जिल्हांतर्गत बदल्यांमधील टप्पा क्रमांक एक व दोन च्या बाबतीत महत्त्वाची प्रोसेस आज पासून सुरू झालेली आहे यामध्ये आज स ११ वाजता रिक्त पदांची यादी सीईओ लॉगिन मधून प्रसिध्द होईल व त्यानंतर संवर्ग 1 व 2 साठी लॉगिन सुरू होणार आहे
आपल्या गटातील ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 1 अथवा विशेष संवर्ग भाग 2 मधून लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी लॉगिन करून कार्यवाही दि.18/11/2022 ते दि.20/11/2022 अखेरपर्यंत पूर्ण करावयाची आहे .आजपासून संवर्ग १ व २ ची प्रक्रिया
शालेय पोषण आहार खात्याचे आॕडीट
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे महालेखापाल (AG) व स्थानिक निधी लेखा विभागामार्फत लेखापरिक्षण होत असते. तथापि, या विभागांमार्फत शाळांचे १०० टक्के लेखापरिक्षण होत नाही. सदरच्या लेखापरिक्षणाकरीता शाळांची निवड यादृच्छिक (random) पद्धतीने केली जाते. तसेच स्थानिक निधी लेखा परिक्षण • विभागामार्फत शासकीय अनुदानाचा लाभ घेणाऱ्या आस्थापनांचे लेखापरिक्षण व Test Audit करण्यात येते. शाळांच्या आकडेवारीचा विचार करता दरवर्षी ३८ टक्के शाळांचे लेखापरिक्षण होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे असे पत्रात म्हटलेले आहे .
केंद्र शासनाने वितरीत केलेला निधी लाभार्थ्यांपर्यंत विहित कालमर्यादेत पोहचत असल्याची खातरजमा करणे, वितरीत केलेले अनुदान कोणत्याही कारणासाठी शाळास्तरावर प्रलंबीत राहणार नाही हा उद्देश या लेखापरिक्षणामागे असून शाळा, तालुका व जिल्हास्तरावर योजनेकडून वितरीत करण्यात आलेले अनुदान, खर्च करण्यात आलेले अनुदान वितरणाच्या आणि मार्गदर्शन याअनुषंगाने लेखापरिक्षण करणे करीता विहित कार्यपध्दतीनुसार शिंदे, चव्हाण, गांधी अॅन्ड कंपनी या सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
योजनेच्या खर्चाबाबत वेळोवेळी निदर्शनास आलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी व भविष्यात लेखे सुधारीत पद्धतीने ठेवण्यासाठी संस्थेमार्फत सकारात्मक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदरील आदेश पहा... 👇
बदलीपात्र नेमके कोण ?
शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्याच प्राधान्य क्रमाने त्यांच्या बदल्या केल्या जातील .
बदलीपात्र शिक्षक-
ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे .
आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहे, अथवा ज्या शिक्षकाची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे .
असे शिक्षक दहा + पाच(10+5) वर्ष कुठल्याही क्षेत्रात म्हणजेच अवघड अथवा सुगम क्षेत्रात पूर्ण झालेली असेल तर तो शिक्षक बदलीपात्र आहे.
बदली पात्र शिक्षकांची बदलीतून सुटका यावेळी होणार नाही त्यांची बदली ही प्रणाली द्वारे होणारच...
अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन दहा वर्षांपूर्वी केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून प्रस्थापित करण्यात येईल .
अवघड क्षेत्रातील सुंदर शाळा जि.प.प्रा.शा.मुरूमखेडावाडी, औरंगाबाद |
बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्या असल्यास त्या भरण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा शिक्षकांची निवड होईल त्याला विद्यमान शाळेत पाच वर्षे पूर्ण असण्याची अट लागू होणार नाही.