डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

छत्रपती शिवाजी राजेंवरील गीत...

कोणी हे गीत गायन करण्यास व निर्मिती  करण्यास तयार असल्यास नक्कीच संपर्क करावा.

गीतलेखन 

प्रकाशसिंग  राजपूत

  9960878457 



 

 *कडेकपारी शौर्य जागवी....*

राजं... जी रं...  राजं छत्रपती शिवाजीराजं,
कडेकपारी शौर्य जागवी,
मर्द मावळे लढव्ये घडूनी,
घडला स्वाभीमानी हा राष्ट्र ....
राजं... जी रं...  राजं छत्रपती शिवाजीराजं,

 


उचलली विजयी पताका,
स्वराज्याचे तोरण बांधुनी,
गनिमाला न झुकता करी एल्गार,
मावळा इथे शौर्यवान लढुनी,
राजं... जी रं...  राजं छत्रपती शिवाजीराजं,

 


गडकिल्ले करूनी बळकट ,
राजं आणली नविन आंधी,
आई भवानीचा घेऊनी आशीर्वाद ,
माॕ साहेबांचा राखला मान ,
राजं... जी रं...  राजं छत्रपती शिवाजीराजं,

 


सह्याद्रीचा गनिमास धाक,
सिंहासनावर झाले विराजमान,
प्रजेला मिळत आराध्य दैवत,
हृदयी एकच शिववंदन गायी...
राजं... जी रं...  राजं छत्रपती शिवाजीराजं,

  🚩 *जय शिवाजी जय भवानी*🚩*
   ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️
     *छत्रपती संभाजीनगर*
📲9960878457

शिक्षण सेवक मानधनाबाबत महत्त्वाचे

 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयार केलेला प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला गेला आहे. यानंतर त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली जाईल. नव्या प्रस्तावानुसार, प्राथमिक-उच्च प्राथमिक स्तरावर शिक्षण सेवकांना 16 हजार, माध्यमिक पातळीवर 18 हजार तर, उच्च माध्यमिकसाठी 20 हजार इतकं मानधन मिळणार आहे.

मानधन वाढीचा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे



शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीबाबत राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने तयार केलेला प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी आहे. या मंजुरीनंतर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळेल आणि शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीचा मार्ग मोकळा होईल. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी शिक्षक संघटना तसेच शिक्षण सेवक यांच्याकडून वेळोवेळी मागणी केली जात होती. लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा मानधन वाढीचा मुद्दा विधिमंडळात चर्चेला आणला होता. परंतु त्याच्यावर विचार झाला नव्हता.

उच्च न्यायालयाकडून मानधनाविषयी आश्चर्य व्यक्त

उच्च न्यायालयानेदेखील एक निकाल देताना शिक्षण सेवकांच्या अल्पशा मानधनाविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. शिक्षक संघटनांनी मानधन वाढीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुसार मानधन वाढीची मागणी केली होती. प्राथमिक, उच्च प्राथमिकसाठी 20 हजार, माध्यमिकसाठी 25 हजार तर उच्च माध्यमिकसाठी 30 हजार रूपये इतकी मागणी केली होती.

दरम्यान, राज्यात सध्या शिक्षण सेवकांची संख्या 12 हजारांच्या आसपास आहे. तर 40 हजार पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याची मागणीही होत आहे.


बालरक्षक अॕपडाऊनलोड करणे.

 बालरक्षक अॕप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....


https://play.google.com/store/apps/details?id=com.dhwaniris.saralapp





यावर लाॕगीन करण्यासाठी खालील प्रकारे युजर आयडी व पासवर्ड वापरा....

user id  - शाळेचा युडायस कोड (इंग्रजी अंकात) 

password  युडायस कोडसह @123


अशाप्रकारे आपण हा ॲप डाऊनलोड करून यावर लॉगिन करून यावरील माहिती पूर्णपणे भरू शकतात मित्रांनो माहिती आवडल्यास डिजिटल स्कूल समोर महाराष्ट्र या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे.