डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षक प्रोफाइल दुरुस्तीसाठी दिनांक 27 व 28 मे 2025 या दोन दिवसाचा कालावधी दिलेला आहे.

बदली अपडेट 2025



आज दिनांक 27 मे 2025 रोजी बदली पोर्टलवर शिक्षणाधिकारी लॉगिन मध्ये शिक्षकांची माहिती अपलोड करणे व असलेली माहिती दुरुस्त करणे यासाठी 28 मे 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.


त्याबरोबरच गटशिक्षणाधिकारी लॉगिन वरून शिक्षकांची प्रोफाइल माहिती एक्सेप्ट करण्यासाठी देखील दिनांक 28 मे 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.


बदली पोर्टलवर दिनांक 24 मे 2025 रोजी बदली पात्र,  बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षकांच्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.


परंतु मुदतीत याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये अनेक चुका लक्षात आल्यामुळे आता त्या चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांच्या प्रोफाईल मधील माहिती दुरुस्त करण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे.


अवघड क्षेत्रातील ज्या शाळा 2022 ला सुगम करण्यात आल्या अशा शिक्षकांना बदली अधिकार पात्र मधून एक संधी देण्याकरिता त्यांची पुरवणी यादी सुद्धा ज्या कार्यालयाची  अपलोड झालेली ती करण्याकरिता  गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन वरून करण्याकरिता लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.


शिक्षक प्रोफाइल दुरुस्तीसाठी दिनांक 27 व 28 मे 2025 या दोन दिवसाचा कालावधी दिलेला आहे.


अर्थात दिनांक 28 मे 2025 पर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या रिक्त पदांच्या व इतर याद्या पोर्टलवर पब्लिश होऊ शकतात.


बदली पोर्टल लिंक.    


https://ott.mahardd.com


 संचमान्यता सन 2023-24 व सन 2024-25 नुसार सर्व जिल्हा परिषदांनी रिक्त पदांची माहिती अद्ययावत करुन तयार ठेवावी. बदली प्रक्रिया करिता कोणती संच मान्यता घ्यावी याबद्दल अधिकृत सुचना दिलेली  नाही अधिकृत सूचना आरडीडी कडून प्राप्त झाल्यानंतर पोर्टल सुरु होताच सदर माहिती एक दिवसामध्ये भरुन पूर्ण करावी.*


मे.विन्सीस कडून बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येतील व बदलीची पुढील प्रक्रिया सुरु होईल.



जिल्हा अंतर्गत बदली- अवघड क्षेत्र निकष बाबत महत्त्वपूर्ण|teachers-online-transfer|

 जिल्हा अंतर्गत बदली- अवघड क्षेत्र निकष बाबत महत्त्वपूर्ण.....


थेट ग्रामविकास स्तरावरून,


जिल्हा परिषद मधील कार्यरत शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 अंतर्गत अवघड क्षेत्रातील काही बदल या ठिकाणी प्रामुख्याने सर्व शिक्षक बांधवांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातून शिक्षकांनी याबाबत विचारणा केली होती. करिता याबाबत ग्राम विकास स्तरावरून मार्गदर्शन घेऊन सदर पोस्ट च्या माध्यमातून ही माहिती देण्यात येत आहे.

 *➡️अवघड क्षेत्रातील बदली प्रक्रियेबाबत महत्वपूर्ण..*


👉 अवघड क्षेत्रातून बदली प्राप्त शिक्षक हा त्या अवघड क्षेत्रात एकूण सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक झालेली असेल हा निकष महत्त्वपूर्ण मानला आहे. 




👉 अवघड क्षेत्रात एकाच शाळेवर सलग तीन वर्ष सेवा असणे गरजेचे नसून अवघड क्षेत्रातील एकूण सेवा ही तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो संबंधित शिक्षक बदली अधिकार प्राप्त ठरतो. आणि अशा सर्व शिक्षकांची ( जे अवघड मधून अवघड मध्ये बदली केलेले असतील त्यांची सुद्धा) नावे ही बदली अधिकार प्राप्त यादीमध्ये अंतर्भूत असणार आहे.


👉 ज्या शाळा 2022 पूर्वी अवघड क्षेत्रात होत्या आणि पुन्हा 2022 नंतर अवघड क्षेत्रात आलेल्या आहेत अशा शाळेवरील शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त यादीमध्ये दाखविले जाणार आहे. 


👉 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या यादीमध्ये संबंधित शिक्षकाची एकूण जिल्ह्यातील सेवा जेष्ठता हा निकष विचारात घेण्यात आलेला असून अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा हा निकष या यादीमध्ये विचारात घेण्यात आलेला नाही हे उल्लेखनीय .


👉 अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा विचारत न घेण्यात आल्याने एकूण सेवा ही त्या जिल्ह्यातील  शिक्षकांची ग्राह्य धरण्यात आल्याने अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा धारक शिक्षक हा बदली अधिकार प्राप्त यादीमध्ये ज्युनियर ठरला आहे. 


*➡️संवर्ग १ व २ बाबत महत्वपूर्ण ..*


शासन निर्णय नुसार अवघड क्षेत्रामध्ये एकूण सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो संबंधित शिक्षक बदली अधिकार प्राप्त ठरतो.हा निकष संवर्ग एक अथवा दोन मधील शिक्षकांना देखील क्रमप्राप्त असल्याने संवर्ग एक व दोन मधील शिक्षकांना  देखील विनंती बदली करिता अवघड क्षेत्रामध्ये एकूण सेवा ही तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.


👉 अवघड क्षेत्रामधील बदली प्रक्रिया करिता बदली पात्र व रिक्त पदे दाखविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


करिता अवघड क्षेत्रातील सर्व शिक्षक बांधवांच्या माहितीस्तव...



शिक्षणाधिकारी बदलीपात्र व अधिकारपात्र शिक्षक यादी प्रसिद्ध करणार|online-teacher-transfer-ottmahard-educational|

शिक्षणाधिकारी बदलीपात्र व अधिकारपात्र शिक्षक यादी  आज प्रसिद्ध करणार....

शिक्षक बदली पोर्टलवर वेळापत्रक अपडेट: शिक्षकांच्या प्रतिक्षेचा अंत

महाराष्ट्रातील शाळांमधील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. शिक्षक बदली प्रक्रियेच्या अधिकृत पोर्टलवर नवीन वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले आहे. राज्यातील हजारो शिक्षक गेल्या काही आठवड्यांपासून या वेळापत्रकाची वाट पाहत होते. शिक्षण विभागाने अखेर दिनांक 24 मे 2025 रोजी हे वेळापत्रक अपलोड केले असून, बदलीबाबत यादी संदर्भात  स्पष्ट करण्यात आले आहेत.     

शिक्षक बदली ही प्रक्रिया प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवात होण्पापुर्वी पार पडते, जेणेकरून नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांना नव्या ठिकाणी रुजू होता येईल. यंदाही हेच उद्दिष्ट ठेवून शिक्षण विभागाने प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक  शिक्षकांचा समावेश होतो. 



महत्त्वाचे बदल आणि सूचना: 

या वर्षी ऑनलाईन प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक टप्प्यानंतर शिक्षकांना SMS व ईमेलद्वारे सूचना पाठवण्यात येणार आहे. याशिवाय, vinsys हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत जेणेकरून कोणतीही अडचण आल्यास शिक्षकांना त्वरित मदत मिळू शकेल.

शिक्षक संघटनांनी या वेळापत्रकाचे स्वागत केले असून, वेळेवर प्रक्रिया पार पडल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल, असे मत व्यक्त केले आहे. काही संघटनांनी मात्र ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली आहे.

शेवटी, शिक्षकांनी वेळापत्रकानुसार आपली कागदपत्रे, अर्ज व पर्याय वेळेत सादर करणे आवश्यक आहे. कोणतीही विलंब किंवा चुकीची माहिती प्रक्रिया थांबवू शकते. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने सजग राहून ही प्रक्रिया पूर्ण करावी.

राज्य सरकारने यंदा शिक्षक बदल्यांसाठी वेळापत्रक वेळेवर जाहीर करून प्रक्रियेतील पारदर्शकतेचा एक सकारात्मक पाऊल टाकला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

बदली संदर्भात मंत्रालय अपडेट पहा....