे नोंद करायची आहे.


स्टॉल क्र-३ बौद्धिक विकास


     यामध्ये लहान-मोठा फरक ओळखणे,२ प्रकारांमध्ये वर्गीकरण(जसे-फळे व पक्षी),दिलेल्या वस्तू-चित्रे क्रमाने लावणे,जोडी लावणे या क्षमतांचा समावेश होतो.


स्टॉल क्र-४ सामाजिक आणि भावनात्मक विकास-


        यामध्ये घरी राहिल्याने मुलांमध्ये सामाजिक आणि भावनात्मक विकास कशा पद्धतीने झाला हे आपल्याला तपासायचे आहे.यात आपण त्यांना आपल्या परिवारातील सदस्यांची नावे सांगणे,खेळ/क्रियांमध्ये आनंदाने सहभागी होणे,स्वच्छ आणि नीटनेटके राहणे,धीटपणे बोलणे या क्षमतांची आपण नोंद घेणार आहोत.


स्टॉल क्र-५ भाषा विकास -


       यात चित्र पाहून वर्णन करणे, गोष्ट सांगणे,अक्षरे ओळखणे,अक्षरे पाहून ओळखणे या क्षमतांची नोंद आपल्याला घ्यायची आहे.


स्टॉल क्र-६ गणनपूर्व तयारी -



    यात कमी-जास्त ओळखणे,आकार ओळखणे,अंक ओळखणे,वस्तू मोजणे या क्षमतांची  नोंद आपल्याला  घ्यायची आहे.


स्टॉल क्र-७ मातांना साहित्य देणे व मार्गदर्शन. -

    यामध्ये सर्व नोंदी तपासून त्यानंतर सर्व मुलांना व पालकांना मार्गदर्शन करायचे आहे.


                अशा पद्धतीने आपल्याला स्टॉल उभारायचे आहेत.


देशात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात म्हणाव्या तशा सुविधा नाहीत....नितिन गडकरी

 देशात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात म्हणाव्या तशा सुविधा नाहीत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही परिस्थीती बिकट आहे. 



कोरोना काळात ही अवस्था प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत या सुविधा पाठवणे येत्या काळात गरजेचे आहे. या सोबतच समाजातील सामाजिक, आर्थिक अस्पृश्यता नष्ट होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केले. 

पुण्यातील डोणजे परिसरात एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी विचार व्यक्त केले  . यावेळी जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेते नाना पाटेकर, आमदार भिमराव अण्णा तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.


 गडकरी म्हणाले, ग्रामीण भागात शिक्षक आहेत तर शाळेला इमारती नाहीत. इमारत आहे तर विद्यार्थी नाहीत. जर दोन्ही असेल तर शिक्षक नाही.





 आज ही परिस्थीती बदलत आहे. मात्र आरोग्य विषयक समस्या आजही आहेत. कोरोना काळात त्या प्रकर्षाने जाणवल्या. जेव्हा कोरोना काळात आॅक्सीजनची कमतरता होती. तेव्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात आम्ही व्हेन्टीलेर आॅक्सीजन कॉन्सट्रेटर पाठवले.

पण तेथील डॉक्टरांना ते कसे वापरावे हे माहित नव्हते. त्यांना ते कसे वापरावे याचे व्हिडीओ पाठवावे लागले, ही दुर्देवाची बाब आहे. ग्रामीण भागात उभारलेला हा दवाखाना येथील नागरिकांसाठी फायदद्याचा ठरणार आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेकर यांची जयंती आहे. या दिवशी हा दवाखाना सुरु होतोय ही चांगली बाब आहे. आज समाजातील जे ख-या अर्थाने शोषित आहे, वंचिंत आहेत, दलित आहे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या आर्थीक गरजा पूर्ण झाल्या की त्यातून जे गरजु आहे त्यांना मदत करणे गरजेचे आहे.

मी जातीपात मानत नाही. मानवतावाद आणि सामाजिक दायित्व ही भावना आज सर्वात मोठी आहे. गरीब लोकांची सेवा या दवाखान्याच्या माध्यमातून आपण करणार असल्याने आनंद झाला आहे. आज समाजात जे ख-या अर्थाने शोषित आहे, पिडीत आहेत, दलीत आहेत. या सोबत सामाजिक आर्थीक शैक्षणिक दृष्टा मागासलेले आहेत. ज्यांच्याजवळ आजही वैद्यकीय सुविधा पोहचू शकत नाही अशांना चांगल्या सुविधा देणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

महामानवाच्या जयंतीच्या दिवशी समाजातील जो जातीवाद, अस्पृश्यता आहे ती समुळ नष्ट व्हावी, सामाजिक आणि आर्थीक समानता ख-या अर्थाने प्रस्थापित झाली पाहिजे. आणि शोषित पिडीत माणसाला सन्मानाने जगता आले पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे. जेव्हा शिक्षण विषयक स्वास्थ विषयक आर्थीक विषयक सगळ्या सुविधा त्यांना मिळतील तेव्हाच ते ख-या अर्थाने स्वतंत्र होणार आहे. हे काम दीर्घकालीन असून त्यासाठी खूप काम करावे लागणार आहे.