डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

वन्यजीवमंडळ, शास्त्रज्ञ उपक्रम

 जि.प,प्रा.शा. मुरुमखेडावाडी केंद्र करमाड ता/जि औरंगाबाद येथे Our knowledge zone अंतर्गत उपक्रम राबवीत आहोत.प्रकाशसिंग राजपूत व सहकारी शिक्षक दिलीप आढे

1) वन्यजीव मंडळ,
2) ग्रंथालय
3) शास्त्रज्ञ विषयक माहिती
4) परमवीरचक्र विजेते
5) आॕलंपिक पदक विजेते खेळाडू

#olympic #paramvir #scientist


उपक्रमाचा व्हिडीओ पहा....



*माझी शाळा माझे कॅलेंडर...डाऊनलोड करा👇*

              *2023*




*शास्त्रज्ञ व परमवीर चक्र विजेत्यांची जयंती साजरी करण्यासाठी उपयुक्त कॅलेंडर*


 *Pdf ची झेरॉक्स काढून शाळेत लावू शकता...*

झेडपी शाळा आता ग्रामपंचायत नियंत्रणाखाली

 

सरकार झेडपीच्या शाळा ग्रामपंचायतींच्या ताब्यात देणार असल्याची चर्चा आहे.



यासंदर्भात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मुंबईत याची माहिती दिली. तिसरीपासून आठवीपर्यंत परिक्षा नियमित घेतल्या जाणार आहेत, अर्थात नापास न करण्याची प्रक्रिया मात्र तूर्तास कायम ठेवली जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. सध्या हा सर्व प्रकल्प राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, लवकरच शिंदे- फडणवीस सरकार त्यावर निर्णय घेईल असे शिक्षणमंत्री  केसरकर यांनी  सांगितले.

केरळमध्ये शिक्षणाबाबत खूप चांगले व यशस्वी मॉडेल तयार करण्यात आले असून तेथे शाळा ग्रामपंचायतींकडे सोपवल्या आहेत. महाराष्ट्रातही ग्रामपंचायतींकडे शाळा सोपविण्याचा सरकारचा विचार आहे. त्यातून स्थानिक ठिकाणच्या समस्या व त्यावर स्थानिक ठिकाणचे नियंत्रण या महत्वाच्या गोष्टी घडतील.

 बदली अर्जबाबत...

सध्या झेडपीचे शिक्षक हे शाळा व्यवस्थापन समिती असली तरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी किंवा ग्रामस्थ.शिक्षक विद्यार्थीकेंद्रीत असतात, तिथे मात्र स्थानिक ग्रामस्थ व पालकांचे संबंध चांगले राहतात, त्याचा विचार करता शाळांमधील वातावरण स्थानिक ठिकाणच्या परिस्थितीनुसार सुरळीत राहण्यासाठी व शिक्षकांवर वेळेचे, अभ्यासाचे नियंत्रण राहण्यासाठी ग्रामपंचायतींकडील नियंत्रण महत्वाचे ठरेल असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

खोटी माहिती भरून बदली घेतल्यास

 *ग्रामविकासचे दि. 22/11/2022 चे पत्र*

*चुकीची माहिती देऊन, खोट्या कागदपत्राच्या आधारे बदली झाल्यास.......


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. तद्नंतर, दि. २१/१०/२०२२ व दि.१८/११/२०२२ च्या पत्रान्वये सन २०२२ मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही सुरु आहे. सदर सुधारित वेळापत्रकानुसार दि.१८/११/२०२१ ते दि. २२/११/२०२२ दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांनी संगणकीय बदली प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेले आहे. अशा शिक्षकांनी खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज सादर केले असल्यास व त्या आधारे अशा शिक्षकांच्या बदल्या झाल्या, तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणान्या खऱ्या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो. शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांनी सादर केलेल्या अर्जाच्या पडताळणीबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत-


१) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांर्गत बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर संवर्गीय शिक्षकांनी भरलेल्या अर्जाची काटेकोरपणे पडताळणी करण्यात यावी. संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतांनाही जाणिवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेले आढळल्यास नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी. सदर पडताळणीचे काम कोणत्याही परिस्थितीत दिनांक २२/११/२०२२ ते २४/११/२०२२ या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे.

२) पडताळणीअंती ज्या शिक्षकांनी जाणिवपूर्वक खोटया व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिध्द होईल. त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीतील संबंधित संवर्गातून बाद करण्यात यावा व अशा शिक्षकांविरुध्द शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करावी. मात्र, बदल्यासंदर्भात विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याची अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे. अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा अनुज्ञेय असणार नाही.

पत्र खालील प्रमाणे ...